एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या महिन्याचा पगार 5 दिवस अगोदर मिळणार, लाडक्या बहिणींना ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचे 1500 रुपये महिलांना रक्षाबंधनापूर्वी देण्यात आले होते.

मुंबई :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 13 हप्त्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. महायुती सरकारनं जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. त्या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. राज्य सरकारनं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस अगोदर देण्याचा निर्णय घेतला आहे. आता लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे पात्र लाभार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. 

सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवस अगोदर पगार

गणेशोत्सवाच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी त्यांचे ऑगस्टचे वेतन 26 ऑगस्ट रोजी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. राज्य सरकारनं शासन निर्णय काढून 1 सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकार्यांचे वेतन 26 ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था,  अकृषि विद्यापीठे/ कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविदयालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत वेतनधारकांन / कुटुंब निवृत वेतन धारक यांनाही हा निर्णय लागू राहणार आहे. 

लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाल्यानंतर सुरु असलेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना त्या महिन्याचे 1500 रुपये दिले जायचे. गेल्या काही महिन्यांपासून त्यामध्ये बदल झालेले दिसून येतात. जुलै 2025 महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्यापूर्वी देण्यात आले. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील तीन महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. अंगणवाडी सेविकांकडून गृहचौकशी करुन एका कुटुंबातील लाभ घेणाऱ्या तीन महिलांपैकी एका महिलेचं नाव कमी करण्याची प्रकिया करण्यात येणार आहे. दुसरीकडे महिला व बालविकास विभागानं दिलेल्या माहितीनुसार ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या काही महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यानं त्यासंदर्भातील चौकशी आणि कारवाई संदर्भातील प्रक्रिया सुरु केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Gold News : सोन्यातील बचतीला इलेक्ट्रॉनिक पर्याय; भौतिक सोन्याची मालकीही कायम!
सोन्यातील बचतीला इलेक्ट्रॉनिक पर्याय; भौतिक सोन्याची मालकीही कायम!
Gold Rate on Dhantrayodashi: सोनं झालं स्वस्त! ऑल-टाइम हाय लेव्हलवरून 18 टक्क्यांनी घसरले दर; धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे दर
सोनं झालं स्वस्त! ऑल-टाइम हाय लेव्हलवरून 18 टक्क्यांनी घसरले दर; धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे दर
सरकारी नोकरीची मोठी संधी! शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार रुपये, कधी कुठे कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
सरकारी नोकरीची मोठी संधी! शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार रुपये, कधी कुठे कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Iran War: तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
NCMC Card ST Bus : महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Crime News: पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
Embed widget