एक्स्प्लोर

CBSE 10th Board Result 2026: प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

CBSE 10th Second Board Result 2026: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे अंतिम निकाल जाहीर केले आहे. विद्यार्थी DigiLocker द्वारे त्यांचे गुणपत्रिका पाहू शकतात.

CBSE 10th Second Board Result 2026:  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचे (Term 2) अंतिम निकाल जाहीर केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या सत्राची परीक्षा दिली होती, ते आता CBSE च्या अधिकृत संकेतस्थळांवर (cbse.gov.in) किंवा DigiLocker च्या संकेतस्थळावर (results.digilocker.gov.in) आपले निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना DigiLocker द्वारे लॉग-इन करावे लागेल. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, ॲडमिट कार्ड आयडी (Admit Card ID) आणि जन्मतारीख यांसारखी माहिती प्रविष्ट करावी लागेल.

दरम्यान, निकाल UMANG प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध असतील. तिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत तपशीलांचा वापर करून लॉग-इन करावे लागेल. सीबीएसई (CBSE) एसएमएस (SMS) आणि आयव्हीआरएस (IVRS) द्वारेही निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ शकते, परंतु मंडळाने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. अशातच CBSE च्या अधिकृत संकेतस्थळांवर (cbse.gov.in) किंवा DigiLocker च्या संकेतस्थळावर (results.digilocker.gov.in) आपले निकाल कसा पाहावा, या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊ.

CBSE 10th Second Board Result 2026:  इयत्ता 10वीचा निकाल कसा तपासावा?

स्टेप 1: सीबीएसईच्या cbse.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

स्टेप 2 : 'Results' (निकाल) या टॅबवर क्लिक करा.

स्टेप 3: एक नवीन विंडो किंवा टॅब उघडेल, ज्यामध्ये 'Class 10' (इयत्ता १० वी) निकालाची लिंक असेल.

स्टेप 4 : 'Class 10' निकालाच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर, एक नवीन विंडो दिसेल.

स्टेप 5 : आपल्या उमेदवार खात्यात (candidate account) लॉग-इन करण्यासाठी रोल नंबर, ॲडमिट कार्ड आयडी आणि जन्मतारीख यांसारखी आवश्यक माहिती प्रविष्ट करा.

स्टेप 6 : लॉग इन केल्यानंतर, तुम्ही तुमचे इयत्ता 10वीचे अंतिम गुणपत्रक (scorecard) पाहू शकाल.

स्टेप 7 : भविष्यातील संदर्भासाठी हे पृष्ठ (page) डाउनलोड करा आणि सेव करा.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रकांमध्ये कोणत्याही स्पेलिंगच्या किंवा तथ्यात्मक चुका नाहीत याची खात्री करावी. काही त्रुटी आढळल्यास, विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर CBSE शी संपर्क साधावा. नियमित विद्यार्थ्यांची (परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह) छापील गुणपत्रके आणि उत्तीर्ण प्रमाणपत्रे त्यांच्या संबंधित शाळांमार्फत उपलब्ध करून दिली जातील.

CBSE 10th Result 2026: सीबीएसई बोर्डाची वेबसाईट हळू चालत असल्यास घाबरू नका.

दरवर्षी, निकालाच्या वेळी लाखो विद्यार्थी एकाच वेळी वेबसाईटवर लॉग इन करतात. परिणामी, वेबसाईट हळू चालते किंवा कधीकधी लोड होत नाही. ही समस्या टाळण्यासाठी सरकारने आधीच व्यवस्था केली आहे. विद्यार्थी डिजीलॉकर (DigiLocker) आणि उमंग (UMANG) ॲपद्वारे त्यांच्या डिजिटल गुणपत्रिका पाहू आणि डाउनलोड करू शकतात.

निकालाच्या आधी डिजीलॉकरने एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे APAAR आयडी नाही, त्यांनी प्रथम डिजीलॉकर खाते तयार करावे, जेणेकरून निकाल जाहीर होताच त्यांच्या गुणपत्रिका "इश्यूड डॉक्युमेंट्स" (Issued Documents) विभागात सापडतील.

CBSE 10th Result 2026:  APAAR आयडी नाही? डिजीलॉकर खाते कसे तयार करावे

जर विद्यार्थ्याकडे APAAR आयडी नसेल, तर काळजी करू नका. ते डिजीलॉकर ॲपवर खाते तयार करूनही आपला निकाल पाहू शकतात. यासाठी, cbseservices.digilocker.gov.in वर जा आणि 'गेट स्टार्टेड' (Get Started) वर क्लिक करा. मग, शाळेने दिलेला ऍक्सेस कोड आणि आवश्यक माहिती भरा. आता OTP वापरून तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करा. तुमचे विद्यार्थी खाते तयार होईल. निकाल जाहीर होताच तुमची गुणपत्रिका डिजीलॉकरमध्ये दिसेल.

विद्यार्थी या प्लॅटफॉर्मवर देखील त्यांचा CBSE बोर्ड 10वीचा निकाल तपासू शकतात:

results.cbse.nic.in
cbse.gov.in
results.nic.in
results.digilocker.gov.in
umang.gov.in
अधिकृत वेबसाइटवरून तुमचा CBSE बोर्ड १०वीचा निकाल कसा तपासावा:

सर्वप्रथम, विद्यार्थ्यांनी आपला निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट, results.cbse.nic.in, उघडावी.

मग, "माध्यमिक शाळा परीक्षा (इयत्ता १०वी) २०२६" या लिंकवर क्लिक करा.

मग, तुमचा रोल नंबर, स्कूल नंबर, ऍडमिट कार्ड आयडी, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन भरा.

सबमिट करा.

मग, गुणपत्रिका स्क्रीनवर दिसेल.

शेवटी, विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड करून प्रिंट करावे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
MPSC Exam Vikram Pachpute: एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
CET साठी 25 लाखांचा रेट, ॲडमिशन प्रक्रियेत मोठा घोटाळा, स्टिंग ऑपरेशन दाखवत रोहित पवारांचे खळबळजनक आरोप, शिक्षकांकडून चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी 
CET साठी 25 लाखांचा रेट, ॲडमिशन प्रक्रियेत मोठा घोटाळा, स्टिंग ऑपरेशन दाखवत रोहित पवारांचे खळबळजनक आरोप, शिक्षकांकडून चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी 

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Embed widget