एक्स्प्लोर

HSRP Last Date Extension: लाखो वाहनधारकांना दिलासा, उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

HSRP Number Plate : राज्य सरकारनं उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : राज्य शासनाने दिनांक 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. अशा जुन्या वाहनांना यापूर्वी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि ही पाटी बसविण्यासाठी वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविण्याकरिता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे.

वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अपॉईंटमेंट घ्यावी. त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) न बसविणाऱ्या वाहनांवर 1 डिसेंबर 2025 नंतर वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. तथापि, दिनांक 30.11.2025 पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, याची सर्व संबंधित वाहन मालकांनी नोंद घ्यावी, तरी एक एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसविण्यात यावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.

लाखो वाहनधारकांना दिलासा 

राज्य सरकारनं यापूर्वी 01.04.2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP बसविण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, मोठ्या संख्येनं वाहनधारकांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवली नव्हती. आता मुदत संपण्यास एका दिवसाचा कालावधी बाकी असतानाच राज्य सरकारनं पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. आता वाहनधारकांना राज्य सरकारनं दिलेल्या मुदतवाढीच्या काळात एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घ्यावा लागतील. आता 30 नोव्हेंबर पर्यंत या नंबरप्लेट बसवून घ्यावा लागणार आहेत.

1 डिसेंबरपासून कारवाई करण्यात येणार 

महाराष्ट्र शासनानं एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी आता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. म्हणजेच ही मुदतवाढ जवळपास साडे तीन महिन्यांची आहे. तोपर्यंत वाहनधारकांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. 30 नोव्हेंबरपर्यंत जे वाहनधारक अशी अपॉइंटमेंट घेतील. त्यांना सोडून जे वाहनधारक नंबर प्लेट बसवणार नाहीत किंवा अपॉइंटमेंट घेणार नाहीत त्यांच्यावर 1 डिसेंबरपासून कारवाई केली जाणार आहे. 

मुदतवाढ देण्याची जयंत पाटील यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एचएसआरपी नंबर प्लेट्स बसवण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्यासाठीची अंतिम मुदत 15 ऑगस्ट, 2025 रोजी संपत आहे. ज्या वाहनांवर ही नंबरप्लेट बसवणे गरजेचे आहे त्यांची संख्या अजूनही मोठी आहे. त्यामुळे वाहनचालकांवर 10 हजार रुपयांचा भुर्दंड न देता, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसविण्यासाठी मुदतवाढ द्यावी, ही विनंती करतो, असं जयंत पाटील यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं होतं.

वाहनधारकांना HSRP नंबरप्लेट बसविण्याची इच्छा असली तरी तांत्रिक अडचणींमुळे आणि किचकट प्रक्रियेमुळे त्या बसविण्यात त्यांना अडचणी येत आहेत. परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 70 टक्के जुन्या वाहनांवर HSRP प्लेट्स अजूनही बसवलेल्या नाहीत. त्यामुळे सरसकट कारवाई न करता, शासनाने मुदतवाढ देण्याची गरज आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
Shiv Sena Thackeray Group 40 Star Campaigners List: भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, आदेश भावोजींवर खास जबाबदारी, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?
भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, आदेश भावोजींवर खास जबाबदारी, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?
व्हेनेझुएलाच्या तेल संपत्तीच्या राजरोस लुटीसाठी ट्रम्प यांची पूरती तयारी; राष्ट्राध्यक्षांना बेडरूममधून उचलल्यानंतर आता महिला उपराष्ट्राध्याक्षांनाही जाहीर धमकी!
व्हेनेझुएलाच्या तेल संपत्तीच्या राजरोस लुटीसाठी ट्रम्प यांची पूरती तयारी; राष्ट्राध्यक्षांना बेडरूममधून उचलल्यानंतर आता महिला उपराष्ट्राध्याक्षांनाही जाहीर धमकी!

व्हिडीओ

Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
Shiv Sena Thackeray Group 40 Star Campaigners List: भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, आदेश भावोजींवर खास जबाबदारी, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?
भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, आदेश भावोजींवर खास जबाबदारी, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?
व्हेनेझुएलाच्या तेल संपत्तीच्या राजरोस लुटीसाठी ट्रम्प यांची पूरती तयारी; राष्ट्राध्यक्षांना बेडरूममधून उचलल्यानंतर आता महिला उपराष्ट्राध्याक्षांनाही जाहीर धमकी!
व्हेनेझुएलाच्या तेल संपत्तीच्या राजरोस लुटीसाठी ट्रम्प यांची पूरती तयारी; राष्ट्राध्यक्षांना बेडरूममधून उचलल्यानंतर आता महिला उपराष्ट्राध्याक्षांनाही जाहीर धमकी!
Avinash Jadhav On Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या घरी; मनसेच्या अविनाश जाधवांनी व्हिडीओ दाखवला, ठाण्यात काय घडलं?
उद्धव ठाकरेंचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या घरी; अविनाश जाधवांनी व्हिडीओ दाखवला, ठाण्यात काय घडलं?
KDMC Election 2026: कल्याण-डोंबिवलीत भाजपने नव्हे तर ठाकरे गटातील नेत्यानेच सेटिंग केली, आपल्याच उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला लावले? नेमकं काय घडलं?
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंच्या गोटातील 'बिभीषणा'नेच घात केला? सेटिंग करुन आपल्याच उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला लावल्याचा आरोप, वरुण सरदेसाईंच्या नावाचाही उल्लेख
Nagpur Election 2026: महापालिकेचा कचरा संकलन कामाचा अनुभव ठरला फायद्याचा, थेट काँग्रेसची उमेदवारी; नागपूरात भाजपच्या दिग्गज नेत्या अन् माजी महापौरांच्या विरोधात शड्डू ठोकणार
महापालिकेचा कचरा संकलन कामाचा अनुभव ठरला फायद्याचा, थेट काँग्रेसची उमेदवारी; नागपूरात भाजपच्या दिग्गज नेत्या अन् माजी महापौरांच्या विरोधात शड्डू ठोकणार
Maharashtra Live Blog Updates: आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा, महापालिकेच्या निवडणुकीचे सर्व अपडेट्स
Maharashtra Live Blog Updates: आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा, महापालिकेच्या निवडणुकीचे सर्व अपडेट्स
Embed widget