जगातील सगळ्यात बुटाची किंमत किती? आयुष्यभर कमाई करुनही खरेदी करणं अशक्य
जगातल्या अनेक महागड्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. पण तुम्हाला जगातील सर्वात महागड्या शूजची किंमत (Most Expensive Shoes) माहित आहे का?
Most Expensive Shoes : जगातल्या अनेक महागड्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. पण तुम्हाला जगातील सर्वात महागड्या शूजची किंमत (Most Expensive Shoes) माहित आहे का? जगातील महागड्या शूजची किंमतही करोडो रुपये आहे. यामध्ये एकापेक्षा जास्त बुटांचा समावेश आहे. श्रीमंत लोकांमध्ये चांगले शूज हेदेखील सामाजिक प्रतिष्ठेचं एक प्रतीक मानले जाते. शूजच्या डिझाइनची गुणवत्ता जितकी चांगली असेल तितकी त्यांची किंमत जास्त असते. जाणून घेऊयात जगातील सर्वात महागड्या असणाऱ्या बुटांबद्दल माहिती.
स्टुअर्ट वेटझमन रीटा हेवर्थ हील्स
स्टुअर्ट वेटझमन रीटा हेवर्थ हील्स (Stuart Weitzman Rita Hayworth Heels)अतिशय खास पद्धतीने बनवल्या जातात. स्टुअर्ट वेटझमॅनने जुनी हॉलिवूड अभिनेत्री रीटा हेवर्थच्या कानातल्यांच्या जोडीचे शूजमध्ये रूपांतर केले आहे. या शूजची किंमतही 3 मिलियन डॉलर (24,70,42,368 रुपये) आहे. रीटा हेवर्थचे कानातले शूजच्या मध्यभागी दिसतात. या जोडीमध्ये पायाच्या बोटाभोवती एक साटन रफल आणि हिरे, नीलम आणि माणिक यांसारखे रत्न आहेत.
हॅरी विन्स्टन रुबी स्लिपर्स
हॅरी विन्स्टन रुबी स्लिपर्सची ही जोडी मोठ्या मेहनतीने बनवण्यात आली आहे. 50 कॅरेटच्या हिऱ्यांशिवाय या शूजमध्ये 1350 कॅरेट माणिकांचाही समावेश आहे. शूजच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ते 3 मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 24,70,42,368 रुपये आहे.
शूजमध्ये लावली महाग रत्ने
डेबी विंगहॅम हाय हिल्स जगातील सर्वात महागड्या रत्नांनी जडलेल्या आहेत. शूजची वरची पूर्ण बॉडी प्लॅटिनमचे बनलेली आहे. या उर्वरित शूजसाठी वापरण्यात आलेले लेदर 24 कॅरेट सोन्याने रंगवलेले आहे. 18 कॅरेट सोन्याचा धागा वापरुन या बुटाला शिवले होते. डेबी विंगहॅम हाय हिल्सची किंमत सुमारे 15.1 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1,24,34,46,495 रुपये आहे.
शुद्ध सोन्याचे बनलेले पॅशन डायमंड शूज
पॅशन डायमंड शूज शुद्ध सोन्यापासून बनवले जातात. ते तयार करण्यासाठी सुमारे 9 महिने लागले. त्याची किंमत 17 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 1,39,99,06,650 रुपये आहे. जादा दुबई आणि पॅशन ज्वेलर्स यांनी संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे. यात दोन 15 कॅरेट डी दर्जाचे हिरे आहेत. याशिवाय ट्रिम सजवण्यासाठी 238 हिऱ्यांचा स्वतंत्रपणे वापर करण्यात आला आहे.
या बुटात हिरे
मून स्टार शूज हे जगातील सर्वात महागडे शूज आहेत. हा शूज शुद्ध सोन्याचा आहे. यात 30 कॅरेटचे हिरे आहेत. तसेच, हे 1576 च्या उल्कापासून बनवले गेले आहे. 24 कॅरेट सोन्यापासून बनवलेल्या या शूजची पहिली जोडी अँटोनियो व्हिएत्री यांनी 2017 साली बनवली होती. हे हेलिकॉप्टरद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आले. या बुटाची किंमत 19.9 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1.63 अब्ज रुपये आहे.