Muhurat Trading 2021 : शेअर मार्केटमध्ये दिवाळी! सेंसेक्स 60 हजारांवर तर निफ्टी 17916 वर पोहोचला
Muhurat Trading 2021 : शेअर मार्केटमध्ये मुहूर्त ट्रेडिंग सुरु होताच सेंसेक्स 295 अकांनी वधारुन तो 60,687.62 वर बंद झाला तर NSE निफ्टी 87 अंकांनी वधारुन 17,916.80 वर पोहोचला.
![Muhurat Trading 2021 : शेअर मार्केटमध्ये दिवाळी! सेंसेक्स 60 हजारांवर तर निफ्टी 17916 वर पोहोचला Muhurat Trading 2021 BSE NSE Sensex touched 60000 while the Nifty touched 17916 Muhurat Trading 2021 : शेअर मार्केटमध्ये दिवाळी! सेंसेक्स 60 हजारांवर तर निफ्टी 17916 वर पोहोचला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2018/01/04113001/stock-market.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Diwali Muhurat Trading 2021 : आजपासून संवत 2078 ची सुरुवात झाली असून त्या निमित्ताने शेअर मार्केटमध्ये लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे आजही एका तासासाठी मुहूर्त ट्रेडिंगचा (Muhurat Trading 2021) कार्यक्रम पार पडला असून त्यामुळे शेअर बाजारात काही प्रमाणात तेजी आल्याचं दिसून आलं आहे. शेअर मार्केटमध्ये सायंकाळी 6.15 वाजता मुहूर्त ट्रेडिंग सुरु होताच सेंसेक्स 295 अकांनी वधारुन तो 60,687.62 वर बंद झाला तर NSE निफ्टी 87 अंकांनी वधारुन 17,916.80 वर पोहोचला. या दरम्यान सेंसेक्सच्या सर्वच सेक्टरमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदी केल्याचं दिसून आलं.
आज झालेल्या मुहू्र्त ट्रेडिंगच्या कार्यक्रमावेळी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनच्या हस्ते बेल रिंगिंग सेरेमनी पार पडला. त्या आधी लक्ष्मीपूजन करण्यात आलं आणि कोविड योद्धांचा सन्मान करण्यात आला. या वेळी बीएसईचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष चौहान, काऊंसिल ऑफ स्वीडन एरीक मांबर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुहूर्त ट्रेडिंगच्या दरम्यान सेंसेक्समध्ये 0.49 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये आयशर मोटर्सच्या शेअर्स खरेदीमध्ये 6.50 टक्क्यांची वाढ झाली आहे.
गेल्या वर्षीच्या मुहूर्त ट्रेडिंगचा विचार करता सेंसेक्स 195 अंकानी वधारला होता तर निफ्टी 51 अंकानी वधारला होता. दिवाळीतील मुहूर्त ट्रेडिंगच्या दरम्यान सर्वात मोठी वाढ ही 2008 साली झाली होती. त्यावेळी सेंसेक्समध्ये तब्बल 5.86 टक्क्यांची वाढ झाली होती.
दरवर्षी दिवाळीमध्ये केवळ एका तासासाठी स्पेशल ट्रेडिंगचं आयोजन केलं जातं. या खास ट्रेडिंगला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. या मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्तानं शेअर मार्केट एक तासासाठी सुरु होतो आणि गुंतवणूकदार एक छोटी गुंतवणूक करुन शेअर मार्केटमधील ट्रेडिंगची परंपरा निभावतात. दरम्यान, यावर्षी 4 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटं ते 7 वाजून 15 मिनिटांपर्यंत मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन करण्यात आलं होतं. असं म्हटलं जातं की, दिवाळीच्या दिवशी बाजारात गुंतवणूक करणं शुभ मानलं जातं. आजच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्तानं गुंतवणूकदार अधिकाधिक खरेदी करतात.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)