एक्स्प्लोर

पैसे ठेवा तयार! लवकरच येणार 'या' दमदार कंपनीचा आयपीओ

ही कंपनी भारतातील पहिली युनिकॉर्न कंपनी आहे. तीन वर्षांपूर्वीच या कंपनीने आपला आयपीओ आणण्याचा प्रयत्न केला होता. पण तो अयशस्वी झाला होता.

मुंबई : सध्या शेअर बाजारात (Share Market) चांगलीच तेजी आहे. याच तेजीचा फायदा घेऊन अनेक गुंतवणूकदार भरपूर पैसे कमवत आहेत. या तेजीमुळे अनेक कंपन्यांच्या भांडवलामध्ये वाढ होताना दिसतेय. दुसरीकडे बाजाराची स्थिती पाहता अनेक कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठीची प्रक्रिया म्हणून या कंपन्या आपला आयपीओ घेऊन येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे आयपीओ आले आहेत. आता लवकरच भारताची पहिली युनिकॉर्न कंपनीदेखील आपला आयपीओ घेऊन येण्याची शक्यता आहे. त्यासाठी तयारी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

तीन वर्षांपूर्वी आयपीओ आणण्याचा प्रयत्न

इनमोबी ही भारताची पहिली युनिकॉर्न कंपनी आहे. साधारण एका दशकापूर्वीच या कंपनीने हा बहुमान मिळवला होता. ही एक टेक कंपनी आहे. तीन वर्षांपूर्वी या कंपनीने आपला आयपीओ आणण्याची तयारी केली होती. मात्र नंतर कंपनीला हा विचार थांबवावा लागला. पण आता पुन्हा एकदा भारताच्या भांडवली बाजारात उतरण्याचा प्रयत्न या कंपनीकडून केला जात आहे.  तीन वर्षांपूर्वी या कंपनीने अमेरिकी शेअर बाजारात उतरण्याचे ठरवले होते. त्यासाठी तयारीही करण्यात आली होती. पण काही कारणास्तव या योजनेला अंतिम स्वरुप आले नव्हते. ईटीच्या रिपोर्टनुसार आता इनमोबी ही कंपनी भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध होण्यासाठी तयारी करत आहे. त्यासाठीची पहिली प्रक्रिया म्हणून लवकरच ही कंपनी आयपीओ घेऊन येणार आहे. 

2011 साली कंपनी युनिकॉर्न 

इनमोबी ही कंपनी ॲडटेक स्टार्टअप आहे. या कंपनीला 2011 सालीच युनिकॉर्न कंपनीचा दर्जा मिळाला होता. जी कंपनी आपला व्यापार वाढवून स्वत:चे भांडवल 1 अब्ज डॉलर्सपर्यंत घेऊन गेलेली आहे, अशा कंपनीला युनिकॉर्न कंपनी म्हटले जाते. भाराताची ही पहिली कंपनी आहे, जिला युनिकॉर्न कंपनीचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर आता अनेक कंपन्याना हा बहुमान मिळालेला आहे. 

कंपनीचा अनेक देशांत विस्तार

ही कंपनी मोबाईल ॲड सर्व्हिसेस वर काम करते. या कंपनीचा व्यापार अनेक देशांत पसरलेला आहे. चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांत या कंपनीचा व्यापार आहे. ही कंपनी ॲड तयार करते, संकेतस्थळावर येणाऱ्या ट्रॅफिकला मॉनिटाईज करणे, ॲड कॅम्पेनची कामगिरी कशी आहे, त्यावर नजर ठेवणे, रियल टाईम रिपोर्ट्स तयार करणे अशी वेगवेगळी कामे या कंपनीकडून केली जातात.

आयपीओ नेमका कधी येणार? 

दरम्यान, इनमोबी कंपनीच्या प्रस्तावित आयपीओबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. हा आयपीओ नेमका कसा असेल? कंपनी या आयपीओतून किती रुपये उभे करणार आहे? तो नेमका कधी येईल? या आयपीओचा किंमत पट्टा काय असेल? याबाबत सध्यातरी अस्पष्टता आहे. बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट दिल्यानंतरच या आयपीओबाबत सविस्तर माहिती समजू शकणार आहे.   

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री

सध्या शेअर बाजारात तुफान तेजी, पण 'हे' म्युच्यूअल फंड अजूनही तोट्यात, जाणून घ्या सविस्तर!

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
Embed widget