एक्स्प्लोर

Sahara India : सहारा रिफंड पोर्टलद्वारे किती दिवसात पैसे परत मिळणार? mocrefund.crcs.gov.in वर अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया जाणून घ्या...

CRCS Sahara Refund Portal : सहारा रिफंड पोर्टल mocrefund.crcs.gov.in वर अर्ज करून गुंतवणूकदार पैसे परत मिळवू शकतात. या पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.

Sahara India Refund Portal : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज सहारा रिफंड पोर्टल लाँच (Sahara India Refund Portal) केलं आहे. आता सहाराचे गुंतवणूकदार, ज्यांचे पैसे सहाराच्या विविध योजनांमध्ये पैसे अडकले आहेत, त्यांना पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सहाराचे गुंतवणूकदार mocrefund.crcs.gov.in या पोर्टलवर आवश्यक कागदपत्रे जमा करून परताव्यासाठी अर्ज करू शकतात. याअंतर्गत 45 दिवसांत अर्जावर निर्णय घेतला जाईल. यादरम्यान, गुंतवणूकदारांना पोर्टलवर एकच अर्ज करता येणार आहे. त्यामुळे, सर्व आवश्यक कागदपत्रांसह योग्यप्रकारे अर्ज दाखल करणं खूप महत्वाचं आहे. सहारा रिफंड पोर्टलवर अर्ज कसा करायचा याची सविस्तर प्रक्रिया जाणून घ्या.

सहारा रिफंड पोर्टल लाँच

लोकांनी आपले कष्टाचे सर्व पैसे सहारा इंडियामध्ये जमा केले होते. आता ते घरोघरी फिरत आहेत. गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण होऊनही पैसे परत न मिळाल्याने अनेक राज्यांतून सहारा इंडियाविरोधात गुंतवणूकदारांचा रोष वाढत आहे. आता या पोर्टलमुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पहिल्या टप्प्यात 5000 कोटींच्या निधीचं वाटप 

अमित शाह यांनी पोर्टल लाँच कार्यक्रमात माहिती देताना सांगितलं आहे की, सुरुवातीच्या टप्प्यात चार कोटी गुंतवणूकदारांना फायदा होईल. पहिल्या टप्प्यात सहारा रिफंड पोर्टलद्वारे पारदर्शी पद्धतीने 5000 कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत केले जाणार आहेत. सहारासंबंधित प्रकरण अनेक वर्ष न्यायालयात प्रलंबित होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारे पोर्टल लाँच करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता सहारा रिफंड पोर्टल लाँच करण्यात आलं आहे.

किती पैसे परत मिळणार?

सुरुवातीच्या टप्प्यात, रिफंड पोर्टलद्वारे ठेवीदारांना 5000 कोटी रुपयांपर्यंत निधी वितरित केला जाईल. प्रत्येक ठेवीदाराला पहिल्या टप्प्यात फक्त 10,000 रुपये परत मिळू शकतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं की, सुरुवातीला 10,000 रुपये चाचणी आधारावर गुंतवणूकदारांना परत केले जातील. चाचणी यशस्वी झाल्यास हळुहळू परताव्याची रक्कम वाढवली जाईल.

CRCS : सहारा रिफंड पोर्टलवर अर्ज कसा करावा?

  • सर्वात आधी cooperation.gov.in या वेबसाइटवर जा. सहारा इंडिया रिफंड पोर्टलच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करावं लागेल. याशिवाय https://mocrefund.crcs.gov.in/ या लिंकवर थेट क्लिक करून नोंदणी करता येईल.
  • यासाठी, आधार कार्डशी लिंक केलेला बँक खाते क्रमांक असावा.
  • यानंतर, पोर्टलवर जाऊन संबंधित तपशील भरावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला OTP मिळेल.
  • OTP समाविष्ट केल्यानंतर तुमची नोंदणी केली जाईल.
  • यानंतर, ठेवीदाराला लॉगिन टॅबवर क्लिक करावे लागेल. 
  • यानंतर आधारकार्डचा तपशील वापरण्यासाठी संमती द्यावी लागेल.
  • यानंतर नाव, बँक इत्यादी तपशील समोर येईल, ते योग्य असल्याचं तपासल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
  • यानंतर क्लेम रिक्वेस्ट फॉर्म भरावा लागेल. जिथे ठेव पावतीचे सर्व तपशील आणि त्याची कागदपत्रे अपलोड करावी लागतील. 
  • एकूण जमा रक्कम 50 हजारांपेक्षा जास्त असल्यास पॅन कार्डचा तपशील द्यावा लागेल.
  • पडताळणी करण्यापूर्वी सर्व तपशील तपासा कारणं परतावा अर्ज दाखल करण्याची फक्त एकच संधी असेल. तुम्हाला फक्त एकदाचा हा अर्ज दाखल करता येणार आहे.
  • अर्ज दाखल केल्यानंतर, त्याची प्रिंट आउट घ्या, ज्यावर तुम्हाला तुमचा नवीन फोटो चिकटवावा लागेल.
  • फॉर्मवर स्वाक्षरी केल्यानंतर, तो पोर्टलवर अपलोड करावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल.
  • त्यानंतर 30 दिवसांत अर्जाची पडताळणी केली जाईल. त्यानंतर 15 दिवसांत दुसरी पडताळणी केली जाईल. यानंतर मंजुरी मिळाल्यावर, आधार लिंक केलेल्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील. कोणत्याही गोष्टीबद्दल संभ्रम असल्यास, दावा सबमिट करण्यापूर्वी, परतावा पोर्टलवरील संबंधित माहिती वाचून घ्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sahara : गुंतवणूकदारांना दिलासा! सहारा रिफंड पोर्टल लाँच, लाखो नागरिकांचे अडकलेले पैसे परत मिळणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget