एक्स्प्लोर

राज्य सरकार आज सादर करणार अर्थसंकल्प, कोणकोणत्या घोषणा करणार?

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात सरकार नेमक्या काय घोषणा करणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे आज (28 जून) आज अर्थसंकल्प (Maharashtra Satate Budget 2024) सादर केला जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात चांगलाच फटका बसला. लोकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतं दिली. त्यामुळे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना या अर्थसंकल्पाला महत्त्व आले आहे. यावेळी राज्य सरकार तरुण, महिला, शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या घोषणा आणि आकर्षक घोषणा करण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री अजित पवार हे विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करतील.

बेरोजगार तरुणांना 5 हजारांचा भत्ता?

यावेळच्या अर्थसंकल्पात राज्य सरकार अनेक तरतुदी करण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना राबवून राज्यातील गरीब महिलांना 1200 ते 1500 रुपये दरमहा देण्याची तरतूद राज्य सरकार करू शकते. तसेच बेरोजगार तरुणांनाही दरमहा पाच हजार रुपयांचा भत्ता देण्याचीही राज्य सरकार तरतूद करणय्चाी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील सुमारे पाच लाख युवकांना या योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा मानस असल्याचे बोलले जात आहे. ही तरतूद केल्यास सरकारचा हा एक ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल. 

शेतकऱ्यांसाठी नेमके काय? 

राज्य सरकार शेतकऱ्यांसाठीही मोठी आणि भरीव तरतूद करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनाही नव्याने लागू करू शकते. सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद चालू आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांना खुश करण्यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या तरतुदी करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने महायुतीला मतं दिली नाहीत. त्यामुळे हीच बाब विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी मुस्लीम समाजासाठीही सरकार काही तरतुदी करण्याची शक्यता आहे.

पेट्रोल डिझेलचा दर कमी होणार का?

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करावी, अशी मागणी केली जाते. विधानसभा निवडणूक जवळ आलेली असताना राज्य सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून यावरही काही निर्णय घेते का? हे पाहावे लागणार आहे. 

लोकसभेत फटका विधानसभेसाठी सावधगिरी

महायुतीचे घटकपक्ष भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट) यांना चांगलाच फटका बसला. लोकांनी भाजपच्या तर लक्षणीय जागा कमी झाल्या. हीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही होऊ नये यासाठी महायुती यावेळी खबरदारी घेत आहे. त्यासाठीच सावधगिरी म्हणून यावेळच्या अर्थसंकल्पात ओबीसी, मराठा, मुस्लीम या घटकांसह तरुण, महिला यांनादेखील खुश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल.  

हेही वाचा :

श्रीमंत होण्याची नामी संधी, 'हे' पाच शेअर्स तुम्हाला करू शकतात मालामाल

सोनं खातंय भाव! कधीकाळी 63 रुपयांत यायचं एक तोळा सोनं, आज थेट 71 हजारांच्या पुढे

घर खरेदी करणाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule on Sunil tingre : पोर्श प्रकरणात बदनामी झाली तर कोर्टात खेचेन; शरद पवारांना नोटीस- सुळेABP Majha Headlines :  7 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  9  नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
Embed widget