एक्स्प्लोर

LIC Investment In Stocks : शेअर बाजारातून एलआयसीने वर्षभरात केली बंपर कमाई; तुमच्या पोर्टफोलिओतही आहेत का हे स्टॉक्स?

LIC Investment : एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे 260 कंपन्यांचे शेअर्स आहेत. यंदाच्या वर्षी एलआयसीने शेअर बाजारातून 2.28 लाख कोटी रुपये कमावले आहेत.

LIC Investment In Stock :  LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी (LIC Insurance) असण्यासोबतच सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदारही आहे. एलआयसीकडून शेअर बाजारात गुंतवणूक (LIC Investment in Share Market) केली जाते. एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये (LIC Portfolio) सुमारे 260 कंपन्यांचे शेअर्स आहेत. यंदाच्या वर्षी एलआयसीने शेअर बाजारातून 2.28 लाख कोटी रुपये कमावले आहेत.  Ace इक्विटी डेटानुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, LIC च्या एकूण होल्डिंग्सचे बाजार मूल्य 9.61 लाख कोटी रुपये होते. आता हेच बाजार मूल्य 11.89 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एलआयसीच्या शेअरहोल्डिंग आणि सप्टेंबर अखेरच्या शेअर्सच्या सध्याच्या बाजारभावाच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले आहे.


एलआयसीच्या पाच टॉप गेनर्समध्ये कोल इंडिया, लार्सन अँड टुब्रो, बजाज ऑटो, टाटा मोटर्स आणि NTPC यांचा समावेश आहे. गेल्या एका वर्षात लार्सन अँड टुब्रोमधील एलआयसीच्या स्टेकचे मूल्य 36,165 कोटी रुपयांवरून 52,786 कोटी रुपये झाले आहे. यावर्षी या शेअर्समध्ये  67 टक्क्यांहून अधिक तेजी आली आहे. गेल्या आठवड्यात त्याने विक्रमी उच्चांक गाठला होता. या कालावधीत कंपनीतील एलआयसीच्या होल्डिंगचे मूल्य 46 टक्क्यांनी वाढले आहे. लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स पुढील वर्षीही तेजीत असतील असा अंदाज, शेअर बाजार तज्ज्ञांनी वर्तवला आहे. 

कोणत्या स्टॉक्सने एलआयसी मालामाल?

गेल्या एका वर्षात सरकारी कंपनी कोल इंडियामधील एलआयसीच्या होल्डिंगचे मूल्य 15,266 कोटी रुपयांवरून 24,087 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. यंदा या शेअरची किंमत 63 टक्क्यांनी वधारली आहे. कंपनीतील एलआयसीच्या होल्डिंगचे मूल्य 58 टक्क्यांनी वाढले आहे. एनटीपीसीमधील एलआयसीच्या होल्डिंगचे मूल्य 86 टक्क्यांनी वाढून 2,400 कोटी रुपये झाले आहे. या स्टॉकने नुकताच आतापर्यंतचा सर्वाकालिन उच्चांक गाठला होता. 

टाटा मोटर्सने गेल्या एका वर्षात एलआयसीला बंपर परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी, कंपनीतील एलआयसीच्या होल्डिंगचे मूल्य 6,722 कोटी रुपये होते, जे आता 13,519 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

या कालावधीत, अदानी पोर्ट्स आणि SEZ मधील LIC च्या होल्डिंगचे मूल्य रु. 16,156 कोटींवरून 19,969 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. सुझलॉन एनर्जीमध्ये एलआयसीच्या होल्डिंगचे मूल्य 148 कोटी रुपयांवरून 519 कोटी रुपये आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये 2,778 कोटी रुपयांवरून 6,328 कोटी रुपये झाले. LIC च्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या किमान 21 स्टॉक्सने यावर्षी मल्टीबॅगर परतावा दिला आहे. यामध्ये बीएसई 328 टक्के परताव्यासह अव्वलस्थानी आहे. त्याचप्रमाणे रेल्वे विकास निगमने यावर्षी 160 टक्के परतावा दिला आहे.


पुढील वर्ष एलआयसीसाठी कसे असणार?

पुढील वर्ष भारतीय शेअर बाजारासाठीही चांगले असेल, असे बहुतांश फंड व्यवस्थापकांचे मत आहे. या काळात देशात देशी-विदेशी गुंतवणूक सुरू राहण्याची अपेक्षा आहे. या वर्षात आत्तापर्यंत, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देशात 20 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. तर विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 22 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. मात्र, तज्ज्ञांनुसारे,  पुढील वर्षी स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये जास्त परतावा अपेक्षित नाही. 

(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी असून कोणताही गुंतवणूक सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण असते. गुंतवणूक करण्याआधी शेअर बाजार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSharad Pawar Full PC : अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
×
Embed widget