Pakistan On Rishi Sunak: ऋषी सुनक पाकिस्तानी? भारतीय वंशज म्हटल्याने पाकिस्तानचं जळफळाट
भारतीय वंशाचे ऋषी सुनक करणार आहेत. ऋषी सुनक हे इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून ऋषी सुनक यांनी काल बाजी मारली. दीडशेहून अधिक खासदारांनी पाठिंबा देत ऋषी सुनक यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं. ऋषी सुनक २८ ऑक्टोबर रोजी ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि दुसऱ्या प्रतिस्पर्धी पेनी मॉरडाँट यांनी सुनक यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला खरा, पण किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळवण्यात दोघांनाही अपयश आलं. २०१५ साली ब्रिटनच्या संसदेत पोहोचलेल्या ऋषी सुनक यांनी वयाच्या ४२ व्या वर्षी ब्रिटनचे पंतप्रधान बनण्याचा मान मिळवलाय. मावळत्या पंतप्रधान लिझ ट्रस यांना आर्थिक धोरण फसल्यानं अवघ्या ४५ दिवसांत राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आव्हानात्मक परिस्थितीत ऋषी सुनक यांच्याकडे ब्रिटनचं नेतृत्व आलंय.