एक्स्प्लोर

Jamsetji Tata Birth Anniversary : जमशेदजी टाटा यांनी या व्यवसायाद्वारे केला व्यावसायिक-उद्योग जगतात प्रवेश

Jamsetji Tata Birth Anniversary : जमशेदजी टाटा यांनी आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात ट्रेडिंग कंपनीद्वारे सुरू केली. त्यानंतर त्यांनी टाटा उद्योग समूहाचा विस्तार केला.

Jamsetji Tata Birth Anniversary : जमशेदजी टाटा यांनी देशात टाटा समूहातील विविध उद्योग, व्यवसायाची पायाभरणी केली. आज हे  उद्योग देशातील प्रमुख उद्योग म्हणून नावारुपास आले आहे. टाटा समूहाच्या उद्योगांनी जगभरात भारताची एक नवी ओळख करून दिली. जमशेदजी टाटा यांचा उद्योजक होण्याचा प्रवासही रंजक आहे. 

जमशेदजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी नवसारी, गुजरात येथे झाला. त्यांचे पारशी कुटुंबीय पुजारी म्हणून काम करत होते. मात्र, जमशेदजी यांचे वडील नुसरवानजी टाटा हे व्यवसायात उडी घेणारे कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले. वयाच्या 14 व्या वर्षी जमशेदजी टाटा यांनी मुंबईत आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. जमशेदजी यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतच घेतले. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर सुमारे 10 वर्षांनी 1868 मध्ये त्यांनी पहिला व्यवसाय सुरू केला.

21,000 रुपयांच्या गुंतवणुकीने ट्रेडिंग कंपनीचा व्यवसाय

जमशेटजी टाटा यांनी अवघ्या 21,000 रुपयांच्या गुंतवणुकीने ट्रेडिंग कंपनी सुरू केली. पण लवकरच जमशेटजी टाटा इंग्लंडला गेले आणि तेथून कापड व्यवसायाबाबतची माहिती घेऊन भारतात परतले. 

नागपूरमध्ये कापड गिरणी

इंग्लंडहून परतल्यानंतर जमशेदजी टाटा यांनी १८६९ मध्येच कापड व्यवसायात हात आजमावला. त्यांनी मुंबईतील औद्योगिक केंद्र असलेल्या गिरणगावातील चिंचपोकळीतील दिवाळखोर झालेली तेल गिरणी विकत घेतली. त्यांनी त्याचे नाव अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. जमशेदजी टाटा यांनी तेल गिरणीचे सूतगिरणीत रूपांतर केले.  त्यानंतर दोन वर्षांनी ती एका स्थानिक व्यापाऱ्याला चांगल्या किंमतीत विकली. यामध्ये त्यांना नफा झाला. जमशेदजी टाटा यांनी त्यानंतर इंग्लंडला जाऊन लँकेशायर येथील कपड्याच्या व्यापाराचे सखोल ज्ञान घेतले. त्यावेळी कापड गिरण्यांसाठी मुंबई हे सर्वात पसंतीचे ठिकाण होते. मात्र, जमशेदजी टाटा यांनी आपला नफा वाढवण्यासाठी दूरदर्शी दृष्टिकोन स्वीकारला. त्यांनी 1874 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथे सेंट्रल इंडिया स्पिनिंग, विव्हिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू केली. सुमारे 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली. नागपूरची निवड करण्यामागील 3 मुख्य कारणे होती. यामध्ये कापूस निर्मिती करणारे क्षेत्र जवळ असणे,  रेल्वे जंक्शन जवळ असणे आणि उद्योगासाठी पाणी आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची व्यवस्था असणे.  

Tata Line ची स्थापना 

जमशेदजी टाटा यांनी 1873 मध्ये त्यांच्या कापड व्यवसायाच्या स्वस्त निर्यातीसाठी एक शिपिंग कंपनी सुरू केली. त्यासाठी त्याने लंडनहून अॅनी बॅरो नावाचे जहाज 1050 पौंड या दराने दरमहा भाड्याने घेतले. जपानच्या Nippon Yusen Kaisha Line सोबत त्यांनी यासाठी Tata Line सुरू केली. मात्र, हा व्यवसाय फारकाळ टिकला नाही. 
जमशेटजींचा म्हैसूर सिल्कशीही संबंध

म्हैसूर सिल्कसोबत जमशेदजी टाटा यांचा संबंध

एवढेच नाही तर जमशेदजी टाटा यांनी देशातील रेशीम उद्योगाला चालना देण्याचे कामही केले. 1893 मध्ये जमशेदजी टाटा जपानच्या दौऱ्यावर गेले होते, तिथे त्यांना रेशीम कीटकांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन करण्याच्या पद्धतीची माहिती मिळाली. भारतात परतल्यावर त्यांनी हा व्यवसाय तत्कालीन म्हैसूर राज्यात पसरवला. त्यासाठी त्यांनी तेथे आवश्यक असलेली जमीन खरेदी करून सवलतीच्या दरात रेशीम पालन सुरू केले. 

उद्योग, व्यवसायाची सुरुवात

'टाटा'च्या संकेतस्थळानुसार, टाटा समूहाने देशातील पहिली मोठी स्टील कंपनी सुरू केली. त्याशिवाय पहिले पंचतारांकीत हॉटेल, घरगुती ग्राहकोपयोगी वस्तू देणारी कंपनी स्थापन केली. तसेच देशातील पहिली विमान वाहतूक कंपनी टाटा एअरलाइन्स सुरू केली होती. टाटा एअरलाइन्सचे नाव 'एअर इंडिया' असे करण्यात आले. समूहातील टाटा मोटर्सने रेल्वे इंजिनचे उत्पादन केले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha : 11 PmABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 March 2025Special Report | Santosh Deshmukh | 90 दिवस! वडील गमावले, वैभवीने प्रश्न विचारले..Special Report| Raj Thackeray | कुंभ आणि गंगा, 'राज'कीय पंंगा; वादांचा मेळा, प्रतिक्रियांची डुबकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
Embed widget