एक्स्प्लोर

एकेकाळी अमेरिकेनं तिनदा नाकारला व्हिसा; भारतीय वंशाच्या अमेरिकेनं उद्योजकानं आज तिथेच उभारलंय 90 अब्ज डॉलर्सचं साम्राज्य

Vibrant Gujarat Summit: भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती संजय मेहरोत्रा ​​भारताच्या दौऱ्यावर आहेत. व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये सहभागी होण्यासाठी ते आले आहेत. मेहरोत्रा ​​हे अमेरिकेतील प्रसिद्ध टेक कंपनी मायक्रोन टेक्नॉलॉजीचे सीईओ आहेत.

Indian American Sanjay Mehrotra: मुंबई : गुजरातमध्ये (Gujarat) सुरू असलेल्या 'व्हायब्रंट गुजरात समिट'मध्ये (Vibrant Gujarat Summit) सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील अनेक उद्योजक भारतात आले आहेत. सध्या या समिटमध्ये सहभागी झालेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन उद्योगपतीची जोरदार चर्चा रंगली आहे. या उद्योगपतीचं नाव आहे, संजय मेहरोत्रा (Sanjay Mehrotra). एकेकाळी व्हिसा नाकारलेल्या अमेरिकेतच मेहरोत्रा यांनी आपलं मोठं साम्राज्य उभारलं आहे. मूळचे भारतीय वंशाचे असलेले मेहरोत्रा ​​हे अमेरिकन कंपनी मायक्रोन टेक्नॉलॉजीचे सीईओ आहेत. मेहरोत्रा ​​यांची मायक्रोन टेक्नॉलॉजी कम्प्युटर मेमरी आणि कम्प्युटर डेटा स्टोरेज डिव्हायसेस तयार करण्याचं काम करते. ज्यामध्ये रॅम, फ्लॅश मेमरी आणि यूएसबी ड्राइव्ह यांचा समावेश होतो. 

भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती संजय मेहरोत्रा ​​'व्हायब्रंट गुजरात समिट'मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. सेमीकंडक्टरसारख्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर चर्चा करण्यासाठी व्हायब्रंट गुजरात हे मोठं व्यासपीठ असल्याचं मेहरोत्रा म्हणाले. तसेच, मला यापेक्षा मोठं व्यासपीठ मिळालेलं नाही, असंही मेहरोत्रा म्हणाले आहेत. 

मेहरोत्रा यांची कंपनी मायक्रोन टेक्नॉलॉजी भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे. गुजरातमधील साणंदमध्ये त्यांच्या कंपनीचा एक प्लांट तयार होत आहे. गुरुवारी त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली. याआधी गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेले होते, तेव्हा मायक्रोन टेक्नॉलॉजीनं भारतात 825 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलं होतं.

मेहरोत्रा यांनी 1978 मध्ये मायक्रोन टेक्नॉलॉजीजची स्थापना केली. ऑक्टोबर 1978 मध्ये स्थापन झालेली मायक्रोन टेक्नॉलॉजीची गणना जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांमध्ये केली जाते. आज या कंपनीचे मार्केट कॅप 91 अब्ज डॉलर म्हणजेच, सुमारे 7.5 लाख कोटी रुपये आहे.

मेहरोत्रा आज ​​अमेरिकेतील सर्वात मोठ्या कंपनीचं नेतृत्व करत आहेत, मात्र एक वेळ अशी होती की, मेहरोत्रा यांनी अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला होता, पण त्यावेळी अमेरिकेनं त्यांचा व्हिसा अर्ज तब्बल तीनदा फेटाळला होता. 

अमेरिकेनं मेहरोत्रा यांचा व्हिसा अर्ज तीनदा का फेटाळला? 

मेहरोत्रा यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की, त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं की, त्यांनी अमेरिकेत जाऊन शिक्षण घ्यावं. मेहरोत्रा यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. पण, त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी अनेक मोठी स्वप्न पाहिली होती. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत मी भारतातच होतो. त्यांनी सांगितलं की, शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेच्या व्हिसासाठी अप्लाय केलं होतं. अमेरिकेच्या कॉलेजमध्ये अॅडमिशनसाठी 12 वर्ष हायस्कूल शिक्षण पूर्ण करणं आवश्यक होतं. परंतु, भारतात केवळ 11 वर्षांपर्यंतच हायस्कूलचं शिक्षण होतं. त्यामुळे सर्वात आधी माझा अमेरिकेला जाण्यासाठीचा व्हिसा नाकारण्यात आला. त्यानंतर त्यांनी भारतातच शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात असताना त्यांना कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळाला, पण त्यावेळी त्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली नव्हती. त्यामुळे दुसऱ्यांदा व्हिसाचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यांनी सांगितलं होतं की, माझे वडील म्हणायचे की, एखादी गोष्ट करायची ठरवली तर अजिबात हार मानायची नाही. त्यामुळे मी पुन्हा अर्ज केला, पण तोही नाकारण्यात आला. अशा प्रकारे माझा व्हिसा अर्ज एकदा नाही, तर तीनदा फेटाळण्यात आला.

असा मिळवला अमेरिकेसाठी व्हिसा 

मेहारोत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यात त्यांच्या वडिलांनी फार मोठी भूमिका बजावली होती. त्यांच्या वडिलांनी एम्बेसीच्या काउन्सिलरचा पत्ता मिळवला आणि त्यांनी भेटण्यासाठी पोहोचले. वडिलांनी काउन्सिलरची समजूत काढली. शेवटी 20 मिनिटांनी काउन्सिलरनी मला व्हिसा देण्यासाठी संमती दर्शवली. मी मआझ्या वडिलांकडूनच शिकलो की, आपल्या निश्चयच आपलं सफल होण्याचं सर्वात मोठा मार्ग आहे. व्हिसा मिळाल्यानंतर मेहरोत्रा अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी बर्कलेच्या युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर सायन्सची डिग्री मिळवली. त्यानंतर पुढे 2022 मध्ये बोईस स्टेट युनिव्हर्सिटीनं मेहरोत्रा ​​यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केलं.

सॅनडिस्कची सुरुवात

1958 मध्ये कानपूरमध्ये जन्मलेल्या संजय मेहरोत्रा ​​यांनी सॅनडिस्क कंपनी सुरू केली. 1988 मध्ये त्यांनी एली हरारी आणि जॅक युआन यांच्यासोबत सॅनडिस्क कंपनीची स्थापना केली. सॅनडिस्कनं अल्पावधीतच आपला ठसा उमटवला. 1995 मध्ये ही कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली. 2011 मध्ये, मेहरोत्रा ​​सॅनडिस्कचे सीईओ आणि अध्यक्ष बनले. त्याच्या कालखंडात, सॅनडिस्कने पहिलं प्लायंट तंत्रज्ञान खरेदी केलं. त्यानंतर सॅनडिस्कनं अनेक कंपन्या ताब्यात घेतल्या. 2014 मध्ये, सॅनडिस्कनं 1.1 बिलियन डॉलरमध्ये Fusion IO विकत घेतलं.

2016 मध्ये, सॅनडिस्क 16 अब्ज डॉलर्सना विकत घेण्यात आली. पुढच्याच वर्षी 2017 मध्ये मेहरोत्रा ​​यांनी मायक्रोन टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश केला. मे 2017 मध्ये, मेहरोत्रा ​​यांची मायक्रोन टेक्नॉलॉजीचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2019 मध्ये, मेहरोत्रा ​​यांची सेमीकंडक्टर इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. अमेरिकेतील सेमीकंडक्टर उद्योगाचे समर्थन करणारी ही सर्वात मोठी संस्था आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget