LPG Subsidy : केंद्र सरकारचं सर्वसामान्यांना 'दिवाळी गिफ्ट'? एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता
LPG Cylinder : सणासुदीच्या काळात एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहे.
LPG Cylinder Price May Drop : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना केंद्र सरकारडून (Central Govt) मोठी भेट मिळू शकते. सणासुदीच्या काळात एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे केंद्र सरकार सर्वसामान्यांना दिवाळीचं गिफ्ट (Diwali Gift) देण्याच्या तयारीत आहे. गेल्या दोन वर्षामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या ((LPG Cylinder) दरात 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एलपीजी सिंलेडरच्या दरात कपात करण्यासाठी केंद्र सरकार अतिरिक्त सबसिडी लागू करण्याच्या तयारीत आहे. यासाठी केंद्र सरकार 25,000 ते 30,000 कोटी रुपये खर्च करु शकते. दरम्यान, ही रक्कम अंदाजे वर्तवण्यात येत आहे. यासाठी लवकरच केंद्र सरकारपाऊल उचलण्याची शक्यता आहे.
एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ
गेल्या काही काळात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 244 रुपयांची वाढ झाली आहे. तर मागील दोन वर्षांच्या काळात एलपीजी गॅस सिलेंडरच्या ((LPG Cylinder) दरात 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याआधी जुलै महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. सध्या दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1053 रुपये आणि सबसिडी असणाऱ्या गॅस सिलेंडरची किंमत 853 रुपये आहे. तर मुंबईमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1052 रुपये आहे.
अतिरिक्त सबसिडी देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरु
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून एलपीजी गॅससाठी अतिरिक्त अनुदान देण्यावर गांभीर्याने विचार सुरू आहे. अतिरिक्त अनुदान केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेसाठी अर्थसंकल्पात आधीच दिलेल्या अनुदानापेक्षा वेगळं असेल. अलीकडेच सरकारी तेल कंपन्यांनी 19.2 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 91.50 रुपयांनी कमी केली होती. त्यानंतर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरचा दर 1,976 रुपयांवरून 1,885 रुपयांवर आला आहे.
ऑगस्ट महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात
ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक LPG सिलिंडरच्या (19 किलो) किमती कमी झाल्यामुळे LPG सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला होता. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली होती. यानंतर मुंबई आणि दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 36 रुपयांनी कमी झाली. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये सिंलेंडर 36.50 रुपयांनी स्वस्त झाला.
दरवाढीचं कारण काय?
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत तेल आणि गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ज्याचा थेट परिणाम देशातील एलपीजीच्या किंमतीवर होताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत एलपीजीच्या किमती 28 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दुसरीकडे, गॅसच्या किमतींचा आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या सौदी सीपीने या कालावधीत 300 टक्क्यांनी झेप घेतली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या