एकदाच पैसे गुंतवा, मग दरमहा 12000 रुपये मिळवा, काय आहे नेमकी योजना?
चांगला परतावा मिळणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचे ठरत आहे. दरम्यान, गुंतवणूक करणाऱ्यांसाठी LIC ची एक भन्नाट योजना आहे. यामध्ये एकदा गुंतवणूक केली ही दरमहा तुम्हाला 12000 रुपये मिळू शकतात.
LIC Yojana : आपल्या गुंतवणुकीवर (Investment) ग्राहकांना चांगला परतावा मिळवून देणाऱ्या अनेक योजना आहेत. भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करणं सोयीचं ठरतं. दरम्यान, गुंतवणूक करताना दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे आपली ठेव सुरक्षीत आहे का? आणि दुसरी म्हणजे त्यावर परतावा किती मिळतो? चांगला परतावा मिळणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचे ठरत आहे. दरम्यान, गुंतवणूक करणाऱ्यांसाठी LIC ची एक भन्नाट योजना आहे. यामध्ये एकदा गुंतवणूक केली ही दरमहा तुम्हाला 12000 रुपये मिळू शकतात. नेमकी काय आहे योजना याबद्दल सविस्तर माहिती पाहुयात.
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC कडे प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी योजना आहे. यातीलच एक योजना म्हणजे LIC सरल पेन्शन योजना. यामध्ये एकदा गुंतवणूक केली की तुम्हाला दरमहा 12000 रुपये मिळतात. सरल पेन्शन योजना ही सेवानिवृत्ती योजना म्हणून प्रसिद्ध आहे. दर महिन्याला तुम्हाला निश्चित पेन्शन मिळते.नुकताच निवृत्त झालेला व्यक्ती देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करु शकतो.
कसा मिळेल लाभ
दरम्यान, तुम्ही एलआयसीच्या सरल योजनेत कितीही गुंतवणूक करु शकता. या योजनेत गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर आधारीत पेन्शन मिळवू शकता. या योजनेत कोणत्या व्यक्तिला प्रिमीयम भरल्यानंतर मग तो सहामाही असो किंवा त्रैमासिक असो यावर आधारीत पेन्शन मिळते. समजा 42 वर्षाच्या कोणत्याही व्यक्तीनं 30 लाख रुपयांची वार्षिक खरेदी केली तर त्याला दरमहा 12388 रुपये पेन्शन म्हणून मिळतात. या योजनेचा लाभ 40 ते 80 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती घेऊ शकते. पती पत्नी मिळूव देखील तुम्हा या योजनेचा लाभ घेऊ शकता. ही पॉलिसी सुरु झाल्यानंतर सहा महिन्यांनी तुम्ही बंद देखील करु शकता. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास सर्व रक्कम त्याच्या नॉमिनीला मिळते.
LIC सरल योजनेत गुंतवणूकदाराला कर्जाची हमी देखील दिली जाते. पॉलिसीधारक व्यक्ती सहा महिन्यानंतर कर्ज घेऊ शकतो. दरम्यान, तुम्हाला LIC सरल योजनेसंदर्भात माहिती हवी असेल तर तुम्ही www.licindia.in या वेबसाईटला भेट देऊ शकता.
महत्वाच्या बातम्या: