एक्स्प्लोर

जगातील सर्वात 10 महागडी घरं कोणती? मुकेश अंबानींच्या अँटिलियाचा कितवा नंबर? सविस्तर माहिती एका क्लिकवर

तुम्हाला जगातील सर्वात 10 महागडी घरे (Most Expensive Houses In World) माहित आहेत का? उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे अँटिलिया (Antilia) हे निवासस्थानही एक अलिशान आणि महागडं घर आहे.

Most Expensive Houses In World : जगातील अनेक श्रीमंत लोकांची घरे थक्क करणारी आहेत. अनेकांची घरे ही अलिशान राजाड्यांसारखी घरे आहेत. पण तुम्हाला जगातील सर्वात 10 महागडी घरे (Most Expensive Houses In World) माहित आहेत का? भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे अँटिलिया (Antilia) हे निवासस्थान हे देखील जगातील एक अलिशान आणि महागडं घर आहे. जाणून घेऊयात महागड्या घरात अँटिलियाचा कितवा नंबर लागतो याबबातची सविस्तर माहिती.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे घर असलेले अँटिलिया हे मुंबईला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. लोक त्यांचे घर पाहण्यासाठी उत्सुक असतात. असे घर कोणाला नको असते? आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच काही आलिशान आणि ऐतिहासिक घरांबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यांना पाहण्यासाठी लोक लांबून येतात. अँटिलिया हे भारतातील सर्वात महागडे घर आहे. परंतू जगातील सर्वात महाग घर युनायटेड किंगडममधील बकिंगहॅम पॅलेस आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार जगातील टॉप 10 महागड्या घरांबद्दलची माहिती पाहुयात. 

बकिंगहॅम पॅलेस (Buckingham Palace)

लंडनमध्ये बांधलेले हे घर युनायटेड किंगडमच्या राजघराण्याची मालमत्ता आहे. हे ब्रिटिश साम्राज्याच्या अभिमानाचे प्रतीक आहे. बकिंगहॅम पॅलेस हा 1703 मध्ये बांधला आहे. बकिंगहॅम पॅलेसची किंमत 490 कोटी डॉलर एवढी आहे. येथील बागा, सुरक्षा रक्षक आणि बाल्कनी खूप प्रसिद्ध आहेत. दरवर्षी लाखो देश-विदेशातील पर्यटक येथे भेट देत अलतात. 

अँटिलिया (Antilia)

मुकेश अंबानी यांनी मुंबईत हे 27 मजली घर बांधले आहे. त्याची किंमत 200 कोटी डॉलर एवढी आहे. या घरात 3 हेलिपॅड, 168 कार गॅरेज, स्विमिंग पूल, थिएटर आणि स्नो रूम देखील आहे. हे घर बांधण्यासाठी आणि सजवण्यासाठी जगातील सर्वात महागड्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. हे घर सुमारे 4 लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे.

विला लियोपोल्ड (Villa Leopolda)

व्हिला लिओपोल्डा हे घर बेल्जियमचा राजा लिओपोल्ड II याने बांधले होते. फ्रेंच रिव्हिएरामधील Villefranche sur Mer येथे असलेल्या या घराशी संबंधित अनेक कथा आहेत. पहिल्या महायुद्धात लष्करी रुग्णालय म्हणूनही याचा वापर करण्यात आला होता. सध्या व्हिला लिओपोल्डचा वापर संग्रहालय म्हणून केला जात आहे. त्याची किंमत 75 कोटी डॉलर असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिला लेस सेड्रेस (Villa Les Cèdres)

व्हिला लेस सेड्रेस हे घर फ्रेंच रिव्हिएरा वर स्थित आहे. हे 1830 मध्ये बांधले गेले. हे किंग लिओपोल्ड II यांनी 1904 मध्ये खरेदी केले होते. त्याची किंमत 45 कोटी डॉलर असल्याचे सांगण्यात येत आहे. काँगोमधून कमावलेली संपत्ती तो येथे ठेवत असे. येथील ग्रंथालय खूप प्रसिद्ध आहे.

ले पाले बुल्स (Les Palais Bulles)

फ्रान्समधील कान्सजवळ बांधलेले आणि बबल पॅलेस म्हणून ओळखले जाणारे हे घर 1989 मध्ये पूर्ण झाले. हे फ्रेंच व्यापारी पियरे बर्नार्ड यांच्यासाठी बांधले गेले होते. यानंतर फॅशन डिझायनर पियरे कार्डिन यांनी याचा वापर सुरू केला. त्याची किंमत 42 कोटी डॉलर असल्याचे सांगितले जात आहे.

