कांद्याच्या दरात वाढ, बळीराजाला फायदा, जाणून घ्या कोणत्या बाजारपेठेत कांद्याला किती दर?
सध्या कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) चांगले दिवस आले आहेत. कारण, कांद्याच्या दरात चांगली वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Onion Price News : सध्या कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) चांगले दिवस आले आहेत. कारण, कांद्याच्या दरात चांगली वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या प्रतिकिलो कांद्याला 60 ते 70 रुपयांचा दर मिळत आहे. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत असून ग्राहकांची थोडी नाराजी पाहायला मिळत आहे.
सध्या कांद्याच्या दरात चांगलीच वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही कांद्याने आपला भाव कायम ठेवला आहे. सरकारी यंत्रणांमार्फत कांद्याची खुलेआम विक्री होत असली तरी त्याचा पुरवठा पुरेसा होत नाही. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून सातत्याने किरकोळ दर 60 ते 80 रुपये प्रतिकिलो आहेत. अशा परिस्थितीत कांदा बाजारातच महागात विकला जात आहे. हे या वाढीमागील खरे कारण आहे. बाजारात कांद्याची आवक जोरात असतानाही स्थिती आहे. त्यामुळं जोपर्यंत बाजारात कांदा स्वस्त होत नाही तोपर्यंत किरकोळ बाजारात भाव कमी होण्यास फारसा वाव नाही.
कोणत्या बाजारपेठेत कांद्याला सरासरी किती दर?
पुणे-खेड - 3500
पिंपरी चिंचवड - 3650
बहराईच (उत्तर प्रदेश) 3880
कुराली (पंजाब) - 3860
जयानकोंडम (तामिळनाडू) - 7000
गुडगाव (हरियाणा) - 3000
कांद्याचे भाव कमी होणार का?
कांद्याचे भाव 5 वर्षातील विक्रमी उच्चांकावर आहेत. निर्यातीत वाढ, मागणीत वाढ, खराब हवामान अशी कांद्याच्या दरात वाढ होण्याची कारणे आहेत. त्याचबरोबर पीक निकामी झाल्याने व खराब झालेला कांदा बाजारात आल्याने मागणी वाढल्याने भाव वाढले आहेत. त्याचवेळी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात भाव कमी होतील, असा विश्वास काही दिवसांपूर्वी तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र आता नवीन वर्षातही कांद्यासाठी लोकांना पैशांची चणचण भासणार आहे. याशिवाय डिसेंबरच्या मध्यापूर्वी कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
दरम्यान, यावेळी सरकारनं प्रयत्न करुन देखील दरात घसरण झाली आहे. अद्याप तरी कांद्याला चांगला दर मिळत आहे. पण पुढच्या काळात सरकारनं जर काही निर्णय घेतला तर कांद्याच्या दरात घसरण होण्याची दाट शक्यता आहे. पण लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या धोरणाचा मोठा फटका केंद्र सरकारला महाराष्ट्रात बसला होता. अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार पडले होते. यामागं सरकारं चुकीचं धोरण हेच कारण होतं. मात्र त्यानंतर सरकारनं अद्याप कांद्याच्या दराबाबत कोणताही निर्णय घेतला आहे. सध्या कांद्याची निर्यातही सुरु आहे. त्यामुळं चांगला दर मिळत आहे.