एक्स्प्लोर

Mhada Pune Lottery: म्हाडा पुणे मंडळातर्फे येत्या मार्चमध्ये 3000 घरांच्या विक्रीसाठी सोडत, शिवाजीराव आढळराव पाटील यांची घोषणा 

Mhada Pune Lottery: म्हाडा पुणे मंडळातर्फे 4186 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात पार पडली. 2,15,965 प्राप्त अर्जदारांमधून सोडत काढण्यात आली.   

Mhada Pune Lottery  मुंबई: गेल्या अडीच वर्षात पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे सुमारे 25 हजार परवडणारी घरे केवळ 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.  म्हाडाचा पारदर्शक कारभार व दर्जेदार बांधकामामुळे जनतेचा म्हाडावरील विश्वास वृद्धिंगत होत असून 4186 घरांसाठी 2,15,965 प्राप्त अर्ज हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. सोडतीची सदर शृंखला पुढे चालू ठेवत म्हाडा पुणे मंडळातर्फे येत्या मार्चमध्ये सुमारे 3000 परवडणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी सोडत काढण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पुणे मंडळाचे सभापती  शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज केले.   

म्हाडाचा विभागीय घटक पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूरसांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील 4186 सदनिकांच्या विक्रीसाठी पुणे मंडळाचे सभापती  शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते आज पुणे जिल्हा परिषदेच्या मा. शरदचंद्र पवार सभागृहात संगणकीय सोडत काढण्यात आली. 'म्हाडा'चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  अनिल वानखडे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरेंसिंग), पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी  राहुल साकोरे आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

म्हाडा पुणे मंडळातर्फे येत्या मार्चमध्ये 3000 घरांच्या विक्रीसाठी सोडत

पुणे मंडळाचे सभापती  शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, म्हाडा ही गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारी अग्रगण्य संस्था आहे. विविध उत्पन्न गटातील जनतेसाठी वाजवी किंमत उत्कृष्ट दर्जा असलेली घरे बांधण्यासाठी कार्यरत असणारी संस्था असा 'म्हाडा'चा नावलौकिक आहे. म्हाडा पुणे मंडळातर्फे शिरूर येथे 574 सदनिका व खराबवाडी येथे 194 व्यापारी गाळे बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ताथवडे येथील फेज-1 प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. त्यानुसार पुढील फेज-2 मधील 80  टक्के काम पूर्ण होवून लवकरच 750 निवासी व अनिवासी गाळे सोडतीत समाविष्ट करण्यात येतील.  20 टक्के सर्वसमावेशक योजनेतून काही घरे उपलब्ध होणार आहेत. म्हाळुंगे, सोलापूर, बारामती, पुरंदर येथेही गृहनिर्माण प्रकल्प उभारणीचे काम सुरू असल्याचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. 

म्हाडा पुणे मंडळाला कमाल जमीन धारणा कायद्याअंतर्गत शासनाकडून उपलब्ध झालेल्या चंदनगर खराडी येथील 15गुंठे जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. म्हाडाच्या जुन्या वसाहतींच्या पुनर्विकासाठी व सर्वसामान्यांना अधिकाधिक परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी म्हाडा पुणे मंडळ प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.शिवाजीराव आढळराव पाटील पुढे म्हणाले की, 20 टक्के सर्वसमावेशक योजनेच्या सोडतीतील विजेत्यांना बांधकाम व्यावसायिकांकडून वाढीव शुल्क आकारणीच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर अनेक प्रकरणांमध्ये मध्यस्थी करून नियमानुसानुसार वाढीव शुल्क आकारणी रद्द करण्याचे निर्देश देत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविल्याचे सांगितले. 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत यशस्वी अर्जदारांना इमारतीतील 50 टक्के पार्किंग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. 

म्हाडा वसाहतीतील रहिवाशांचे प्रश्न सुटावेत यासाठी म्हाडा पुणे मंडळाच्या कार्यालयामध्ये दर गुरुवारी जनता दरबार कार्यक्रम घेण्यात येत असून या माध्यमातूनही सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होत आहे. अर्जदारांच्या विनंतीनुसार, काही तांत्रिक अडचणी व निवडणूक आचारसंहिता या कारणांमुळे अर्ज भरण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली. निवडणूक आचारसंहिता असल्याने सोडतीला विलंब झाला. सदर ऑनलाईन सोडत ही संपूर्णपणे पारदर्शी असून  म्हाडाने कोणत्याही मध्यस्थ, एजंटची नेमणुक केलेली नसून संगणकीय सोडतीमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होऊ शकत नसल्याचे   शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

अनिल वानखडे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षातील म्हाडा पुणे मंडळाने काढलेली ही सातवी संगणकीय सोडत असून मंडळाने मोठ्या प्रमाणात परवडणारी घर उपलब्ध करून दिली आहेत. म्हाडा पुणे मंडळाचे सभापती  शिवाजीराव आढळराव पाटील व म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल  यांच्या प्रयत्नामुळे मंडळाला गृह बांधणीसाठी जमिनी उपलब्ध होत आहेत. म्हाडा पुणे मंडळाच्या माध्यमातून अशाच प्रकारे यापुढे देखील परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे  अनिल वानखडे यांनी सांगितले.

