HDFC बँकेचा मोठा निर्णय! ग्राहकांना दिलासा, नवीन निर्णय आजपासून लागू
HDFC बँकेने (HDFC Bank) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने कर्जाच्या व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. ज्यामुळं या बेंचमार्कशी संबंधित कर्ज असलेल्या सर्व ग्राहकांना फायदा होईल.

HDFC Bank News : एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने (Bank) कर्जाच्या व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. ज्यामुळं या बेंचमार्कशी संबंधित कर्ज असलेल्या सर्व ग्राहकांना फायदा होईल. हा बदल आजपासून म्हणजे 7 जुलै 2025 पासून लागू झाला आहे. वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जांवरील व्याजदर कमी केले आहेत. पूर्वी बँकेचा एमसीएलआर 8.90 टक्के ते 9.10 टक्के दरम्यान होता, जो आता 8.60 टक्के ते 8.80 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.
ग्राहकांवरील आर्थिक भार कमी होणार
या कपातीचा परिणाम एक दिवस, एक महिना, तीन महिने, सहा महिने, एक वर्ष, दोन वर्षे आणि तीन वर्षे कालावधीच्या कर्जांवर दिसून येईल. या पावलामुळं ग्राहकांना कमी व्याज द्यावे लागेल, ज्यामुळे त्यांचे मासिक हप्ते (EMI) कमी होतील आणि आर्थिक भार कमी होईल.
गृहकर्जांवरील व्याजदर
गृहकर्जांबद्दल बोलायचे झाले तर, एचडीएफसी बँकेच्या गृहकर्जाचे व्याजदर रेपो दराशी जोडलेले आहेत आणि कर्जाच्या संपूर्ण कालावधीत बदलू शकतात. सध्या, 7 जुलै 2025 पासून, सामान्य गृहकर्जाचे व्याजदर 8.50 टक्के ते 9.40 टक्के दरम्यान आहेत, तर विशेष दर 7.90 टक्के ते 9.00 टक्के दरम्यान आहेत. हे दर सध्याच्या 5.50 टक्केच्या रेपो दराच्या आधारावर निश्चित केले गेले आहेत. ही कपात विशेषतः अशा ग्राहकांना फायदेशीर ठरेल जे नवीन गृहकर्ज घेण्याची योजना आखत आहेत किंवा ज्यांचे विद्यमान कर्जाचे व्याजदर रेपो दराशी जोडलेले आहेत.
एमसीएलआर म्हणजे काय?
एमसीएलआर (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट) हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) द्वारे निश्चित केलेला एक बेंचमार्क व्याजदर आहे. ज्याच्या आधारावर बँका त्यांच्या कर्जाचे व्याजदर निश्चित करतात. हा किमान दर आहे ज्यावर बँका कर्ज देऊ शकतात. बँकेचा कर्ज घेण्याचा खर्च, ठेवींवर दिला जाणारा व्याजदर, ऑपरेटिंग खर्च आणि सीआरआरवरील नकारात्मक परिणाम यासारख्या घटकांवर आधारित एमसीएलआरची गणना केली जाते.
दरम्यान, एचडीएफसी बँकेने घेतलेल्या निर्णयामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बँकेचं कर्ज असलेल्या सर्व ग्राहकांना फायदा होणार आहे. बँकेने कर्जाच्या व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. याचा मोठा फायदा ग्राहकांना होणार असून, या निर्णयाची सुरुवात आजपासूनच झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:

















