Rainbow Childrens Medicare IPO: रेनबो चिल्ड्रेन मेडिकेअर प्रीमियर दरावर लिस्ट होणार? ग्रे मार्केटने दिले 'हे' संकेत
Rainbow Childrens Medicare IPO: रेनबो चिल्ड्रेन्स मेडिकेअर लिमिटेडचा आयपीओ येत्या 10 मे रोजी शेअर बाजारात लिस्ट होण्याची शक्यता आहे.
Rainbow Childrens Medicare IPO : रेनबो चिल्ड्रेन्स मेडिकेअर लिमिटेडचा आयपीओ 27 एप्रिल रोजी खुला झाला होता. या आयपोओसाठी अर्ज करण्याची मुदत 29 एप्रिल रोजी मुदत संपली. हा आयपीओ 10 मे रोजी BSEआणि NSE वर सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे.
या आयपीओमध्ये कंपनीने प्रति शेअर 516-542 इतकी किंमत ठेवली. कंपनीने 280 कोटी रुपयांचे नवीन इश्यू जारी केले आहेत. तर 2,40,00,900 शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केले आहेत. गुंतवणूकदारांकडून 470 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
ग्रे मार्केट मधील किंमत
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सध्या त्याची ग्रे मार्केट किंमत 27 रुपये आहे. जी त्याच्या आयपीओच्या किमतीपेक्षा 5 टक्के जास्त आहे. रेनबो चिल्ड्रेन मेडिकेअर आयपीओसाठी शेअर वाटप या आठवड्याच्या 5 तारखेला अंतिम होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आयपीओ मध्ये बोली लावली असेल आणि तुम्हाला शेअर्सचे वाटप झाले असेल, तर शेअर्स तुमच्या डिमॅट खात्यात 9 मे रोजी ट्रान्सफर केले जातील.
या आयपीओचा रजिस्ट्रार केफिन टेक्नॉलॉजीज आहेत. त्यामुळे शेअर वाटपाबाबतची माहिती त्यांच्या वेबसाइटवर किंवा बीएसईच्या वेबसाइटवर पाहता येईल. या फ्रेश इश्यूमधून मिळणारे पैसे नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरच्या लवकर सेटलमेंटसाठी, नवीन हॉस्पिटल्सची स्थापना, वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भांडवल यासाठी वापरले जाणार असल्याचे कंपनीने म्हटले.
रेनबो चिल्ड्रेन मेडिकेअरचा आयपीओ 5 ते 140 टक्के प्रीमियम दरावर उघडू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. हा IPO किरकोळ गुंतवणूकदारांना वाटण्याची शक्यता जास्त आहे. बाजारात चांगले वातावरण असेल तर हा आयपीओ 5 ते 10 टक्क्यांच्या प्रीमियमच्या वर जाऊ शकतो, असे UnlistedArena.com चे संस्थापक अभय दोशी यांचं मत आहे.रेनबो चिल्ड्रेन मेडिकेअरने 1999 मध्ये हैदराबादमध्ये पहिले 50 खाटांचे बालरोग विशेष रुग्णालय स्थापन केले. 20 डिसेंबर 2021 पर्यंत, रेनबो भारतातील सहा शहरांमध्ये एकूण 1,500 खाटांच्या क्षमतेसह 14 रुग्णालये आणि तीन दवाखाने चालवते. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, जेपी मॉर्गन इंडिया आणि IIFL सिक्युरिटीज इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत