GST Collection: जीएसटीने सरकारच्या तिजोरीत भर; एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यातील कर संकलनात घट
GST Collection in May 2023: मे महिन्यातही जीएसटी संकलन एक लाख 57 हजार कोटींच्या घरात झाला आहे. मात्र, हे कर संकलन एप्रिल महिन्याच्या तुलनेत कमी आहे.
GST Collection: अर्थ मंत्रालयाने आज मे महिन्यातील वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनाची आकडेवारी जारी केली आहे. मे महिन्यात केंद्र सरकारने एक लाख 57 हजार 90 लाख कोटींची कमाई केली आहे. मागील वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात जीएसटीत वाढ झाली आहे. मे 2022 मध्ये एक लाख 40 हजार 885 लाख कोटी रुपयांचा कर जमा करण्यात आला होता. मागील वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात जीएसटी करात 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, मागील एप्रिल महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जीएसटीत घट झाली आहे. एप्रिल महिन्यात 1.87 लाख कोटी रुपयांचा कर सरकारला मिळाला होता.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मे 2023 मधील जीएसटीचे आकडे जाहीर केले आहेत. त्याबाबतची माहिती आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर पोस्ट केली आहे. मे 2023 मध्ये एकूण एक लाख 57 हजार 90 लाख कोटी रुपयांपैकी 28 हजार 411 कोटी रुपये हे सीजीएसटीच्या माध्यमातून जमा करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यात CGST च्या माध्यमातून 38 हजार 400 कोटी रुपयांचा कर मिळाला होता. तर, मे महिन्यात एसजीएसटी (SGST) 35 हजार 800 कोटी रुपये होता. मागील महिन्यात हा आकडा 47 हजार 400 कोटी रुपये इतका होता.
👉 ₹1,57,090 crore gross #GST revenue collected for May 2023; clocks 12% Year-on-Year growth
— Ministry of Finance (@FinMinIndia) June 1, 2023
👉 Monthly #GST revenues more than ₹1.4 lakh crore for 14 months in a row, with ₹1.5 lakh crore crossed for the 5th time since inception of #GST
👉 Revenue from import of goods 12%… pic.twitter.com/7ghdLDW3jt
कर कपातीनंतर या महिन्याचा केंद्र जीएसटी 63,780 कोटी रुपये आहे. आणि राज्य जीएसटी 65,597 कोटी रुपये असणार आहे.
वार्षिक तुलनेत जीएसटीत 12 टक्क्यांची वाढ
वर्षाची तुलना करता मे 2022 च्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात जीएसटी संकलनात 12 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे, मासिक जीएसटी संकलनाचा आकडा सलग 14 व्या महिन्यात 1.4 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. त्याच वेळी, जीएसटी लागू झाल्यापासून, जीएसटीचा आकडा 1.5 लाख कोटींच्या पुढे गेल्याची ही पाचवी वेळ आहे.
एप्रिल महिन्यात किती जीएसटी
एप्रिल 2023 मध्ये 1,87,035 कोटी रुपये जीएसटी जमा करण्यात आला आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार यातील केंद्राचा वाटा म्हणजेच सीजीएसटी (CGST) रु. 38440 कोटी आहे तर राज्याचा वाटा म्हणजेच एसजीएसटी (SGST) रु. 47412 कोटी रुपये आहे. तर एकात्मिक जीएसटी म्हणजेच आयजीएसटी (IGST) संकलन 89158 कोटी रुपये आहे.
गेल्यावर्षी म्हणजे एप्रिल 2022 मध्ये जमा झालेल्या जीएसटीच्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये जमा झालेला जीएसटी हा तब्बल 12% जास्त आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जमा झालेल्या जीएसटी महसुलापेक्षा यावर्षी एप्रिल महिन्यात जमा झालेला जीएसटी रुपये 19,495 कोटींपैक्षा जास्त आहे.