प्रचंड उत्पन्न मिळवून देणाऱ्या SBI च्या 5 योजना कोणत्या? 31 मार्चपूर्वी 'या' 2 योजनांचा घेता येणार लाभ
देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्येही (SBI) ग्राहकांना चांगला लाभ मिळवून देणाऱ्या योजना आहेत. नियमीत ग्राहक ते ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनांचा मोठा लाभ मिळत आहे.
SBI Schemes : अलिकडच्या काळात लोक विविध योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक (Investment) करतात. अनेक बँकांच्या योजनांमध्ये चांगला परतावा देखील मिळत आहे. याचा ग्राहकांना मोठा लाभ होत आहे. दरम्यान, देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्येही (SBI) ग्राहकांना चांगला लाभ मिळवून देणाऱ्या योजना आहेत. नियमीत ग्राहक ते ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनांचा मोठा लाभ मिळत आहे. जाणून घेऊयात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चांगला लाभ मिळवून देणाऱ्या 5 योजना.
SBI WeCare विशेष ठेव योजना
स्टेट बँक ऑफ इंडियाची ही एक महत्वाची योजना आहे. SBI WeCare विशेष ठेव योजनेत तुम्ही गुंतवणूक करुन चांगला नफा मिळवू शकता. 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत चांगला परतावा मिळतो. या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे. त्यापूर्वीच तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकता. इतरांपेक्षा ज्येष्ठ नगारिकांना या योजनेत 0.50 टक्के अधिक व्याजदर मिळतो. तर 7 ते 10 वर्षांच्या कालावधीत नियमीत FD व्याजदर हे 3.50 टक्के ते 7.50 टक्के आहेत.
SBI अमृत कलश योजना
SBI अमृत कलश योजना ही ठेवीदारांना चांगला लाभ मिळवून देणारी योजना आहे. या योजनेते गुंतवणूकदारांना 7.10 टक्के व्याजदर मिळतो. तर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के म्हणजे 7.60 परतावा मिळतो. दरम्यान, या योजनेचा ज्या ग्राहकांना लाभ घ्यायचा आहे, त्या ग्राहकांनी 31 मार्चच्या आतच लाभ घ्यावा, अन्यथा 31 मार्चनंतर पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही. कारण ही योजना 31 मार्चपर्यंतच वैध असणार आहे.
SBI सर्वोत्तम मुदत ठेव योजना
या योजनेते ग्राहकांना 7.4 टक्के ते 7.10 टक्के परतावा मिळतो. तर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत 0.50 टक्के अधिकचा परतावा मिळतो. किमान ठेव रक्कम 15.01 लाख रुपये ठेवली असेल तर SBI बेस्ट फिक्स्ड डिपॉझिट अंतर्गत किमान रक्कम 2 कोटीपर्यंत जाऊ शकते.
ग्रीन डिपॉझिट योजना
एसबीआय ग्रीन डिपॉझिट योजनेत देखील नागरिकांना चांगला परतावा मिळू शकतो. ज्येष्ठ नागरिकांना इतरांपेक्षा जास्त परतावा या योजनेत मिळू शकतो. ज्येष्ठ नागरिक 1111 दिवस आणि 1777 दिवसांच्या ठेवीवर 7.15 टक्के परतावा मिळतो. तर इतर नियमीत ग्राहकांना या योजनेत 6.65 टक्के परतावा मिळतो. तर किरकोळ ठेवीवर 6.40 टक्क्यांचा परतावा मिळतो.
SBI वार्षिकी योजना
SBI वार्षिकी योजना देखील ग्राहकांसाठी फायद्याची योजना आहे. या योजनेते ठेवीदारांना एकदाच गुंतवणूक करावी लागते. या गुंतवणुकीवर ग्राहकांना दरमहा व्याजाची रक्कम दिली जाते. व्याज दर तीन महिन्यांनी खात्यात शिल्लक असलेल्या रकमेवर चक्रवाढीच्या आधारावर मोजले जाते. तीन ते पाच वर्षांच्या ठेवीवर ग्राहकांना 5.50 टक्के व्याज मिळते.
महत्वाच्या बातम्या: