एक्स्प्लोर

Paytm Share : आरबीआयची कारवाई, तरीही पेटीएमच्या शेअर्समध्ये तेजी, सलग तीन दिवस अप्पर सर्किट; का पडताहेत गुंतवणूकदारांच्या उड्या?

Paytm Crisis : पेटीएमला दिलासा देत आरबीआयने ठेवी स्वीकरण्यास बंदी घालण्याची मुदत 29 फेब्रुवारीवरून वाढवली असून ती 15 मार्च अशी केली आहे.

Paytm Crisis : आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Payments Bank) कारवाई केली असली तरीही पेटीएमच्या शेअर्समध्ये (Paytm Share) गेल्या तीन सत्रांमध्ये तेजी असल्याचं दिसून आलंय. सलग तीन सत्रांमध्ये पेटीएमच्या शेअर्समध्ये एकूण 15 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. 

आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमच्या शेअर्समध्ये 50 टक्क्यांची घसरण झाली होती. परंतु गेल्या तीन दिवसांपासून गुंतवणूकदारांनी या समभागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचं दिसून येतंय. RBI ने पेटीएम बँकेला मुदत वाढवून दिली आहे. त्यानंतर पेटीएमने अॅक्सिस बँकेसोबत (Axis Bank)केलेला करार आणि बर्नस्टीनचे रेटिंगसंबंधित बातम्या यामुळे या शेअर्सची खरेदी करण्याकडे लोकांचा पुन्हा एकदा कल असल्याचं दिसून येतंय. पेटीएमचा शेअर मंगळवारी 376.25 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर 5 टक्क्यांची मर्यादा घालण्यात आली होती.

ईडीच्या तपासात अद्याप काहीही आढळले नाही

अलीकडेच पेटीएमला दिलासा देत आरबीआयने ठेवी स्वीकरण्यास बंदी घालण्याची मुदत 29 फेब्रुवारीवरून वाढवली असून ती 15 मार्च अशी केली आहे. याशिवाय फेमा कायद्याच्या (Foreign Exchange Management Act) उल्लंघनाचा तपास करणाऱ्या ईडीला पेटीएम कंपनीविरुद्ध कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत असा दावा सोमवारी विविध प्रसारमाध्यमांच्या अहवालात करण्यात आला. गेल्या आठवड्यात, वन 97 कम्युनिकेशन्सने आपले नोडल खाते ॲक्सिस बँकेला दिले होते. त्यामुळे त्यांच्या क्यूआर कोड, साउंड बॉक्स आणि कार्ड मशीनवरील संकटही टळले असून ते कायम कार्यरत राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. 

शेअर्स 600 रुपयांचा आकडा गाठण्याचा अंदाज

पेटीएमचे संस्थापक आणि एमडी विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) सतत कंपनीचा बचाव करत होते. व्यापाऱ्यांनी अफवांवर लक्ष देऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. याशिवाय ब्रोकरेज फर्म बर्नस्टीनने कंपनीचे शेअर्स 600 रुपयांचा आकडा गाठण्याची आशा व्यक्त केली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेवरील बंदीबाबत आरबीआयने अलीकडेच FAQ जारी केले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या शेअर्सवर होत असल्याचं दिसून येतंय.

Disclaimer: येथे दिलेली बातमी केवळ माहितीसाठी दिली जात आहे. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून, पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ञाचा सल्ला घ्या. ABP माझा कधीही कोणालाही पैसे गुंतवण्याचा सल्ला देत नाही.

ही बातमी वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, वर्षाभरातील निचांकी पातळीपर्यंत सोनं घसरलं, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
Gold Rate : सोने चांदीचे दर पहिल्याच दिवशी गडगडले, सोनं 3000 रुपयांनी तर चांदी 8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
सोने चांदीचे दर पहिल्याच दिवशी गडगडले, सोनं 3000 रुपयांनी तर चांदी 8000 रुपयांनी स्वस्त
Nvidia : प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री? एलन मस्कसह दीड लाख जणांचं लॉबिंग
प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री?
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident News: दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
Gold Rate : सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, वर्षाभरातील निचांकी पातळीपर्यंत सोनं घसरलं, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
Lift Safety Rules: बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
Daulat Maharaj Satpute Death Jalna News: देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
Mumbai : मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड; प्रत्येक सदनिकेमागे दरमहा 235 रुपये शुल्क भरावं लागणार
मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड, बीएमसीचा नेमका प्लान काय? जाणून घ्या
Raju Shetti : राजू शेट्टींच्या स्वाभिमानीचं सोलापूरमधील ऊस दर आंदोलन स्थगित, 19 नोव्हेंबरला बैठक; साताऱ्यात स्वाभिमानीला पहिलं यश 
स्वाभिमानीचं सोलापूरमधील ऊस दर आंदोलन स्थगित, 19 नोव्हेंबरला बैठक; साताऱ्यात स्वाभिमानीला पहिलं यश
Satara Tarali Pump Storage Project: साताऱ्यातील तारळी प्रकल्पाच्या कामाला वनविभागाचा दणका; 13 नोव्हेंबरलाच काम बंदचे आदेश
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाच्या कामाला वनविभागाचा दणका; 13 नोव्हेंबरलाच काम बंदचे आदेश
FDA Action In Akkalkot Swami Samarth Temple: अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरातील दुकानातून 850 किलो मिठाई जप्त; तुकाराम मुंढेंची कारवाई
अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरातील दुकानातून 850 किलो मिठाई जप्त; तुकाराम मुंढेंची कारवाई
Embed widget