Paytm : पेटीएम बँकेसमोरील अडचणी वाढल्या, फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने ठोठावला 5.49 कोटींचा दंड
Paytm Payments Bank : आरबीआयच्या कारवाईनंतर आता फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने पेटीएम बँकेवर कारवाई करत 5.49 कोटींचा दंड ठोठावला आहे.
Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अडचणी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने (Financial Intelligence Unit) पीएमएलए (PMLA) अंतर्गत पेटीएम पेमेंट्स बँकेला (Paytm Payments Bank) 5.49 कोटी दंड ठोठावला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या पेटीएम बँकेच्या अडचणी आणखी वाढल्याचं दिसून आलं.
ऑनलाइन जुगारात गुंतल्याचा आरोप
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर लावण्यात आलेल्या दंडाची माहिती देणारे एक निवेदन जारी केलं आहे. त्यात म्हटलंय की, फायनान्शियल इंटेलिजेंस युनिटला पेटीएम पेमेंट्स बँकेची काही युनिट्स आणि नेटवर्क ऑनलाइन जुगार सारख्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेले आढळले आहेत. या बेकायदेशीर ऑपरेशन्समधून मिळालेले पैसे बँक खात्यांद्वारे पेटीएम पेमेंट्स बँकेच्या या युनिट्समध्ये पाठवले गेले.
FIU-India ने नोटीस जारी केली
या सर्व प्रकाराची छानणी केल्यानतर फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने पेटीएम पेमेंट्स बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ही नोटीस PML नियमांचे उल्लंघन, AML CFT आणि KYC आणि AML CFT आणि लाभार्थी खात्यांच्या KYC शी संबंधित पेआउट सेवांच्या सुरक्षेचे उल्लंघन लक्षात घेऊन जारी करण्यात आली आहे.
FIU-इंडियाने दंड ठोठावला
अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेच्या लेखी निवेदनानंतर, फायनान्शिअल इंटेलिजेंस युनिट - इंडियाला रेकॉर्डवर उपलब्ध सर्व गोष्टी लक्षात घेऊन, पेटीएम पेमेंट्स बँकेवरील आरोपात तथ्य असल्याचं आढळले. त्यानंतर मनी लाँडरिंग विरोधी कायद्याच्या (PMLA) कलम 13 अंतर्गत अधिकारांचा वापर करून, 1 मार्च 2024 च्या आदेशानुसार 5.49 कोटी रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
पेटीएम पेमेंट्स बँकेचे स्पष्टीकरण
फायनान्शियल इंटेलिजेंस युनिटने लावलेल्या दंडावर प्रतिक्रिया देताना पेटीएम पेमेंट्स बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'हा दंड दोन वर्षांपूर्वी बंद झालेल्या व्यवसाय विभागाच्या समस्यांशी संबंधित आहे. त्यानंतर आम्ही आमची मॉनिटरिंग सिस्टीम आणि फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिटसाठी रिपोर्टिंग यंत्रणा वाढवली आहे.
आरबीआयने सर्वप्रथम कारवाई केली
31 जानेवारी 2024 पासून पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अडचणी वाढल्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि सूचना दिल्यानंतरही त्याचे पालन न केल्यामुळे पेटीएम बँकेच्या सेवांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी 29 फेब्रुवारीपर्यंत निर्बंध लादण्यात आले होते. परंतु RBI ने ही मुदत 15 मार्च 2024 पर्यंत वाढवली आहे. पेटीएम पेमेंट बँकेविरुद्ध अनियमितता आढळून आली होती, त्यानंतर सेंट्रल बँकेने हा आदेश जारी केला होता.
ही बातमी वाचा: