एक्स्प्लोर

PNG : भारताला पीएनजी गॅस कसा उपलब्ध होतो? युद्धस्थितीत सरकारकडून पीएनजीच्या वापरास प्रोत्साहन; एलपीजी आणि पीएनजीमध्ये काय फरक असतो?

PNG : भारत सरकारकडून अमेरिका इस्त्रायल आणि इराण युद्ध सुरु झाल्यानंतर एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला असताना पीएनजीच्या वापरास प्रोत्साहन दिलं जात आहे.

नवी दिल्ली : अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. या युद्धाचा जागतिक ऊर्जा साधनांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. जगातील तेल साठे ज्या आखाती देशांमध्ये केंद्रीत झाले आहेत तिथं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मारा होत असल्यानं विध्वंस सुरु आहे. याचा परिणाम भारतासह इतर देशांवर होत असून सर्व देश ऊर्जा साधनांच्या संकटाचा सामना करत आहेत. रशियानं 1 एप्रिलपासून पेट्रोलच्या निर्यातीला म्हणजेच विक्रीला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारनं पीएनजी कनेक्शन  घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. पीएनजी कनेक्शन ज्या ग्राहकांकडे आहे त्यांना एलपीजी सिलेंडर सरेंडर करण्यास सरकारनं आवाहन केलं आहे. जिथं पीएनजी लाईन पोहोचली आहे, त्या ठिकाणी ग्राहकांना पीएनजीचा वापर करण्यास सांगितलं जातंय. 

पीएनजी म्हणजे काय? (What is PNG)

होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे सुरु नसल्यानं एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या स्थितीत सरकारकडून पीएनजीच्या वापराचं आवाहन केलं जातंय. पीएनजी म्हणजे पाइप्ड नॅच्यूरल गॅस होय. या गॅसमध्ये अधिक प्रमाणात मिथेन वायू असतो, जो भूमिगत पाईपलाईनद्वारे थेट घरांपर्यंत पोहोचवला जातो.  भारतात पीएनजी गॅसचा पुरवठा लिक्विफाईड नॅच्यूरल गॅसच्या रुपातकेला जातो. तर, एलपीजी गॅस रिफायनरीत तयार केला जातो. ज्याची निर्मिती क्रूड ऑईलपासून केली जाते. पीएनजीचा पुरवठा नेहमी होत असतो, त्याच्या रिफिलिंगची आवश्यकता नसते.

भारताला पीएनजी कसा मिळतो?

भारतात पीएनजी पूर्व किनारपट्टीवरील कृष्णा गोदावरी खोऱ्यात, आसाम आणि त्रिपुरामधून मिळतो. कृष्णा गोदावरी खोऱ्यात तीन क्षेत्र आहेत, आर क्लस्टर, सॅटेलाईट क्लस्टर आणि एमजे हे तीन भाग आहे. आसाम आणि त्रिपुरामधून पीएनजीची निर्मिती 47 टक्के होते. याशिवाय भारत एलएनजीची आयात कतार, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातून केली जाते. 

एलपीजी गॅसमध्ये प्रोपेन आणि ब्यूटेन यांचं मिश्रण असतं. सिलेंडरमध्ये तो साठवण्यात येतो. क्रूड ऑईलवर प्रक्रिया करुन एलपीजीची निर्मिती केली जाते.  भारत एलपीजीच्या वापराच्या एकूण 60 टक्के आयात करतो.यापैकी 90 टक्के आयात होर्मुझ मार्गे येतो.  

पीएनजीचा पुरवठा सुरळीत कसा? 

भारत सरकारकडून लोकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी एलपीजी सिलेंडरचं कनेक्शन सोडून पीएनजीचा वापर करावा. पीएनजी निश्चित पाईप नेटवर्क द्वारे पुरवला जातो. पीएनजीच्या पाईपचं जाळं भूमिगत असतं, त्यामुळं त्यामुळं युद्धाचा थेट परिणाम त्याच्यावर होत नाही. 

एस अँड पीच्या रिपोर्टनुसार भारतानं 2025 मध्ये 25.5 दशलक्ष टन एलएनजीची आयात केली आहे. पुढील वर्षांमध्ये यात वाढ होऊ शकते. पेट्रोलियम प्लॅनिंग अँड एनालिसिस सेलच्या डेटानुसार भारत 50 टक्के नैसर्गिक गॅस आयात करतो. 

दरम्यान भारतात 16.2 दशलक्ष घरगुती पीएनजी गॅस कनेक्शन आहेत. दुसरीकडे एलपीजी ग्राहकांची संख्या 332 दशलक्ष इतकी आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget