एक्स्प्लोर

Petrol Diesel : जुलै महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात पेट्रोल-डिझेलचा खप घसरला; जाणून घ्या कारण

Petrol Diesel Demand : जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या मागणीत घट झाली आहे. त्यासाठी कारणेदेखील कारणीभूत आहेत.

Petrol Diesel Demand : जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत घट झाली आहे. रविवारी जाहीर झालेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. देशभरात मान्सून सुरू झाला आहे. त्याच्या परिणाम इंधन विक्रीत घट झाली आहे. मान्सून दाखल झाल्यानंतर देशातील काही भागांमध्ये इंधनाचा वापर कमी होतो. त्याशिवाय वाहतूकही कमी झाल्याने मागणी घटली आहे. डिझेलची विक्री  एक ते 15 जुलै दरम्यान 13.7 टक्क्यांनी घटून 31.6 लाख टन इतकी झाली. मागील महिन्यात याच कालावधीत डिझेलची विक्री 36.7 लाख टन इतकी झाली होती. 

देशात डिझेल विक्री मान्सूनवर मोठ्या प्रमाणावर आधारीत आहे. साधारणपणे एप्रिल-जून या महिन्याच्या कालावधीच्या तुलनेत जुलै-सप्टेंबर या तिमाहीत डिझेलची मागणी कमी असते. पुरामुळे वाहतूक कमी प्रमाणावर होते. तर, मान्सूनमुळे कृषी क्षेत्रात डिझेलचा वापर कमी होतो. सिंचन करण्यासाठी पंप चालवण्यासाठी डिझेलचा वापर होतो. मान्सूनच्या काळात पंपाचा वापर कमी होतो. 

दरम्यान,  वार्षिक तुलनेत डिझेलची मागणी 27 टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षी याच कालावधीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे डिझेलची मागणी घटली होती. एक जुलै ते 15 जुलै 2020 च्या तुलनेत डिझेलची मागणी 43.6 टक्क्यांनी वाढली आहे. त्यावेळी  22 लाख टन डिझेलची विक्री करण्यात आली होती. तर, कोविडपूर्व काळात जुलै 2019 च्या तुलनेत ही विक्री 13.7 टक्के अधिक होती. 

जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात  पेट्रोलची विक्री 7.8 टक्क्यांनी घटून 12.7 लाख टन इतका झाली. मागील महिन्याच्या या कालावधीत  ही मागणी 13.8 लाख टन इतकी होती. जुलै 2021 च्या तुलनेत ही विक्री 23.3 टक्के आणि जुलै 2020 च्या पंधरवड्यात 46 टक्क्यांनी अधिक आहे. जुलै 2019 या कोविड पूर्व काळाच्या तुलनेत या कालावधीत पेट्रोलची मागणी 27.9 टक्के आहे. 

विमान सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर देशांतर्गत आणि परदेशी प्रवासाची संख्या वाढली आहे. त्यामुळे विमान इंधनाच्या मागणीत वाढ झाली आहे. या पंधरवड्यात 2,47,800 टन  इतक्या विमान इंधनाची मागणी नोंदवण्यात आली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget