एक्स्प्लोर

एअरटेलने मारली बाजी, व्हिडीओ स्ट्रीमिंगसह अन्य चार विभागात पुरस्कार

सध्या अनेक नागरिक व्हिडीओ, व्हॉईस कॉलचा वापर करत आहेत. या काळात जे ग्राहक एअरटेल वापरत आहेत. त्यांचा अनुभव सर्वोत्तम असल्याचा दावा लंडनच्या नेटवर्क अॅनालिटिक्स फर्म ओपन सिग्नलने केला आहे.

मुंबई : संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढाई लढत आहे. लॉकडाऊनचे पालन करून देशातील नागरिक देखील यामध्ये योगदान देत आहेत. लॉकडाऊनमुळे मोबाईल हा दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक बनला असून सध्या याचा वापर अधिक वाढला आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी सध्या अनेक नागरिक व्हिडीओ, व्हॉईस कॉलचा वापर करत आहेत. या काळात जे ग्राहक एअरटेल वापरत आहेत. त्यांचा अनुभव सर्वोत्तम असल्याचा दावा लंडनच्या नेटवर्क अॅनालिटिक्स फर्म ओपन सिग्नलने केला आहे.ओपन सिग्नलने 90 दिवस भारतातील सर्व टेलीकॉम कंपनीवर नजर ठेऊन रिपोर्ट तयार केला आहे. ओपन सिग्नलने 1 मे 2020 पासून आपला रिपोर्ट तयार करण्यास सुरुवात केली.

व्हिडीओमध्ये एअरटेलचा अनुभव उत्कृष्ट

ओपनसिग्नलने दिलेल्या रिपोर्टनुसार मोबाईलवर व्हिडीओ पाहण्यासाठी एअरटेलचे नेटवर्क उत्तम आहे. सर्वोत्तम व्हिडीओ अनुभवासाठी एअरटेलला चौथ्यांदा गौरविण्यात आले आहे. एअरटेलला 100 पैकी 57.6 गुण मिळाले आहे. 55 पेक्षा अधिक गुण मिळणे म्हणजे उत्तम मानले जाते. व्हिडीओ अनुभवासाठी एअरटेलने अन्य कंपन्यांच्या तुलनेत 2.4 ते 3.4 गुणांची आघाडी कायम राखली आहे.इतर कंपन्यांच्या तुलनेत एअरटेलच्या कनेक्शनवर व्हिडीओ विनाअडथळा फास्ट पाहता येतात. एवढचं नाही तर व्हिडीओ पाहताना कोणत्याही बफरिंगचा सामना करावा लागत नाही.

एअरटेलने मारली बाजी, व्हिडीओ स्ट्रीमिंगसह अन्य चार विभागात पुरस्कार

खेळाच्या अनुभवामध्ये एअरटेल आघाडीवर 

कोविड 19 मुळे लॉकडाऊनमुळे ऑनलाइन गेम प्लेयर्सची संख्या वाढली आहे.उर्वरित टेलिकॉम ऑपरेटरला हरवून एअरटेलने पहिला गेम  व्हिडीओ एक्सपिरियन्स पुरस्कार जिंकला आहे. या श्रेणीत एअरटेलला 100 पैकी 55.6 गुण मिळाले आहेत, जे इतर दूरसंचार ऑपरेटरपेक्षा अधिक आहेत. अहवालात असे म्हटले आहे की एअरटेलच्या मोबाईल नेटवर्कवर मल्टीप्लेअर गेम खेळताना, वापरकर्त्यांना चांगला अनुभव मिळाला आणि उत्तम इंटरनेटमुळे त्यांच्या खेळावर अजिबात परिणाम झाला नाही.

एअरटेलने मारली बाजी, व्हिडीओ स्ट्रीमिंगसह अन्य चार विभागात पुरस्कार

डाऊनलोडिंग स्पीडमध्ये एअरटेलचं अग्रेसर

डाऊनलोडिंग स्पीडमध्ये एअरटेल ग्राहकांचा अनुभव चांगला आहे. ओपनसिग्नलने दिलेल्या रिपोर्टनुसार, एअरटेलच्या ग्राहकांना सध्या 10.4 Mbps स्पीड मिळत आहे. इतर नेटवर्कच्या तुलनेत यामध्ये एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी चांगले काम करत आहे. रिपोर्टनुसार एअरटेलचा डाउनस्पीड इतर कंपन्यांच्या तुलनेत 3.5 Mbps पेक्षा अधिक आहे.

एअरटेलने मारली बाजी, व्हिडीओ स्ट्रीमिंगसह अन्य चार विभागात पुरस्कार

व्हॉईस कॉलमध्ये एअरटेल पुढे

व्हॉईस कॉलमध्ये देखील एअरटेल चांगली कामगिरी करत असल्याचं ओपनसिग्नलने म्हटले आहे. व्हॉईस कॉल करताना एअरटेल संदर्भात ग्राहकांनाअडचण नसल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. इतर कंपन्यांच्या व्हॉईस कॉल सेवेशी ग्राहक समाधानी नाही. त्यांना कॉल करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

एअरटेलने मारली बाजी, व्हिडीओ स्ट्रीमिंगसह अन्य चार विभागात पुरस्कार

ओकला स्पीडटेस्ट पेक्षा ओपन सिग्नल अहवाल कसा वेगळा आहे?

ओपन सिग्नलची स्पीड टेस्टची पद्धत ओकलापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ओकला कॅरिअर्स आणि इंटरनेट प्रोवाइर्डससोबत भागीदारी करत ग्राहकांच्या जवळ फिजिकल सर्व्हर इन्स्टॉल करण्यात येतो. तर ओपन सिग्नल कंटेंट डिलीव्हरी नेटवर्कचे ग्लोबल नेटवर्क वापरते. ज्यामुळे ग्राहकांना सामान्य परिस्थितीत मिळणारा स्पीड कळतो. या फरकामुळे ओकलाच्या स्पीड टेस्टमध्ये कायम स्पीड जास्त मिळतो.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Embed widget