एक्स्प्लोर

अचानक पैशांची गरज लागल्यास काय करालं? आधार कार्डवर मिळेल 2 लाखांचं कर्ज, नेमकी काय आहे प्रक्रिया? 

कधी कधी आपल्याला अचानक पैशांची गरज भासते. जर अचानक पैशांची गरज लागली तर तुम्ही काय कराल? तर तुमच्याकडे असणाऱ्या आधार कार्डद्वारे देखील तुम्हाला 2 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते.

Loan available on Aadhar card : कधी कधी आपल्याला अचानक पैशांची गरज भासते. यावेळी आरोग्याची  किंवा शिक्षणासाठी निधीची गरज असते. अशा स्थितीत तत्काळ पैशाची व्यवस्था करणे आवश्यक असते. तुम्हीही अशा परिस्थितीत असाल तर तुमच्या आधार कार्डद्वारे तुम्ही 2 लाख रुपयापर्यंतचे वैयक्तिक कर्ज सहज मिळवू शकता. हे अनेकांना माहीतही नसेल, पण तुम्हाला 2 लाखांचं कर्जड मिळू शकते. 

आधार हे भारत सरकारने जारी केलेले एक ओळखपत्र आहे. ते आता केवळ ओळख आणि पत्त्याचा पुरावा राहिलेला नाही. त्याच्या मदतीने तुम्ही वैयक्तिक कर्ज देखील घेऊ शकता. आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळू शकते, जे तुम्ही तुमच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता. ज्यांना आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज आहे त्यांच्यासाठी हे कर्ज विशेषतः फायदेशीर आहे.

आधार कार्डवर कसे मिळवाल कर्ज? 

आधार कार्डवर कर्ज मिळणे आता खूप सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही दीर्घ प्रक्रिया करावी लागणार नाही. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

योग्य प्लॅटफॉर्म निवडा:

प्रथम तुम्ही आधार कार्डवर कर्ज देणारी बँक, NBFC (नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी) किंवा डिजिटल कर्ज ॲप निवडा.

ऑनलाइन अर्ज करा

त्यानंतर तुम्हाला संबंधित प्लॅटफॉर्मच्या वेबसाइट किंवा ॲपला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करताना, तुमची वैयक्तिक माहिती आणि कर्जाची रक्कम याबाबतची माहिती द्या.

आधार क्रमांक माहिती द्या 

अर्ज प्रक्रियेदरम्यान, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. याच्या मदतीने तुमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा सहज पडताळता येईल.

इतर दस्तऐवज अपलोड करा

काही प्रकरणांमध्ये, बँका किंवा कर्ज पुरवठादार तुमचे उत्पन्न आणि क्रेडिट इतिहास तपासण्यासाठी पॅन कार्ड, सॅलरी स्लिप किंवा बँक स्टेटमेंट यांसारखी इतर कागदपत्रे देखील मागू शकतात.

कर्ज मंजूरी आणि वितरण

एकदा तुमच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, कर्ज मंजूर केले जाईल आणि रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

आधारवर आधारित कर्ज कोणाला मिळू शकते?

भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
स्थिर उत्पन्नाचे साधन असावे.
क्रेडिट स्कोअर चांगला असावा.
आधार कार्डावरील कर्जाचे फायदे

जलद प्रक्रिया: 
कर्ज मंजूरी आणि रक्कम हस्तांतरण फार कमी वेळात होते.

अनेक कागदपत्रांशिवाय: 
आधार कार्ड आणि काही मूलभूत कागदपत्रांसह कर्ज उपलब्ध आहे.

लवचिक परतफेड पर्याय: 
EMI द्वारे कर्जाची परतफेड करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

कमी व्याजदर: 
व्याजदर इतर पर्यायांपेक्षा कमी असू शकतो.

या गोष्टी लक्षात ठेवा

कर्ज घेण्यापूर्वी त्याच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा.
फक्त विश्वसनीय बँक किंवा NBFC कडूनच कर्ज घ्या.
तुमच्या पेमेंट क्षमतेचे मूल्यांकन करा आणि तुम्ही वेळेवर EMI परत करू शकता याची खात्री करा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget