एक्स्प्लोर

Mhada Mumbai Lottery: म्हाडाकडून मुंबईतील 102 घरांसाठी लॉटरी, 5 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु, संपूर्ण माहिती

Mhada Mumbai Lottery: म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील १२० सदनिकांच्या विक्रीसाठी 5 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे.

मुंबई: म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील 120  सदनिका ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया दि. 05 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून सुरू होणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत ही संधी उपलब्ध करून देण्यात येत असून, यापूर्वी सोडतीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मात्र विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदनिकांचा यात समावेश आहे. इच्छुक नागरिकांनी https://bookmyhome.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.

Mhada Mumbai Lottery : म्हाडाची घरे कोणत्या भागात?

अर्जदारांनी अर्ज करण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, योजना/सदनिका निश्चिती करणे या प्रक्रियेला दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून सुरुवात होणार आहे. सदनिकेच्या विक्री किमतीचा 10 टक्के रकमेचा भरणा सदनिका निश्चिती केल्यानंतर 48 तासांच्या आत अर्जदाराने करणे आवश्यक आहे.

'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर मंडळाने बांधलेल्या शिंपोली कांदिवली येथील 08 सदनिका, चारकोप सेक्टर-8 कांदिवली येथील 02 सदनिका, अँटॉप हिल-वडाळा येथील 27 सदनिका, तुंगा पवई येथील 44 सदनिका, पीएमजीपी मानखुर्द येथील 01 सदनिका, मालवणी मालाड येथील 01 सदनिका, गायकवाड नगर मालवणी-मालाड येथील 01 सदनिका अशा 84 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

तसेच विकास नियंत्रण नियमावली 33(5) (7) अंतर्गत मंडळाला प्राप्त झालेल्या सदनिकांमधून घाटकोपर पूर्व येथील 02 सदनिका, कन्नमवार नगर विक्रोळी येथील 01 सदनिका, अँटॉप हिल-वडाळा येथील 08 सदनिका, भायखळा येथील 06 सदनिका, ताडदेव येथील 06 सदनिका, लोअर परळ येथील 04 सदनिका, सायन येथील 02 सदनिका, जेव्हीपीडी अंधेरी पश्चिम येथील 07 सदनिका अशा 36 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

पात्रतेच्या अटी

अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे, अर्जदार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. अर्जदार अविवाहित असल्यास स्वतःचे आधार कार्ड/पॅन कार्ड, अर्जदार विवाहित असल्यास पती-पत्नी यांचे आधार कार्ड/पॅन कार्ड, अर्जदार घटस्फोटीत असल्यास सक्षम न्यायालयाच्या निकालाची प्रमाणित प्रत अथवा अपील दाखल असल्यास त्याची प्रत (अंतिम निकालाच्या प्रती शिवाय सदनिकेचा ताबा देण्यात येणार नाही) आवश्यक आहे. डिक्री प्रमाणपत्राशिवाय सदनिकेचे वितरण केले जाणार नाही. आरक्षण प्रवर्गाकरिता जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असून सदर प्रमाणपत्र नसल्यास जातीचा दाखला लागणार आहे. आधार कार्डशी संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक लागणार असून अर्जदार आणि त्यांचे पती-पत्नी यांचे दोघांचे ईमेल आयडी अथवा अविवाहित असल्यास स्वतःचा ईमेल आयडी लागणार आहे.

अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारास बुक माय होमसाठी बटन दिसेल. त्यावर विंग/इमारत क्रमांक, सदनिका क्रमांक, मजला याची माहिती उपलब्ध असेल. अर्जदार त्यांना हवी असणारी सदनिका उपलब्ध असल्यास ती निवडू शकतात.

अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्ज फक्त पाहता येऊ शकेल. अर्जदाराने त्याचा ऑनलाईन अर्ज ओपन करून त्यामध्ये कोणताही फेरफार करणे शक्य होणार नाही. अर्जदाराने प्रिंटेड पावतीमधील माहिती वाचून बरोबर असल्याची खात्री करावी.

सदनिका निश्चिती केल्यानंतर 48 तासांच्या आत सदनिकेच्या विक्री किंमतीच्या दहा टक्के रक्कम भरणा आवश्यक असेल. रकमेचा भरणा केल्यानंतर ती म्हाडाकडे प्राप्त झाल्याची खात्री करून अर्जदारास ऑनलाईन पद्धतीने सदनिकेची रक्कम भरून घेण्यासाठी तात्पुरते देकार पत्र देण्यात येईल.

अर्जदार यांना सदनिकेची निश्चिती करण्यापूर्वी आवश्यक अनामत रक्कम व अर्ज शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे. अर्जदार यांनी अनामत रकमेचा भरणा करून सदनिका निश्चिती केल्यानंतर 48 तासांच्या आत  सदनिकेच्या विक्री किमतीच्या 10 टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. या कालावधीमध्ये अर्जदार यांनी सदनिकेच्या विक्री किमतीच्या १० टक्के कमेचा भरणा न केल्यास सदनिकेवरील दावा आपोआप रद्द होईल व भरलेली अनामत रक्कम संपूर्ण मंडळाकडे जमा करण्यात येईल.

