एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Paytm Share Crash: नेमकं झालं काय? पेटीएमनं एक निर्णय घेतला अन् शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले

Paytm: रिझर्व्ह बँकेनं छोट्या पर्सनल लोनसाठीचे नियम कठोर केल्यानंतर पेटीएमनं मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कंपनीच्या महसुलावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Paytm: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) पर्सनल लोनचे नियम कठोर केल्यानंतर पेटीएमनं (Paytm) छोट्या पर्सनल लोनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पेटीएम आता 50 हजार रुपयांपेक्षा कमी पर्सनल लोनची संख्या कमी करणार आहे. कंपनीनं बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. महत्त्वाची गोष्ट आहे की, आरबीआयच्या कठोरतेनंतर पेटीएमच्या छोट्या कर्जाच्या संख्येत 50 टक्क्यांपर्यंत मोठी कपात पाहायला मिळत आहे. 

कंपनीवर मोठा परिणाम होणार नाही : Paytm

आपल्या निर्णयाबाबत बोलताना पेटीएमनं सांगितलं की, कंपनीच्या कमाईवर आणि मार्जिनवर या निर्णयाचा फारसा परिणाम होणार नाही. कारण 50 हजार रुपयांपेक्षा जास्त कर्जामध्ये भरपूर क्षमता आहे. अलिकडेच, भारतीय रिझर्व्ह बँकेनं पर्सनल लोनबाबत नियम अत्यंत कठोर केले आहेत. रिझर्व्ह बँकेनं लहान कर्जांच्या रिस्क वेट 25 टक्क्यांपर्यंत वाढवलं आहे. त्यामुळे आता ते 100 टक्क्यांवरून 125 टक्के झालं आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर पर्सनल लोन महाग होणार असून पेटीएमसारख्या कंपन्यांना असुरक्षित पर्सनल लोनची संख्या कमी करणं भाग पडलं आहे.

पेटीएमचे शेअर्स घसरले 

पेटीएमनं छोट्या रकमेच्या असुरक्षित पर्सनल लोनची संख्या कमी करण्याच्या निर्णयानंतर, गुरुवारी शेअर बाजारात कंपनीला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स गडगडले. डिजीटल पेमेंट फर्म Paytm ची मूळ कंपनी One97 Communications चे शेअर्स 7 डिसेंबरला तब्बल 20 टक्क्यांनी घसरले. यानंतर 9.23 मिनिटांनी लोअर सर्किट लागू झालं आहे.

कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम

ब्रोकरेज फर्म जेफ्रीजनं (Jefferies) सांगितलं की, आरबीआयच्या छोट्या पर्सनल लोनचे नियम कठोर करण्याच्या निर्णयानंतर पेटीएमच्या बाय नाऊ पे लेटर (Buy Now Pay Later) व्यवसायावर थेट परिणाम होणार आहे. कंपनीनं जारी केलेल्या कर्जांमध्ये लहान पर्सनल लोनचा वाटा 55 टक्के आहे. यामध्ये कंपनी पुढील 3 ते 4 महिन्यांत 50 टक्क्यांपर्यंत कपात करेल. जेफरीजनं कंपनीच्या महसूल अंदाजात 3 ते 10 टक्के कपात केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Embed widget