नवीन सुनेचा पायगुण! मुकेश अंबानींना 10 दिवसांत 25000 कोटींचा नफा, लग्नात एवढा खर्च करुनही संपत्तीत वाढ
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधीका मर्चंट यांच्या लग्नाची (Anantha Radhika wedding) सर्वत्र जोरदार चर्चा झाली. या लग्नानंतरही अंबानींच्या संपत्तीत वाढ झालीय.
![नवीन सुनेचा पायगुण! मुकेश अंबानींना 10 दिवसांत 25000 कोटींचा नफा, लग्नात एवढा खर्च करुनही संपत्तीत वाढ Mukesh Ambani 25000 Crore Profit in 10 Days Mukesh Ambani Net Worth News Anant Ambani and Radhika Merchant Marriage नवीन सुनेचा पायगुण! मुकेश अंबानींना 10 दिवसांत 25000 कोटींचा नफा, लग्नात एवढा खर्च करुनही संपत्तीत वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/17/13807cbd391443f654e9c87611b2d5061721191054628339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mukesh Ambani Net Worth: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधीका मर्चंट यांच्या लग्नाची (Anantha Radhika wedding) सर्वत्र जोरदार चर्चा झाली. हे लग्न जगातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक मानले जाते. या लग्नात मुकेश अंबानी यांनी मोठा पैसा खर्च केला आहे. दरम्यान, या लग्नात एवढा मोठा पैसा खर्च करुन देखील मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत कोणतीही घट झाली नाही. नवीन सुन राधिका मर्चंटचा यांचा गृहप्रवेश मुकेश अंबानी यांच्यासाठी चांगला समजला जातोय. कारण मुकेश अंबानींना 10 दिवसांत 25000 कोटींचा नफा झाला आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न 12 जुलै रोजी झाले होते, त्यानंतर रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. जगातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक असलेल्या अनंत-राधिका वेडिंगमध्ये जगभरातील सर्वच क्षेत्रातील बडे मान्यवरांची उपस्थिती पाहाला मिळाली. या विवाह सोहळ्याला दिग्गज राजकारणीही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि फिफाचे अध्यक्ष या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यासाठी मुकेश अंबानी यांनी मोठा खर्च केला आहे. यानंतर देखील मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.
मुकेश अंबानींच्या संपत्तीत किती झाली वाढ?
अनंत-राधिका यांच्या लग्नाच्या काळात मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार त्यांची एकूण संपत्ती वाढली आहे. संपत्तीत वाढ झाल्यानंतर मुकेश अंबानींना जगातील श्रीमंतांच्या यादीत फायदा झाला. मुकेश अंबानी एका स्थानाने वर आले आहेत. अंबानी हेच अजूनही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. जगातील अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानींची नेटवर्थ आता 12व्या स्थानावरून 11व्या स्थानावर पोहोचली आहे. ब्लूमबर्गच्या मते 5 जुलै रोजी मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 118 अब्ज डॉलर होती, जी आता 121 अब्ज डॉलर झाली आहे.
10 दिवसात कमावले 25000 कोटी
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 10 दिवसात मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 3 अब्ज डॉलर्स (सुमारे 25000 कोटी रुपये) वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांनी गेल्या 24 तासात 109 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 9110 कोटी रुपये) कमावले आहेत. सध्या ते जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Anant Radhika Wedding : जगातलं सर्वात महागडं लग्न, अनंत अंबानीच्या लग्नाचा राजेशाही थाट; 5000 कोटींचा खर्च
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)