एक्स्प्लोर

Digital Satbara : डिजिटल सातबारा, 8-अ आणि फेरफार उताऱ्यांना कायदेशीर मान्यता, डाऊनलोड कसे करायचे? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या 

Digital Satbara : डिजिटल सातबारा, 8-अ उतारा आणि फेरफार महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड कसे करायचे ते जाणून घेणार आहोत.

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागानं डिजिटल सातबारा, 8-अ आणि फेरफार उताऱ्यांना कायदेशीर मान्यता दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं सातबारा उतारा, 8 अ उतारा आणि  फेरफार यासाठी तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जावं लागणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वेबसाईट वरुन डिजिटल सातबारा डाऊनलोड करता येईल जो सर्व सरकारी, निमसरकारी आणि बँकिंग आणि न्यायालयीन कामासाठी पूर्णपणे वैध असेल. आपण डिजिटल सातबारा कसा डाऊनलोड करायचा हे जाणून घेणार आहोत. 

Digital Satbara : डिजिटल सातबाऱ्यासंदर्भात नेमका निर्णय काय?

डिजिटल 7/12, 8-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.या निर्णयामुळे डिजिटल 7/12 ला अधिकृत मान्यता मिळेल. यासाठी फक्त 15 रुपये मध्ये शुल्क भरावं लागेल. डिजिटल सातबाऱ्यामुळं तलाठ्याच्या सही-स्टॅम्पची गरज संपली आहे. डिजिटल स्वाक्षरी, QR कोड, आणि 16 अंकी पडताळणी क्रमांक असलेले 7/12, 8-अ व फेरफार उतारे आता सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग व न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे वैध मानले जाणार आहेत.  हा निर्णय शेतकरी, जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.  

डिजिटल सातबारा, 8 अ आणि फेरफार कसा डाऊनलोड करायचा?

स्टेप 1 : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या महाभूमीच्या https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/   या वेबसाईटला भेट द्या. 

स्टेप 2 : ओटीपी बेस्ड लॉगीन पर्याय निवडून मोबाईल क्रमांक नोंदवा, त्यानंतर ओटीपी फोनवर येईल. तो नोंदवून लॉगीन करा.

स्टेप 3: जिल्हा, तालुका, गाव  निवडा. अंकित सातबारा की अक्षरी सातबारा पर्याय निवडा. 

स्टेप 4: सर्वे नंबर किंवा गट क्रमांक शोधा त्यानंतर सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडा. पीक पाहणीचा डाटा आवश्यक असल्यास त्याबाबतचा पर्याय निवडा. 

स्टेप 5 :  एका उताऱ्यासाठी आवश्यक असणारी 15 रुपयांच्या रकमेनं ऑनलाईन पेमेंट द्वारे रिचार्ज करा. रिचार्च केल्यानंतर ऑनलाईन सातबारा डाऊनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. हा सातबारा पीडीएफ स्वरुपात असेल. 

डिजीटल सातबारा डाऊनलोड करण्याचा दुसरा पर्याय

नवीन यूजर नोंदणी पर्यायावर तुमचं नाव, जन्मतारीख, मोबईल क्रमांक, ई मेल आयडी, पत्ता, जिल्हा, अशी सर्म माहिती भरावी लागेल. त्यानंतर लॉगीन आयडी नोंदवा, तो उपलब्ध असल्यास तुम्हाला मिळेल. त्यानंतर लॉगीन केल्यास वरील स्टेपचा वापर करुन सातबारा, 8 अ उतारा आणि फेरफार डाऊनलोड करता येईल.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget