(Source: ECI/ABP News/ABP Majha)
2014 पर्यंत आपण कुठे होतो आणि आता कुठे? सरकार काढणार श्वेतपत्रिका
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 चा सादर केला. सरकार अर्थव्यवस्थेची पूर्वीची आणि आताची स्थिती यावर श्वेतपत्रिका काढणार असल्याचे त्या म्हणाल्या.
Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 चा सादर केला. सरकार अर्थव्यवस्थेची पूर्वीची आणि आताची स्थिती यावर श्वेतपत्रिका काढणार असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. 2014 मध्ये ज्यावेळी आमच्या सरकारने सत्तेची धुरा सांभाळली त्यावेळी अर्थव्यवस्थेत टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्याची आणि शासन प्रणाली व्यवस्थित करण्याची आमच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी होती असे सीतारामन म्हणाल्या.
लोकांना दिलासा देण्याची, गुंतवणूक आकर्षित करण्याची आणि अतिशय गरजेच्या असलेल्या सुधारणांना पाठबळ देण्याची काळाची गरज होती असे त्या म्हणाल्या. दरम्यान, त्यावेळची अर्थव्यवस्था आणि आताची अर्थव्यवस्था याविषयी बोलताना, अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, अनेक निर्माण झालेल्या संकटांवर मात करण्यात यश आले आहे. सर्वंकष विकासासह अतिशय उच्च शाश्वत वृद्धीच्या कक्षेत अर्थव्यवस्थेला भक्कमपण स्थापित करण्यात आले आहे. 2014 पर्यंत आपण कुठे होतो आणि आता आपण कुठे आहोत? हे पाहाण्यासाठी आणि त्या वर्षांमध्ये केलेल्या गैरव्यवस्थापनांपासून केवळ धडा घेण्यासाठी सरकार अर्थव्यवस्थेची पूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती यावर सभागृहात श्वेतपत्रिका सादर करेल, अशी घोषणा यावेळी निर्मला सीतारामन यांनी केली.
अर्थमंत्री निर्मला सीतरमण (Nirmala Sitharaman) यांनी आज अंतरिम बजेट सादर केलं. कररचनेत कोणताही बदल या अर्थसंकल्पात नाही. त्यामुळे आता करदात्यांना जुलैमध्ये सादर होणाऱ्या बजेटची वाट पाहावी लागणार आहे. मध्यमवर्गाला स्वतःचं हक्काचं घर घेण्यासाठी योजना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात जाहीर केली. युवा, गरीब, महिला आणि शेतकरी वर्गासाठी योजनांची घोषणा सीतारमण यांनी केली. 2047 पर्यंत भारताला विकसीत भारत करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलंय. आयुष्मान भारत योजना यापुढे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनाही लागू असणार आहे. लखपती दीदी योजनेचं लक्ष्य दोन कोटींवरून तीन कोटी करण्यात आलंय.
1 कोटी नागरिकांना 300 यूनिट मोफत वीज
पंतप्रधान सूर्योदय योजने अंतर्गत 300 युनीट वीज मोफत मिळणार आहे. तसेच या योजनेंतर्गत 1 कोटी घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प लावण्यात येणार आहे. गेल्या 10 वर्षात पीएम मुद्रा योजनेंतर्गंत मोदी सरकारने गरीबांना, शेतकऱ्यांना, महिला आणि युवकांना अनेक सुविधा उपलब्ध मोदींनी दिल्या आहेत. गेल्या दहा वर्षात पीएम मुद्रा योजनेंतर्गंत 43 कोटीच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. आतपर्यंत 22.50 लाख कोटी नागरिकांना याचा फायदा झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
दहा वर्षात मोदींनी काय काय दिले? अर्थमंत्री निर्मला सीतारमणांनी वाचला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासकामांचा पाढा