एक्स्प्लोर

Narayana Murthy : नारायण मूर्तींचा नवा फॉर्म्युला, तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला

Narayana Murthy advice for youngsters : इन्फोसिस या संस्थेचे संस्थापक (Infosys Co Founder) नारायण मूर्ती (N. R. Narayana Murthy यांनी दिलेल्या सल्ल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.  नारायण मूर्ती यांनी 'द रिकॉर्ड' (The Record) या पॉडकास्टमध्ये (Podcast) मोहनदास पै (Mohandas Pai) यांच्यासोबत गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी तरुणांना हा 70 तासांचा सल्ला दिला. 

Narayana Murthy advice for youngsters : इन्फोसिस या संस्थेचे संस्थापक (Infosys Co Founder) नारायण मूर्ती (N. R. Narayana Murthy यांनी दिलेल्या सल्ल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.  भारताला महाशक्ती बनायचं असेल, अर्थव्यवस्थेमध्ये चीनला मागे टाकायचं असेल तर तरुणांना आठवडाभरात किमान 70 तास काम करायला हवं, असं नारायण मूर्ती म्हणाले. नारायण मूर्ती यांनी 'द रिकॉर्ड' (The Record) या पॉडकास्टमध्ये (Podcast) मोहनदास पै (Mohandas Pai) यांच्यासोबत गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी तरुणांना हा 70 तासांचा सल्ला दिला. 

नारायण मूर्तींच्या '70 तास' च्या सल्ल्यानंतर सोशल मीडियावर अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan)  चक दे इंडिया (Chak De India) सिनेमातील '70 मिनिट'सोबत तुलना केली जात आहे. त्या सिनेमात भारताच्या महिला हॉकी विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचल्या होत्या, त्यावेळी शाहरुखने 70 मिनिटे तुमच्याकडे आहेत, जी तुमची आहेत, ती तुमच्याकडून कोणीही हिरावू शकत नाही, जगाला दाखवून द्या असा सल्ला दिला होता. त्यानंतर आता नारायण मूर्तींनी अर्थव्यवस्थेत 'चक दे इंडिया" करायचं असेल तर तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करावं लागेल, असं सांगितलं. 

Narayana Murthy Infosys Founder : नारायण मूर्ती यांचा 70 तासांचा फॉर्म्युला

जर आपण चीन (China) आणि जपान (Japan) यासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशांशी स्पर्धा करायची असेल, तर आपल्याला उत्पादकता अर्थात प्रोडक्टिव्हिटी वाढवावी लागेल. सध्या भारताची उत्पादकता कमी आहे. शिवाय आपली सरकारे निर्णय घेण्यासाठी जो वेळ घेतात तो सुद्धा खूप आहे. त्यातच सरकारी बाबूंच्या भ्रष्टाचारावर अंकूश लावणे आवश्यक आहे. हे सर्व पाहता भारतातील तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करावं लागेल, असं नारायण मूर्ती यांनी सांगितलं  

Narayana Murthy Advice for Youngsters : तरुणाईच देशाचे मालक

नारायण मूर्ती म्हणाले, दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपान हे उद्ध्वस्त झाले होते. मात्र त्यांच्या देशातील नागरिकांनी विशेषत: तरुणाईने तासन् तास काम केलं आणि जगाला दाखवून दिलं. तसंच भारतातील तरुणाई जी देशाचे मालक आहेत, ते सुद्धा त्याच ताकदीने अर्थव्यवस्थेसाठी काम करतात. 

Narayana Murthy Infosys Founder Suggestions : स्वत:ला सिद्ध करण्याचा एकमेव पर्याय 

जगात स्वत:ला सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी एकमेव पर्याय आहे तो म्हणजे स्वत:चं काम. तुमचं कामच आहे जे तुम्हाला ओळख मिळवून देतं. एकदा तुम्हाला कामामुळे ओळख मिळाली तर तुम्हाला आपोआप मान-सन्मान मिळत जाईल आणि सन्मान तुम्हाला शक्तिशाली बनवेल. चीन याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. त्यामुळेच तरुणांना आवाहन आहे की, पुढील 20 ते 50 वर्षांसाठी दिवसा 12 तास काम करा, त्यामुळे आपला GDP पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.  

Narayana Murthy Indians new work culture advice : नारायण मूर्तींच्या सल्ल्यावर तरुणाई काय म्हणाली? 

दरम्यान, नारायण मूर्तींच्या सल्ल्यानंतर तरुणाईमध्ये मतमतांतरे आहेत. ओलाचे सीईओ (OLA CEO) भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी नारायण मूर्तींच्या सल्ल्याशी सहमती दर्शवली. आमच्याकडे कमी काम आणि मनोरंजनासाठी वेळ नाही. अन्य देशांनी ज्यासाठी अनेक पिढ्या घालवल्या, ते आपण ठरवलं तर एकाच पीढीत करु शकते, असं अग्रवाल म्हणाले. 

दुसरीकडे सिनेनिर्माते रोनी स्क्रूवाला यांनी नारायण मूर्ती यांच्या विचारांवर असहमती दर्शवली. स्क्रूवाला म्हणाले, केवळ उत्पादकता वाढवणे हे दीर्घकाळ काम केल्याने सिद्ध होईल असं नाही. 

संबंधित बातम्या

Pakistan On Rishi Sunak: ऋषी सुनक पाकिस्तानी? भारतीय वंशज म्हटल्याने पाकिस्तानचं जळफळाट  

सुधा मूर्ती : रतन टाटा आणि नारायण मूर्ती यांच्यातील भावनिक नात्याचा दुवा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget