Maharashtra News Live update : नाना पटोलेंचे पाय धुणारा नॉट रिचेबल, शेगावमधील काँग्रेसचे कार्यकर्ते, नेत्यांना न बोलण्याची तंबी!
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) आता राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आपापल्या नेत्यांकडे लॉबी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची (State Assembly Election) तयारीही चालू झाले आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या त्यासाठी बैठका चालू आहेत. दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी पावसाने (Rain Update) दडी मारली आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या धारा बरसत आहेत. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या बाबींची माहिती वाचा एका क्लिकवर...
ओबीसी आंदोलनावर बंजरग सोनवणेंनी बोलणं टाळलं
मराठा समाजापाठोपाठ ओबीसी समाज सध्या आरक्षण वाचविण्यासाठी आक्रमक बनला आहे. त्यावर बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी ओबीसीच्या उपोषणाविषयी बोलणे टाळले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुदत दिलेली आहे. त्यात मी बोलणं संयुक्तिक नाही. मात्र, मला सरकारवर बोलायचं नाही. सरकार कशात गंभीर आहे आणि कशात नाही यावर मी बोलणं संयुक्तिक नसून त्यात काही बोलायचं नाही, असे म्हणत सोनवणे यांनी बोलणे टाळले आहे.
नाना पटोलेंचे पाय धुणारा नॉट रिचेबल, शेगावमधील काँग्रेसचे कार्यकर्ते, नेत्यांना न बोलण्याची तंबी!
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं कार्यकर्त्यांने पाय धुण्याच प्रकरण.
शेगाव येथील कार्यकर्त्यांना व नेत्यांना यासंबंधी न बोलण्याची नेत्यांनी तंबी दिल्याची माहिती.
याप्रकरणी काँग्रेस बॅकफूटवर पडल्याने काँग्रेस नेत्यांनी कार्यकर्त्यांना न बोलण्याची तंबी दिल्याची माहिती.
पाय धूनारा कार्यकर्ता विजय गुरव हा सकाळ पासून नॉट रीचेबल.
विजय गुरव यांच्या घरी शेगाव जवळील कालखेड या गावी चौकशी केली असता ते बाहेरगावी गेल्याची माहिती त्यांच्या पत्नी वर्षा गुरव यांनी दिली आहे.























