IPO : MobiKwik, विशाल मेगा मार्ट, साई लाइफ सायन्सेसचे आयपीओ लिस्ट होताच शेअर बनले रॉकेट, गुंतवणूकदारांची तिजोरी भरली
IPO Listing Today: विशाल मेगा मार्ट, वन मोबिक्विक सिस्टीम्स आणि साई लाइफ सायन्सेस या कंपन्यांचे आयपीओ लिस्ट झाले आहेत. गुंतवणूकारांना या आयपीओतून चांगला परतावा मिळाला आहे.
IPO Listing Today मुंबई : भारतीय शेअर बाजारात बीएसई आणि एनएसईवर तीन मेन बोर्ड आयपीओ लिस्ट झाले आहेत. विशाल मेगा मार्ट, वन मोबिक्विक सिस्टीम्स आणि साई लाईफ सायन्सेसचे आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. मोबिक्विकचा आयपीओ 440 रुपयांवर लिस्ट झाला. दुसरीकडे विशाल मेगा मार्टचा आयपीओ 104 रुपयांवर लिस्ट झाला. तर, साई लाईफ सायन्सेसचा आयपीओ 650 रुपयांना लिस्ट झाला.
विशाल मेगा मार्ट
विशाल मेगा मार्टनं 8 हजार कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणला होता. विशाल मेगा मार्टचा आयपीओ लिस्ट होताना 104 रुपयांवर लिस्ट झाला. या कंपनीनं त्यांचा किंमत पट्टा 78 रुपये निश्चित केला होता. गुंतवणूकदारांना लिस्टिंगला 33.33 टक्के परतावा मिळाला. म्हणजेच एका शेअरमागं 23 रुपयांचा फायदा झाला. सध्या या कंपनीचा शेअर 108 ते 109 रुपयांवर ट्रेड करत आहे. जीएमपीवर जो अंदाज होता त्या प्रमाणं आयपीओ लिस्ट झाल्याचं पाहायला मिळालं.
वन मोबिक्विक सिस्टीम्स
स्टॉक एक्सचेंजवर वन मोबिक्विक सिस्टीम्सच्या आयपीओचं धमाकेदार लिस्टींग झालं आहे. हा देखील आयपीओ जीएमपीच्या अंदाजाप्रमाणं लिस्ट झाला. या आयपीओचा किंमत पट्टा 279 रुपये निश्चित करण्यात आला होता. आयपीओ 440 रुपयांना लिस्ट झाला त्यामुळं गुंतवणूकदारांना एका शेअर मागं 161 रुपयांचा फायदा मिळाला असल्याचं पाहायला मिळालं आयपीओ लिस्ट झाल्यानंतर त्यामध्ये 60 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायाला मिळालं. वन मोबिक्विक सिस्टीम्सचा आयपीओ 500 रुपयांवर ट्रेड करत आहे.
साई लाइफ सायन्सेस
साई लाइफ सायन्सेस आयपीओ ( Sai Life Sciences Limited IPO) 18 टक्के लिस्टिंग गेनसह लिस्ट झाला आहे.कंपनीनं किंमतपट्टा 549 रुपये निश्चित केला होता. जीएमपी पेक्षा अधिक रकमेला आयपीओ लिस्ट झाला आहे.आयपीओ 650 रुपयांवर लिस्ट झाला आहे. त्यानंतर देखील शेअरमध्ये वाढ झाली. सध्या शेअर 722.70 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीचा आयपीओद्वारे 3042 कोटी रुपयांच्या उभारणीचा प्रयत्न होता.
दरम्यान, आज ट्रान्सरेल लायटिंग, ममता मशिनरी, DAM कॅपिटल अॅडव्हायजर, सनाथन टेक्सटाइल्स, कॉनकॉर्ड एनवायरो सिस्टीम्स हे पाच मेनबोर्ड आयपीओ खुले झाले आहेत.
इतर बातम्या :
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)