ओडियन टॉवर पेंटहाऊस (Odeon Tower Penthouse)

मोनॅकोजवळ हे आलिशान घर 2015 मध्ये बांधण्यात आले होते. त्याची किंमत सुमारे 33 कोटी डॉलर्स असल्याचे सांगितले जात आहे. येथून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.

चार फेअरफिल्ड तलाव (Four Fairfield Pond)

लाँग आयलंड न्यूयॉर्क येथे असलेल्या या घराची किंमत अंदाजे $250 दशलक्ष आहे. ते 2003 साली पूर्ण झाले. यात 29 बेडरूम आणि 39 बाथरूम आहेत. त्याची मालक इरा रेनार्ट आहे.

18-19 केन्सिंग्टन गार्डन्स (18-19 Kensington Gardens)

लंडनच्या लक्षाधीश क्षेत्र केन्सिंग्टनमध्ये बांधलेल्या या घराची किंमत सुमारे 220 दशलक्ष डॉलर्स आहे. 1840 साली बांधलेला हा बंगला पूर्वी केन्सिंग्टन पॅलेस मैदानाचा भाग होता. त्यात सर्व लक्झरी सुविधा आहेत. त्याच्या वास्तुकलेची जगभरात प्रशंसा होत आहे.

बेयोंसे एंड जे जी यांची मालिबू हवेली (Beyoncé and Jay-Z)

बेयोंसे एंड जे जी  हे संगीत क्षेत्रातील मोठं नाव आहे. बेयॉन्से आणि जे जी. यांना लक्झरीसाठी जीनशैलीसाठी ओळखले जाते. त्यांची वास्तू अप्रतिम अशी आहे. त्याची किंमत अंदाजे 20 कोटी डॉलर्स आहे. ही वास्तू अमेरिकेतील मालिबू येथे आहे.

द एलिसन एस्टेट (The Ellison Estate)

ओरॅकल कॉर्पोरेशनचे संस्थापक लॅरी एलिसन यांच्या या घराची किंमत सुमारे 200 दशलक्ष डॉलर्स आहे. हे वुडसाइड, कॅलिफोर्निया येथे स्थित आहे. त्याची वास्तुकला जपानपासून प्रेरित आहे. येथील बागा पाहण्यासारख्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

घरांच्या बांधकामाचा विक्रम! देशातील 'या' 7 शहरांमध्ये दर तासाला 50 घरांचे बांधकाम

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
VIDEO : सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा अंदाज बदलला, साडीमध्ये ग्लॅमरस अदा दाखवतानाचा व्हिडीओ चर्चेत
सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा तोरा बदलला, साडीमधील ग्लॅमरस अंदाजातील व्हिडीओ चर्चेत
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11AM 12 February 2025Uddhav Thackeray on Sharad Pawar | पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्यानंतर उद्धव ठाकरेंची तीव्र नाराजीSanjay Raut Full PC | पवारांकडून शिंदेंचा सत्कार, ठाकरे गट आक्रमक, संजय राऊतांनी खडेबोल सुनावलेTop 80 | आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
VIDEO : सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा अंदाज बदलला, साडीमध्ये ग्लॅमरस अदा दाखवतानाचा व्हिडीओ चर्चेत
सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा तोरा बदलला, साडीमधील ग्लॅमरस अंदाजातील व्हिडीओ चर्चेत
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार?  जागतिक बाजारातून चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी पुन्हा वेग पकडण्याची शक्यता
जागतिक बाजारातून चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी पुन्हा वेग पकडण्याची शक्यता, शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार?
Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस अन् अजित पवारांची जवळीक वाढली, दोन महिन्यांत राजकारणात मोठे बदल होणार: अंजली दमानिया
अजितदादांशी फडणवीसांची जवळीक वाढली, एकनाथ शिंदेंच्या योजनांना कात्री, राज्यात पुन्हा भूकंप?
Share Market Sensex: शेअर मार्केटमध्ये 2008 पेक्षा वाईट वेळ येणार? गुंतवणुकदारांना बाजारातून पैसे काढण्याचा सल्ला
शेअर मार्केटमध्ये 2008 पेक्षा वाईट वेळ येणार? गुंतवणुकदारांना बाजारातून पैसे काढण्याचा सल्ला
Sanjay Raut: एकनाथ शिंदेंचा सत्कार अन् कौतुक ठाकरेंना झोंबलं; संजय राऊतांनी शरद पवारांना खडे बोल सुनावले
एकनाथ शिंदेंचा सत्कार म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या अमित शाहांचा सत्कार, संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल
Embed widget