1 लाख रुपयांची गुंतवणूक करा, करोडपती व्हा, कसा घ्याल 'या' सरकारी योजनेचा लाभ
जर तुम्ही करोडपती होण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुम्ही फक्त 1 लाख रुपये गुंतवूण हे स्वप्न साकार करू शकता. योग्य नियोजन आणि शिस्तीने तुम्ही जर पैशाची गुंतवणूक केली तर हे शक्य होणार आहे.
Government schemes : जर तुम्ही करोडपती होण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुम्ही फक्त 1 लाख रुपये गुंतवूण (Investment) हे स्वप्न साकार करू शकता. योग्य नियोजन आणि शिस्तीने तुम्ही जर पैशाची गुंतवणूक केली तर हे शक्य होणार आहे. एक लाख रुपयांची गुंतवणूक करून करोडपती कसे बनू शकता? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही एक सरकारी योजना आहे. यामध्ये तुम्हाला सरकारकडून गुंतवणूकीची हमी दिली जाते. ही योजना 15 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. परंतू ती 5 वर्षांसाठी देखील वाढविली जाऊ शकते.
PPF म्हणजे नेमकं काय?
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही एक सरकारी योजना आहे. ज्यामध्ये सरकारकडून गुंतवणूकीची हमी दिली जाते. ही योजना 15 वर्षांच्या कालावधीसाठी आहे, परंतु ती 5 वर्षांसाठी देखील वाढवली जाऊ शकते.
कसे व्हाल करोडपती?
जर तुम्ही या सरकारी योजनेत दरवर्षी 1,00,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला ते 15 वर्षे चालू ठेवावे लागेल. सध्या PPF वर 7.1 टक्के व्याजदर आहे. जर तुम्ही ही रक्कम 30 वर्षांसाठी वाढवली तर तुमची एकूण परिपक्वता रक्कम लक्षणीय वाढेल.
एकूण गुंतवणूक: 1,00,000 रुपये प्रति वर्ष × 30 वर्षे = 30,00,000 रुपये
एकूण व्याज 7.1 टक्के: अंदाजे रु. 73,00,607
एकूण परिपक्वता रक्कम: रु 1,03,00,607
अशाप्रकारे, तुम्ही शिस्तबद्ध राहिल्यास आणि वेळेवर गुंतवणूक केल्यास तुम्ही करोडपती होऊ शकता. त्यामुळं तुम्हाला देखील करोडपती होण्याचा हा सोपा मार्ग आहे. जरी तुमची अनकम कमी असला तरी तुम्ही जर योग्य नियोजन केले तर तुम्ही सहज करोडपती होऊ शकता. फक्त योग्य नियोजन करणं गरजेचं आहे.
म्युच्युअल फंडाद्वारे करोडपती कसे व्हाल?
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा एक मार्ग आहे, ज्यामध्ये तुम्ही नियमित अंतराने म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करता. ही एक सोपी आणि प्रभावी पद्धत आहे, ज्याद्वारे तुम्ही दीर्घकाळात चांगला परतावा मिळवू शकता. जर तुम्ही दरमहा 15,000 रुपयांची गुंतवणूक केली आणि तुम्हाला वार्षिक 15 टक्के परतावा मिळतो असे गृहीत धरले, तर 15 वर्षांतील एकूण गुंतवणूक होईल - रु 15,000 × 12 महिने × 15 वर्षे = रु. 27,00,000. यावर मिळणारे व्याज अंदाजे 74,53,000 रुपये असेल. म्हणजे एकूण रक्कम अंदाजे 1,01,53,000 रुपये असेल. अशा प्रकारे तुम्ही सहजपणे करोडपती होऊ शकता.
महत्वाच्या बातम्या: