एक्स्प्लोर

गव्हाच्या दरात वाढ, महागाई रोखण्यासाठी नवीन सरकार घेणार 'हा' निर्णय? 

गव्हाच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे. या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी गहू आयात (Wheat Import) करण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय.  

Wheat price: सध्या गहू उत्पादक शेतकऱ्यांना (wheat Farmers) अच्छे दिन आले आहेत. कारण गव्हाच्या किंमतीत (Wheat Price) वाढ झाली आहे. सरकारने यावर्षी गव्हाचे विक्रमी उत्पादन झाल्याचा दावा केला आहे. मात्र, दुसरीकडे गहू आयात (Wheat Import) करण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय. त्यामुळं देशात नवीन सरकार स्थापन होताच गव्हाची आयात होण्याची शक्यता आहे. गव्हाच्या वाढत्या किंमतीवर निंयत्रण ठेवण्यासाठी गहू आयातीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

सध्या देशांतर्गत बाजारात गव्हाचा भाव 2,435 रुपये

गव्हाची दरात सातत्याने वाढ होत आहे. सरकारी खरेदीची प्रक्रिया अद्याप संपलेली नाही आणि सध्या देशांतर्गत बाजारात गव्हाचा भाव 2,435 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे, जो वर्षभरापूर्वी याच वेळी 2,277 रुपये होता. खुल्या बाजारात गव्हाची किंमत 2,275 रुपये निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सरकार खरेदीच्या लक्ष्यापासून खूप दूर आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गव्हाची किरकोळ किंमत 30.71 रुपये प्रति किलो आहे, जी एका वर्षापूर्वी 29.12 रुपये होती, तर पिठाची किंमत 35.93 रुपये प्रति किलो आहे, जी गेल्या वर्षी 34.38 रुपये होती. अशा परिस्थितीत गव्हाची वाढती महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकार गव्हाच्या आयातीबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. नवीन सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच शून्य सीमाशुल्कावर गव्हाच्या आयातीला परवानगी देण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

सहा वर्षांनंतर गव्हाची आयात होण्याची शक्यता 

देशात 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्यानंकर नवीन सरकार स्थापन होईल. नवीन सरकार याबबातच निर्णय घेईल. सध्या देशातील गव्हाच्या किमती नवीन उच्चांकावर पोहोचल्या आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सरकारने गव्हाच्या आयातीवर 44 टक्के सीमाशुल्क लावले आहे. कोची, थुथुकुडी आणि कृष्णपट्टणम या दक्षिण भारतीय बंदरांमधूनच गहू आयात करण्याची परवानगी आहे. आता तब्बल सहा वर्षांनंतर गहू आयात होण्याची शक्यता आहे.

जागतिक स्तरावर गव्हाचे सर्वोच्च पातळीवर

दरम्यान, जागतिक स्तरावर गव्हाचे भाव 10 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्नधान्याच्या किंमती नियंत्रणात आणायच्या असतील तर भारताला गहू आयात करावा लागेल, कारण ऑक्टोबरच्या आसपास मागणी-पुरवठा संतुलन बिघडू शकते. असे काही तज्ञांचे मत आहे. जागतिक बाजारपेठेत गव्हाच्या किंमती 10 महिन्यांच्या उच्चांकाच्या जवळ आहेत.

कृषी मंत्रालयाचा अंदाज काय?

कृषी मंत्रालयानं भारतात यावर्षी मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला होता. भारतातील गव्हाचे विक्रमी 1121 लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या भारतीय अन्न महामंडळाने (FCI) 75 लाख टन गव्हाचा साठा आहे. हा साठा गेल्या 16 वर्षातील सर्वात कमी साठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाची खरेदी अधिक झाली आहे. यावर्षी उत्पादन जास्त आहे, परंतु वर्षाच्या उत्तरार्धात, विशेषत: ऑक्टोबरमध्ये जेव्हा साठा कमी असू शकतो तेव्हा त्यांना जास्त भाव मिळेल या आशेने शेतकरी त्यांच्या उत्पादनावर तग धरून आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget