आजी-आजोबांना महिन्याला मिळणार पेन्शन, असा घ्या 'या' योजनेचा लाभ
दारिद्रय रेषेखालील असणाऱ्या 65 वर्षावरील व्यक्तींसाठी केंद्र सरकारनं इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना (Indira Gandhi Pension Yojana) सुरु केली आहे.
Indira Gandhi Pension Yojana : आर्थिक दुर्बल घटकांना पाठबळ देण्यासाठी सरकार सातत्यानं विविध योजना सुरु करत आहे. या योजनांच्या माध्यमातून दर्बल घटकांसह वृद्धांना एक प्रकारे आधार देण्याचं काम केलं जात आहे. अशीच एक योजना म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना (Indira Gandhi Pension Yojana). दारिद्रय रेषेखालील असणाऱ्या 65 वर्षावरील व्यक्तींसाठी केंद्र सरकारनं इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना सुरु केली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून आर्थिक मदत केली जाते. सरकारची ही योजना, तुमच्या आजूबाजूच्या निराधार आजी-आजोबांना महिन्याला पैसे मिळवून देणारी आहे. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी लाभार्थी 65 वर्षांवरील निराधार वृद्ध असणं गरजेचं आहे.
इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा उद्देश (Purpose Of Indira Gandhi Pension Yojana)
- इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना पेन्शनद्वारे आर्थिक सहाय्य करणे हा आहे.
- इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा उद्देश हा राज्यातील वृद्ध लोक जे काम करू शकत नाहीत त्यांना सरकारकडून दर महिन्याला आर्थिक मदत देणे हा आहे. यातून वृद्ध स्वावलंबी बनतील हा उद्देश आहे.
'या' योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Documents Required for Indira Gandhi Pension Yojana)
विहीत नमुन्यातील अर्ज
वयाचा दाखला - किमान 65 वर्ष
दारिद्रय रेषेचा दाखला (कुटुंबाचे नाव ग्रामीण/ शहरी भागाच्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे).
किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी
आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स
रहिवासी दाखला
अर्जदाराचा फोटो
काय लाभ मिळेल? (What are the benefits?)
अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500 लाभ
अर्ज कुठे करावा
तहसील कार्यालय, सेतु केंद्र, https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate
महत्त्वाच्या बातम्या: