आयटीआर भरण्याची शेवटची संधी, जाणून घ्या दोन्ही करप्रणालीचे टॅक्स स्लॅब!
आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. या तारखेनंतर तुम्हाला आयटीआर दाखल करता येणार नाही. त्यामुळे आता शेवटची संधी म्हणून आयटीआर भरताना टॅक्स स्लॅब जाणून घेणे गरजेचे आहे.
मुंबई : आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्यानंतर आयटीआर भरायचा असेल तर तुम्हाला विलंब शुक्ल भरावे लागेल. तसेच तुम्हाला तुमची करप्रणाली बदलता येणार नाही. दरम्यान, तुम्ही आतापर्यंत तुमचा आयटीआर भरलेला नसेल आणि यावेळी पहिल्यांदाच आयटीआर भरत असाल तर तुम्ही अगोदर जुन्या आणि नव्या करप्रणालीतील फरक लक्षात घेतला पाहिजे. दोन्ही करप्रणाल्यांसाठी टॅक्स स्लॅब नेमका काय आहे? हे समजल्यानंतर तुम्हाला आयटीआर भरणे सोपे होईल.
अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये बदल
सर्वप्रथम तुम्ही यावेळी आयटीआर दाखल करत अशाल तर तुमच्या आयटीआरसाठी असेसमेंट इअर हे 2024-25 असेल तर आर्थिक वर्ष 2023-24 असेल. सरकारने नुकतेच आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात सरकारने नव्या करप्रणालीत काही बदल केले आहेत. नव्या करप्रणाीतील हा बदल असेसमेंट इअर 2025-26 पासून लागू होतील. म्हणजेच तुम्ही जेव्हा नव्या वर्षात आयटीआर दाखल कराल तेव्हात तुम्हाला आता बदलण्यात आलेल्या नियमांचा फायदा पुढच्या वर्षी होईल.
नव्या करप्रणालीसाठीचा टॅक्स स्लॅब काय आहे?
असेसमेंट इअर 2024-25 साठी तुम्ही नव्या करप्रणालीनुसार आयटीआर दाखल करणार अशाल तर तुम्हाला 3 लाख रुपयांच्या उत्पन्नावर सून्य कर द्यावा लागेल. 3 ते 6 लाख रुपयांचे उत्पन्न असेल तर 5 टक्क्यांनी कर द्यावा लागेल. 6 ते 9 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला 10 टक्क्यांनी कर द्यावा लागेल. 9 ते 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के, 12 ते 15 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के तर 15 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असल्यास 30 टक्के कर द्यावा लागेल. सरकारने गेल्या वर्षी 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर कायद्याच्या कलम-87A अंतर्त रिबेट आणि 50,000 रुपयांचे स्टँडर्ड डिटक्शनचा लाभ देण्याची घोषणा केली होती.
जुन्या करप्रणालीत टॅक्स स्लॅब काय आहे?
तुम्ही जुन्या करप्रणालीप्रमाणेही आयटीआर भरू शकता. तुम्ही या करप्रणालीप्रमाणे आयटीआर भरत असाल तर तुम्हाला असेसमेंट इअर 2024-25 साठी 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला शून्य कर द्यावा लागेल. 2.5 ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर असेल. 5 लाख ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के कर तर 10 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असेल तर 30 टक्के कर द्यावा लागेल.
जुन्या कर प्रणालीअंतर्गत तुम्हाला 50,000 रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळतो. तसेच 2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला प्राप्तिकर कायद्याच्या कलम-87A अंतर्गत टॅक्स रिबेटचाही लाभ मिळतो. जुन्या करप्रणाली अंतर्गत तुम्हाला हाउस रेंट अलाऊन्स, जीवन विमान, आरोग्य विमा, सेव्हिंग्स, गृहकर्ज अशा वेगवेगळ्या मार्गांनी करसवलत मिळते.
हेही वाचा :
आयटीआर भरला तरी नोटीस आली? टेन्शन नाही घ्यायचं, फक्त 'हे' करायचं?
गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्ड, ऑगस्ट महिन्यात बदलणारे 'हे' नियम जाणून घ्या; नाहीतर खिशाला बसेल झळ!