एक्स्प्लोर

Home Loan : घर खरेदीसाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? सर्वात कमी व्याजदरावर गृहकर्ज कोणत्या बँकेकडून मिळते? जाणून घ्या

Home Loan : भारतात अनेकजण गृहकर्ज काढून घर खरेदी करताना पाहायला मिळतात. गृहकर्जाचा कालावधी मोठा असल्यानं व्याज दरातील छोटासा फरक देखील मोठा आर्थिक परिणाम करु शकतो.

Home Loan  मुंबई: घर खरेदीसाठी गृहकर्ज काढावं लागतं. गृहकर्जाच्या परतफेडीचा कालावधी मोठा असल्यानं व्याजदरातील थोडासा फरक देखील परिणामकारक ठरु शकतो. सार्वजनिक बँका, खासगी बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडून गृहकर्ज दिलं जातं. कर्जदाराचा सिबिल स्कोअर जितका चागंला त्या प्रमाणात कमी व्याजदरावर कर्ज मिळतं.तज्ज्ञांच्या मते कर्जदारांनी किंवा ग्राहकांनी सर्वात कमी व्याजदरावर  गृहकर्ज देणाऱ्या बँक किंवा हाऊसिंग फायनान्सचा पर्याय निवडला पाहिजे. मात्र बँक किंवा एनबीएफसी गृहकर्जाचा व्याज दर निश्चित करताना कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर, कर्ज परतफेड क्षमता, नोकरीची प्रोफाईल आणि कर्जाच्या रकमेचा विचार करतात. आरबीआयकडून निश्चित केल्या जाणाऱ्या रेपो रेटवर देखील गृहकर्जाच्या व्याज दरातील बदल ठरतात. 

सार्वजनिक बँकांमध्ये सर्वात कमी व्याज दर कोणाचा?

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया 7.25 ते 8.95 टक्के व्याज दरानं गृहकर्ज देते. बँक ऑफ बडोदाकडून 7.20 ते 9 टक्के व्याजानं गृह कर्ज दिलं जातं. यूनियन बँक ऑफ इंडिया 7.15 ते 9.60 टक्के व्याजानं गृहकर्ज देते. पंजाब नॅशनल बँक 7.25 ते 9.25 टक्के व्याजानं हकर्ज देते. बँक ऑफ इंडियाकडून 7.10  ते 10 टक्के व्याजानं गृहकर्ज दिलं जातं. कॅनरा बँकेचा गृहकर्जाचा व्याज दर  7.25  ते 10 टक्के या दरम्यान आहे. 

खासगी बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर किती? 

देशातील खासगी बँकांचा विचार केला असता सर्वात कमी व्याज दरावर साऊथ इंडियन बँक गृहकर्ज देते. या बँकेचा व्याज दर 7.20 टक्के आहे. तर, वैश्य बँक 8.50 ते 10.65 टक्के व्याजानं गृहकर्ज देते. खासगी बँकांमध्ये सर्वाधिक व्याज दर वैश्य बँक आकारते.  कोटक महिंद्रा बँकेचा व्याज दर 7.60 टक्के इतका आहे. आयसीआयसीआय बँकेचा गृहकर्जाचा व्याज दर 7.50 टक्के आहे. याशिवाय एक्सिस बँकेचा गृहकर्जाचा व्याज दर 8 ते 11.90 टक्के आहे. 

हाऊसिंग फायनान्समध्ये सर्वात कमी व्याज दर कोणाचा?

हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचा विचार केला असता सर्वात कमी व्याज दरावर एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून गृहकर्ज दिलं जातं. एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनी 7.15 टक्क्यांपासून गृहकर्ज देते. बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनी 7.25 टक्के व्याजानं गृहकर्ज देते. टाटा कॅपिटल  कंपनी 8 टक्के व्याजापासून गृहकर्ज देण्यास सुरुवात करते. पीएनबी हाऊसिंग फायनान्स कंपनी 7.50 टक्के व्याजापासून गृहकर्ज देते. 

तज्ज्ञांच्या मते  बँक, हाऊसिंग फायनान्स कंपनी सर्वात कमी व्याजदरानं गृहकर्ज देते त्या कर्जदारांचा क्रेडिट स्कोअर 800 पेक्षा अधिक अतो. जर एखाद्या कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर 800 पेक्षा कमी असल्यास त्याला अधिक व्याज दरानं गृहकर्ज घ्यावं लागतं.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
Gold Silver Rates Today: सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?
सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget