एक्स्प्लोर

Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर

Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडानं मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली असून अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (Mhada) म्हणजेच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2023 घरांची (Mhada Mumbai Lottery 2024) सोडत 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. म्हाडानं मुंबईतील या घरांसाठी सोडत जाहीर करत ऑगस्ट महिन्यात जाहिरात प्रसिद्ध केली होती. 9 ऑगस्टपासून ते 4 सप्टेंबर अशी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. मात्र, म्हाडानं नंतर अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिली होती. या  मुदतवाढीचा फायदा झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईतील या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

म्हाडाच्या पोर्टलवर कालपर्यंत 68651 व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. तर, अनामत रक्कम जमा करणाऱ्यांची संख्या 49286  वर पोहोचली आहे. यासंदर्भात नवभारत टाइम्सनं वृत्त दिलं आहे. 

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी शेवटचे 7 दिवस 

म्हाडानं मुंबईतील या घरांसाठी पहिल्यांदा केवळ 26 दिवसांची मुदत दिली होती. मात्र, कागदपत्र जमा करण्यात येणाऱ्या अडचणी आणि इतर गोष्टींचा विचार करुन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिल्यानं सोडतीची तारीख देखील बदलण्यात आली होती. जुन्या वेळापत्रकानुसार म्हाडाकडून सोडत 13 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार होती. आता नव्या वेळापत्रकानुसार 8 ऑक्टोबरला घरांची सोडत जाहीर केली जाईल. 

मुंबई बोर्डाच्या या लॉटरीत गोरेगाव पश्चिम, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, अँटॉप हिल वडाळा, शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड, दादर, लोअर परेल, कुर्ला, बोरिवली, मुलुंड, ओशिवरा, वडाळा, माझगाव,  घाटकोपर, माहिम, कांदिवली  यासह अन्य ठिकाणच्या घरांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 

म्हाडानं जाहीर केलेल्या घरांमध्ये अत्यल्प गटासाठी 359 घरं, अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी 627, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरं निश्चित करण्यात आलेली आहेत. 

म्हाडानं खासगी विकासकांकडून मिळालेल्या 370 घरांच्या किंमती कमी केल्या होत्या. या घरांच्या किंमती 12 लाख ते 75 लाख रुपयांनी कमी केल्या आहेत.  म्हाडानं विकासकांकडून मिळालेल्या घरांच्या किंमती 10 ते 25 टक्के कमी केल्या आहेत. मुदतवाढ आणि घरांच्या किंमती केल्यानं अर्ज सादर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. म्हाडानं मुदतवाढ दिल्यानंतर या घरांच्यासाठी अर्ज करण्याची संख्या 46 हजारांनी वाढली आहे. 

दरम्यान, म्हाडानं गेल्यावर्षी 4082 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. यंदाच्या लॉटरीत अर्ज करण्यासाठी 19 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट आणि अॅपवर नोंदणी करुन अर्ज करता येईल. 

इतर बातम्या : 

Mhada Lottery 2024 : 370 घरांच्या किंमती कमी केल्या पण म्हाडानं कुर्ल्यातील 'त्या' घरांच्या किंमती 13 लाख रुपयांनी वाढवल्या, कारण समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणारPune Ajit Pawar Vadapav : बाप्पांच्या विसर्जनात Ajit Pawar यांनी घेतला वडापावचा आस्वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget