एक्स्प्लोर

Pakistan : अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं होर्मुझमधून कराचीला जाणारं जहाज परत पाठवलं

Pakistan : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षात मध्यस्थी करण्यासाठी उत्सुक असलेल्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की आली आहे. इराणनं पाकिस्तानला दणका दिला आहे. 

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध 28 फेब्रुवारीला सुरु झालं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपवण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरु आहेत. या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी पाकिस्ताननं पुढाकार घेतला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानवर इराणच्या एका निर्णयानं नामुष्की आली आहे.  पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीचा प्रस्ताव दिला होता. शरीफ यांची पोस्ट डोनाल्ड ट्रम्प  यांनी देखील सेअर केली होती. याच्याच दुसऱ्या दिवशी इराणनं पाकिस्तानला एक धक्का दिला आहे. कराचीला जाणारं पाकिस्तानचं जहाज होर्मुझमधून परत पाठवण्यात आलं आहे. 

इराणनं होर्मुझच्या प्रवेशद्वारावरुन कराचीला जाणाऱ्या कंटेनर जहाजाला परत पाठवलं आहे. इराणनं म्हटलं की पाकिस्तानला जाणाऱ्या जहाजानं होर्मुझमधून जाण्यास परवानगी घेतली नव्हती. 

एआयस ट्रॅकिंग डेटानुसार  सेलेन नावाचं जहाज 23 मार्चला शारजाहमधून रवाना झालं होतं. हे जहाज पाकिस्तानच्या कराचीला निघालं होतं. होर्मुझजवळ  पोहोचताच त्याची दिशा अचानक बदलण्यात आली आणि जहाज परत फिरलं.यानंतर इराणनं या जहाजाला परवानगी दिली नव्हती असं समोर आलं. 

आयआरजीसी यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे.  रिअर एडमिरल अलीरेजा तंगसीरी यांनी जहाज परत पाठवण्यात आलं याचं कारण त्यांनी कायदेशीर प्रोटोकॉलचं पालन केलं नव्हतं. त्यांनी हे देखील सांगितलं की इराणमधून पुढं जाणाऱ्या जहाजांना इराणच्या सागरी अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधनं आवश्यक आहे.

पाकिस्तानला मोठा धक्का 

होर्मुझची सामुद्रधुनी ऊर्जा साधनांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. जागतिक ऊर्जा साधनांच्या वाहतुकीपैकी 20 क्के वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. पाकिस्तानला जाणारं कंटेनर जहाज शहबाज शरीफ यांच्या सरकारसाठी मोठा धक्का आहे. एकीकडे पाकिस्तान अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्याचा दावा करत असताना इराणनं जहाज माघारी पाठवल्यानं पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. 

पाकिस्तानचा मध्यस्थीचा प्रयत्न 

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात मध्यस्थी करण्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शरीफ यांची पोस्ट शेअर केली आहे. मात्र, दुसरीकडे  इराणनं कोणतीही चर्चा सुरु नसून अमेरिका आणि इस्त्रायल सोबत युद्ध सुरु असल्याचं म्हटलं. 

इराणनं पाकिस्तानला जाणारं विमान परत पाठवल्यानं हे स्पष्ट होतं की होर्मुझवर अजूनही इराणचं वर्चस्व आहे. अमेरिका इस्त्रायल यांनी इराण विरुद्ध 28 फेब्रुवारीला युद्ध सुरु केलं होतं. त्यानंतर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. यामुळ जगभरात ऊर्जा साधनांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Khadi India : ऑनलाईन शॉपिंगसाठी आता सरकारी वेबसाईट, हायटेक ई-कॉमर्स पोर्टल लवकरच लॉन्च
ऑनलाईन शॉपिंगसाठी आता सरकारी वेबसाईट, हायटेक ई-कॉमर्स पोर्टल लवकरच लॉन्च
Rupee vs Oil vs Yuan : रुपया, कच्चं तेल अन् चिनी युआन; गुंतवणूकदारांनी 'या' नवीन मॅक्रो त्रिकोणावर लक्ष का ठेवावे?
रुपया, कच्चं तेल अन् चिनी युआन; गुंतवणूकदारांनी 'या' नवीन मॅक्रो त्रिकोणावर लक्ष का ठेवावे?
Gold Silver Rates Today: अमेरिकेचा इराणवर पुन्हा हल्ला अन् भारतात सोने- चांदीच्या दरात उलथापालथ; 10 ग्रॅम सोन्यासह चांदीचा दर किती?
अमेरिकेचा इराणवर पुन्हा हल्ला अन् भारतात सोने- चांदीच्या दरात उलथापालथ; 10 ग्रॅम सोन्यासह चांदीचा दर किती?
Kelton Tech Share Price : 20 रुपयांखालील मल्टीबॅगर पेनी स्टॉकचा मोठा धमाका; कोट्यवधींचा डिजिटल करार, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड!
20 रुपयांखालील मल्टीबॅगर पेनी स्टॉकचा मोठा धमाका; कोट्यवधींचा डिजिटल करार, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
Gokul Election: 'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
Embed widget