 राहुल साकोरे म्हणाले की, आजच्या सोडतीमधून विजेत्या अर्जदारांनी विहित मुदतीत ऑनलाईन पध्दतीने म्हाडाकडे रकमेचा भरणा करणे गरजेचे असून अर्जदारास विजेती सदनिका स्विकारणे अथवा नाकारणे याबाबतचा निर्णय स्विकृतीपत्रात दिलेल्या मुदतीत घ्यावा लागणार आहे. म्हाडाच्या वतीने IHLMS २.० या नवीन सॉफ्टवेअर प्रणालीमुळे सामान्य नागरिकांना घरबसल्या वेबसाईट किंवा मोबाइल अपच्या माध्यमातून नोंदणी करणे, अर्ज भरणे व ऑनलाईन पेमेंट या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच या प्रक्रियेमध्ये अर्जदारांची पात्रता निश्चिती हि नोंदणीच्या वेळेला करण्यात आलेली आहे. काही विजयी उमेदवारांना प्रवर्गनिहाय कागदपत्रे सादर करण्याच्या अटीवर (Allowed with Condition) देकारपत्र देण्यात येईल. 

आपली प्रलंबित कागदपत्रे लवकरात लवकर ऑनलाइन पध्दतीने सादर केल्यानंतर देकारपत्राचे वितरण करणे सोईस्कर होईल. सोडतीनंतर सदर प्रक्रियेत लागणार्‍या वेळेची बचत होते. सोडतीनंतर त्वरीत अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने पुढील देकार पत्र व इतर पत्रव्यवहार त्यांच्या लॉग इन आय डी वर पाठविला जाणार आहे. तसेच २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील रिक्त सदनिका या प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सोडतीसाठी बुक माय होम या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा. 

 म्हाडाच्या अधिकृत समाज माध्यम व्यासपीठांवरून सोडतीचा कार्यक्रम सुमारे 90 हजार लोकांनी ऑनलाईन थेट घरबसल्या बघितला.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India won T20 World Cup : सलग दुसऱ्यांदा भारतानं कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव, संघाला नेमकं किती मिळालं बक्षीस 
India won T20 World Cup : सलग दुसऱ्यांदा भारतानं कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव, संघाला नेमकं किती मिळालं बक्षीस 
इराण-इस्रायल युद्धामुळं परदेशी गुंतवणुकदारांचा विश्वास डळमळीत, 4 दिवसात काढले 21 हजार कोटी रुपये
इराण-इस्रायल युद्धामुळं परदेशी गुंतवणुकदारांचा विश्वास डळमळीत, 4 दिवसात काढले 21 हजार कोटी रुपये
पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त 2 लाख रुपये गुंतवा, घरबसल्या 90 हजार रुपयांचा नफा मिळवा
पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त 2 लाख रुपये गुंतवा, घरबसल्या 90 हजार रुपयांचा नफा मिळवा
Meesho Income Tax: ई-कॉमर्स कंपनी Meesho ला आयकर विभागाने धाडली तब्बल 1500 कोटींची नोटीस; नेमकं कारण काय?
ई-कॉमर्स कंपनी Meesho ला आयकर विभागाने धाडली तब्बल 1500 कोटींची नोटीस; नेमकं कारण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Hardik Pandya Credits Girlfriend Mahieka Sharma: भर मैदानात मिठी, गालावर किस; हार्दिककडून वर्ल्डकप जिंकल्याचं सर्व श्रेय माहिकाला, आता तिनंही पोस्टवर लिहिलीय 'दिल की बात'
भर मैदानात मिठी, गालावर किस; हार्दिककडून वर्ल्डकप जिंकल्याचं सर्व श्रेय माहिकाला, आता तिनंही पोस्टवर लिहिलीय 'दिल की बात'
Nashik Crime: डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, भावाकडून मनोविकारतज्ज्ञ निलेश जेजुरकरांवर गंभीर आरोप , म्हणाला, 'चर्चेसाठी बोलावलं पण...'
नाशिकमध्ये माईंड क्लिनिक चालवणाऱ्या डॉ. निलेश जेजुरकरांच्या पत्नीने आयुष्य संपवलं, भावाचे गंभीर आरोप, म्हणाला...
Hardik Pandya-Mahika Sharma T20 World Cup 2026: मिठी मारली, मैदानात हार्दिक पांड्यासोबत नाचली...; पुढे महिकाने जे केलं संपूर्ण ग्राऊंड स्टाफ बघत बसलं, पाहा PHOTO
मिठी मारली, मैदानात हार्दिक पांड्यासोबत नाचली...; पुढे महिकाने जे केलं संपूर्ण ग्राऊंड स्टाफ बघत बसलं, पाहा PHOTO
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 Team India Celebration: कुणी रडलं, कुणी माती चेहऱ्याला लावली; टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या सेलिब्रेशनाचे भावूक करणारे दहा PHOTO
कुणी रडलं, कुणी माती चेहऱ्याला लावली; टीम इंडियाच्या सेलिब्रेशनाचे भावूक करणारे दहा PHOTO
Sandeepa Virk Share Tihad Jail Experience: 'दररोज मृत्यूसाठी देवाला साकडं घालायचे...'; तिहार जेलमध्ये शिक्षा भोगून आलेली अभिनेत्री ढसाढसा रडली, आतल्या गोष्टी सांगताना म्हणाली...
'दररोज मृत्यूसाठी देवाला साकडं घालायचे...'; तिहार जेलमध्ये शिक्षा भोगून आलेली अभिनेत्री ढसाढसा रडली, आतल्या गोष्टी सांगताना म्हणाली...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: सगळ्यांना बाहेर काढलं, खिडकीवरील पडदा लावला...; विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन जय शाह सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरला कुठे घेऊन गेले?, VIDEO
सगळ्यांना बाहेर काढलं, खिडकीवरील पडदा लावला...; विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन जय शाह सूर्यकुमार-गंभीरला कुठे घेऊन गेले?, VIDEO
India won T20 World Cup : विश्वविजयी भारत! गौतम गंभीरनेही रचला इतिहास, एमएस धोनीला मागे टाकत तिसऱ्यांदा कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव
विश्वविजयी भारत! गौतम गंभीरनेही रचला इतिहास, एमएस धोनीला मागे टाकत तिसऱ्यांदा कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव
Embed widget