एक्स्प्लोर

LPG Gas Price Hike : एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ; जाणून घ्या नव्या किंमती

LPG Gas Price Hike : व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर दरात 104 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे.

LPG Gas Price Hike : महागाईचा सामना करत असलेल्या जनेतवरील दरवाढीचा बोझा आणखी वाढणार आहे. आज मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 104 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात नसून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आली आहे. मागील महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 268.50 रुपये वाढ करण्यात आली होती. 

इंडियन ऑइल कंपनीच्या दरानुसार,  दिल्लीत 19 किलोच्या LPG सिलेंडरसाठी 2355.50 रुपये मोजावे लागतील. 30 एप्रिलपर्यंत केवळ 2253 रुपये इतकी एका सिलेंडरची रक्कम होती. कोलकात्यात 2351 ऐवजी 2455 रुपये, मुंबईत 2205 ऐवजी 2307 रुपये खर्च करावे लागणार आहेत. चेन्नई, तामिळनाडूमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 2406 रुपयांवरून 2508 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. 

व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात वाढ झाल्याने बाहेर खाणे आणखी महाग होण्याची शक्यता आहे. या दरवाढीचा परिणाम हॉटेल, खाद्य पदार्थाचे स्टॉल, कॅटरिंगच्या दरावर होण्याची शक्यता आहे.

घरगुती ग्राहकांना दिलासा 

गॅस कंपन्यांनी घरगुती ग्राहकांना या महिन्यात दिलासा आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. मुंबईत विना अनुदानीत गॅस सिलिंडरची किंमत 949.50 रुपये आहे. तर, दिल्लीत विना अनुदानीत 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचे दर 949.50 रुपये झाले आहेत. तर कोलकात्यात गॅस सिलिंडरचे दर 976 रुपये आहेत. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा सर्वाधिक दर बिहारच्या पाटणामध्ये आहे. पाटणामध्ये 1039.50 रुपये इतका दर आहे.

सीएनजी गॅसच्या दरात वाढ

पेट्रोल, डिझेल दरवाढीने आधीच सामान्यांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे आता पुन्हा एकदा सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने प्रति किलो मागे 4 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता मुंबई आणि परिसरात सीएनजी गॅसच्या प्रति किलोसाठी 76 रुपये मोजावे लागणार आहेत. महानगर गॅस लिमिटेड हा मुंबई, ठाणे आणि परिसरात प्रमुख गॅस वितरक आहे. ही दरवाढ शनिवारपासून लागू झाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Embed widget