अनामत रकमेचा भरणा करून अर्जदार यांना एका अनामत रकमेवर एक सदनिका एक वेळेस निश्चितीची करणे शक्य होईल यानंतर अर्जदार यांना तीच सदनिका निश्चिती करावी की झाल्यास ती सदनिका 48 तासानंतर निश्चिती करता येऊ शकेल परंतु यासाठी पुन्हा अनामत रकमेचा भरणा करणे आवश्यक असेल.

जाहिरातीमधील वेळोवेळी रिक्त सदनिकांचा तपशील ऑटोमॅटिक वेबसाईटवर दिसेल या अनुषंगाने अर्जदार अर्ज करू शकतील. अर्जदार यांना सर्व रकमा एनईएफटी/आरटीजीएस/नेट बँकिंग/यूपीआय/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने करणेच आवश्यक आहे.

सदनिकांची विक्री किंमत भरणा करावयाच्या अटी व शर्ती:-

1. अर्जदार यांनी सदनिकेची निश्चिती केल्यानंतर Online पध्दतीने सदनिकेच्या विक्री किंमतीच्या 10 टक्के रक्कम 48 तासांच्या आत भरणे आवश्यक असेल. या कालावधीमध्ये रक्कमेचा भरणा न केल्यास सदनिकेवरचा दावा आपोआप रद्द समजण्यात येईल व भरणा केलेली अनामत रक्कम मंडळाकडे जमा करण्यात येईल.

2. अर्जदार यांच्याद्वारे सदनिकेची निश्चितीकरुन सदनिकेच्या विक्री किमंतीच्या 10 टक्के रक्कमेचा भरणा केल्यानंतर उर्वरित रक्कम भरण्यासाठी Online पध्दतीने तात्पुरते देकारपत्र देण्यात येईल. अर्जदार यांना तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर पुढील 90 दिवसांच्या आत उर्वरित रक्कम भरणे आवश्यक आहे. सदर कालावधीत भरणा न केल्यास अधिकतम 90 दिवसांची मुदतवाढ घेऊन नियमानुसार व्याज आकारणीसह रक्कम भरणे बंधनकारक आहे. यामध्ये कसूर केल्यास सदनिकेचे वितरण कोणतेही कारण न देता, मुदत संपताच रद्द करण्यात येईल.

3. तात्पुरते देकार पत्र दिल्यानंतर कोणत्याही कारणास्तव अर्जदाराने सदनिका नाकारली, विक्री किंमतीचा भरणा विहीत मुदतीमध्ये न केल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव वितरण रद्द झाल्यास अर्जदाराने सदनिकेच्या किंमतीपोटी भरलेल्या रकमेतून, संबधित सदनिकेच्या विक्री किंमतीच्या 01 टक्के एवढी रक्कम समपहरण/वजावट करुन उर्वरित रक्कम कोणतेही व्याज न देता परत करण्यात येईल.

4. सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करण्यासाठी अर्जदारास वित्तिय संस्थेकडून गृहकर्ज घ्यावयाचे असल्यास अशा अर्जदारांनी ज्या वित्तिय संस्थेकडून कर्ज घ्यावयाचे आहे, त्या वित्तिय संस्थेचे Pre-Sanctioned Letter आपल्या Login ID मधुन upload करणे गरजेचे आहे. यानंतर सदर बँकेच्या   नावे व अर्जदाराच्या Login ID मध्ये कार्यालयाद्वारे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल.

5. सदनिकेच्या रकमेचा व मुद्रांक शुल्काचा भरणा केल्यानंतर सदनिकेचे वाटप व ताबा पत्र देण्यात येईल.

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने या योजनेतील सदनिकांच्या वितरणासाठी किंवा याबाबतच्या कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतिनिधी/ सल्ला देणारा वा प्रॉपर्टी एजंट म्हणून नियुक्त केलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर पैशांचा व्यवहार केल्यास त्याला मुंबई मंडळ (म्हाडा) जबाबदार राहणार नाही. तसेच अर्जदारास कोणी दलाल / व्यक्ती परस्पर अर्ज विक्री किंवा म्हाडाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करणे इ. बाबी करताना आढळल्यास म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी/प्राधिकरण यांच्याशी 022-66405448 दूरध्वनी क्रमांकावर तसेच मिळकत व्यवस्थापक/पणन/ मुंबई मंडळ यांच्याशी 022-66405123 दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. अर्जदारांनी अधिक माहितीसाठी 986998800 हेल्पलाइन क्रमांकावर किंवा उपमुख्य अधिकारी (पणन), मुंबई मंडळ यांच्याशी ई-मेल: dycoem1@gmail.com वर संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यापुर्वी अर्जदारांनी माहिती पुस्तिका व जाहिरात काळजीपुर्वक वाचावी, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Embed widget