एक्स्प्लोर

Why Crude Oil Price Falling: तीन महिन्यात 30 डॉलरहून अधिक घट, कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण का?

Why Crude Oil Price Falling : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ही घसरण आर्थिक मंदीची चाहूल आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Why Crude Oil Price Falling : मागील काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 140 डॉलर प्रति डॉलर इतके होते. त्यानंतर मागील तीन-चार महिन्यांपासून कच्च्या तेलाचे दर घसरू (Crude Oil Price Falling) लागले आहेत. साधारणपणे कच्च्या तेलाच्या दरात मागील तीन महिन्यात 30 डॉलरची घसरण दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या दरात होत असलेली घसरण ही आर्थिक मंदीची चाहूल आहे का, (Economic Recession) अशी चर्चा होऊ लागली आहे. 

जगभरातील अनेक देशांमध्ये महागाईचा दर वाढला आहे. आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतही महागाई अद्यापही नियंत्रणात आली नाही. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा व्याजदरात वाढ केली आहे. यापुढील पतधोरण आढावा बैठकीत व्याज दरात वाढ होण्याचे संकेत फेडरल रिझर्व्हने दिले आहेत. अमेरिकेसह इतर देशातील मध्यवर्ती बँकांनीदेखील व्याजदरात वाढ केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये काही देश व्याज दरवाढ करण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात मोठी घसरण झाल्याचे म्हटले जाते.  फेडरल रिझर्व्ह, बॅंक ऑफ इंग्लंड आणि स्विझ बॅंकेकडून रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडूनदेखील रेपो व्याज दरात वाढ होण्याची शक्यता आहे. 

व्याज दरात वाढ झाल्याने बाजारातील चलन पुरवठा कमी होतो. त्याच्या परिणामी लोकांची खर्च करण्याची क्षमता कमी होते. यामुळे मागणी पुरवठ्यात संतुलन राखले जाते. मात्र, दुसऱ्या बाजूला व्याज दरवाढीमुळे बाजारातील गुंतवणूकही कमी होते. नोकऱ्यांची संख्या कमी होण्याची भीती असते. बहुतेक देशांना व्यापार तुटीचा सामना करावा लागतो. 

मंदीची चाहूल ?

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांकडून व्याज दरात वाढ होत असल्याने आणि कच्च्या तेलाची मागणी घटल्याने दर घसरले आहेत. कच्च्या तेलाची मागणी घटत असल्याने ही मंदीची चाहूल असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  कच्च्या तेलाची मागणी घटण्याच्या भीती बाजारात निर्माण झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचा दर 86 डॉलर प्रति बॅरलवर तर डब्ल्यूटीआय क्रूड 79 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. अमेरिकेच्या WTI क्रूड ऑइलच्या दरात जवळपास 5 टक्क्यांची घट झाली आहे. बाजारात मागणी घटण्याच्या भीतीने कमोडिटीच्या दरात घट होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तर, दुसऱ्या बाजूला डॉलरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डॉलरच्या निर्देशांकाने दोन दशकातील उच्चांक गाठला आहे. 

जागतिक बँकेचा इशारा

पुढील वर्षी जगाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा जागतिक बँकेने आपल्या अहवालात दिला आहे. वर्ष 1970 मधील मंदीनंतर सावरल्यानंतर ही मोठी आर्थिक मंदी असेल असा इशारा जागतिक बँकेने आपल्या अहवालात दिला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 05 November 2024Raju Latkar On Satej Patil : मी काँग्रेसी विचारांचा कार्यकर्ता, शाहू महाराजांनी मला न्याय दिलाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : :16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Embed widget