आजपासून Income Tax चं नवीन पोर्टल सुरु; 18 जूनला लॉन्च होणार नवी टॅक्स पेमेंट सिस्टिम : CBDT
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (Central Board of Direct Taxes) नं दिलेल्या माहितीनुसार, हे पोर्टल www.incometax.gov.in आजपासून सुरु होत आहे. हे पोर्टल की सुविधांशी जोडलेलं असेल आणि यामुळे कर परताव्याची प्रक्रियाही जलद पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
![आजपासून Income Tax चं नवीन पोर्टल सुरु; 18 जूनला लॉन्च होणार नवी टॅक्स पेमेंट सिस्टिम : CBDT Income tax new e filing portal launched today new tax payment system will be launched on june 18th आजपासून Income Tax चं नवीन पोर्टल सुरु; 18 जूनला लॉन्च होणार नवी टॅक्स पेमेंट सिस्टिम : CBDT](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/06/bc17ed8934f96da8f9c0790496b1331e_original.gif?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : आयकर विभागाचं नवं पोर्टल आजपासून सुरु होत आहे. आयकर विभागाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, करदाते या पोर्टलवरुन ऑनलाईन तपशील देऊ शकतील. त्याचसोबत करदात्यांनी दिलेल्या तपशीलांवर या पोर्टलमार्फत तत्काळ दखल घेतली जाणार आहे. तशी सुविधा या पोर्टवर उपलब्ध आहे. यामुळे कर परताव्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करणं शक्य होणार आहे. दरम्या, यापूर्वी कर परताव्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास करदात्यांना फार खटाटोप करावे लागत होते. परंतु, नव्या पोटर्लमुळे करदात्यांची सर्व काम सोपी आणि जलद होणार आहेत.
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (Central Board of Direct Taxes) नं दिलेल्या माहितीनुसार, हे पोर्टल www.incometax.gov.in आजपासून सुरु होत आहे. हे पोर्टल की सुविधांशी जोडलेलं असेल आणि यामुळे कर परताव्याची प्रक्रियाही जलद पूर्ण होण्यास मदत होणार आहे. त्याचसोबत सीबीडीटी एक नवी टॅक्स पेमेंट सिस्टमही 18 जूनपासून सुरु होणार आहे. पोर्टल सुरु झाल्यानंतर याचं मोबाईल अॅपही जारी करण्यात येणार आहे. यामुळे करदात्यांना विविध प्रक्रियांशी जुळवून घेणं सोपं होणार आहे.
सीबीडीटीनं माहिती देताना म्हटलं की, "करदात्यास कर भरण्याच्या नवीन प्रणालीशी जुळवून घेण्यास काही वेळ लागू शकतो. त्यामुळे या नव्या प्रणालीचा वापर करण्यापूर्वी सर्व करदात्यांनी याचे फिचर्स व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे नव्या प्रणालीचं नवं पोर्टल लॉन्च झाल्यानंतर सुरुवातीला धीर धरण्याचं करदात्यांना आवाहन करतो. हा खूप मोठा बदल आहे. त्याचप्रमाणे टॅक्स पेमेंटच्या नव्या सिस्टमसह याचे इतर अनेक फिचर्सही लवकरच करदात्यांसाठी रिलीज केले जाणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)