एक्स्प्लोर

Ambani Family : आशियातील श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांचं शिक्षण किती? 'या' शाळा-कॉलेजमधून शिक्षण; रंजक माहिती जाणून घ्या...

Asia's Richest Mukesh Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​मालक मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबिय यांचं शिक्षण किती याबाबत तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, तर याचं उत्तर आज जाणून घ्या.

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहे. मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या संपत्तीमुळे कायमच चर्चेत असतात. अनेकदा त्याचं राहणं-खाणं आणि महागडे कपड्यावरून यामुळे ही अनेक वेळा त्यांच्याकडे लक्ष वेधलं जातं. देशातील आघाडीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​मालक मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबिय यांचं शिक्षण किती याबाबत तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, तर याचं उत्तर आज जाणून घ्या.

मुकेश अंबानी-नीता अंबानी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाविषयी सविस्तर माहिती

मुकेश अंबानी 

मुकेश अंबानी हे स्वर्गीय धीरूभाई अंबानी यांचे मोठे सुपुत्र. मुकेश अंबानी यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतूनच पूर्ण झालं. अंबानी यांनी केमिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून त्यांनी ही पदवी मिळवली. त्यानंतर ते शिक्षणासाठी परदेशात गेले, पण पुन्हा भारतात परतले. मुकेश अंबानी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेशही घेतला, पण शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी भारतात येऊन कौटुंबिक व्यवसायात एंट्री घेतली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी संपत्तीच्या बाबतीत जगात 11 व्या क्रमांकावर आहेत. 97.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

नीता अंबानी 

गुजराती कुटुंबात जन्मलेल्या नीता अंबानी यांचा विवाह मुकेश अंबानी यांच्याशी 1985 मध्ये झाला होता. नीता अंबानी यांनी मुंबईच्या नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी पूर्ण केली आहे. याशिवाय त्या भरतनाट्यम शिक्षिकाही आहे. नीता अंबानी या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका आहेत.

आकाश अंबानी - श्लोका अंबानी 

आकाश अंबानी मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आहे. आकाश अंबानी रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा अध्यक्ष आहे. आकाश अंबानीने याआधी जिओ इन्फोकॉम कंपनीच्या संचालक मंडळावर बिगर कार्यकारी संचालकपदाची जबाबदारी ही सांभाळली होती. आकाश अंबानीचा जन्म मुंबई झाला. त्याचं शालेय शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूल आणि धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून येथे झालं आहे. त्यानंतर आकाशने ब्राऊन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली. मुकेश अंबानी यांची थोरली सून आणि आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहताही उच्च शिक्षित आहे. श्लोका मेहताने आकाशसोबत धीरूभाई अंबानी स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. तिने प्रिन्स्टन विद्यापीठातून उच्च शिक्षण केलं. यानंतर श्लोका मेहताने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून लॉमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली आहे.

अनंत अंबानी-राधिका मर्चंट 

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यानेही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून अनंत अंबानी पदवी शिक्षण पूर्ण केलं. ब्राउन युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतल्यानंतर तो रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये रुजू झाला. सुरुवातीला अनंत अंबानीने जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या बोर्डवर जबाबदारी देण्यात आली होती. सध्या अनंत अंबानीच्या खांद्यावर रिलायन्सचा ऊर्जा व्यवसायाची जबाबदारी आहे. अनंत अंबानी इंडियन प्रीमियर लीग (IPL-Indian Premier League) फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा (MI-Mumbai Indians) सह-मालक देखील आहे. मुकेश अंबानी याची होणारी धाकटी सून म्हणजे अनंत अंबानीची होणारी पत्नी राधिका मर्चंट न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवीधर आहे.

ईशा अंबानी-आनंद पिरामल

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) रिलायन्स ग्रुपमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहे. ईशा अंबानीच्या खांद्यावर रिलायन्स रिटेलची जबाबदारी आहे. ईशा अंबानीने आपले सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केलं. यानंतर तिने अमेरिकेच्या येल विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर तिने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवीही पूर्ण केली आहे.

ईशा अंबानीचा पती आणि अंबानी कुटुंबाचा जावई आनंद पिरामल हे उद्योगपती अजय पिरामल यांचा मुलगा आहे. आनंद पिरामलने मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून सुरुवातीचं शिक्षण पूर्ण केले आहे. आनंद पिरामलने फिलाडेल्फिया (USA) येथील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतली त्यानंतर बोस्टनमधील हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) पूर्ण केलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget