अदानी ग्रुप महाराष्ट्रात करणार 50 हजार कोटींची गुंतवणूक, 20 हजार जणांना मिळणार रोजगार
अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी (gautam adani) यांनी दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची महाराष्ट्र दालनात भेट घेतली.
दावोस : अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी (gautam adani) यांनी दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची महाराष्ट्र दालनात भेट घेतली. यावेळी त्यांच्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा क्षेत्र, गुंतवणुकीच्या संधी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. अदानी ग्रुप महाराष्ट्रामगध्ये 50 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात गौतम अदानी यांच्यासोबत दावोस येथे राज्य सरकारमार्फत सामंजस्य करार करण्यात आला. पुढील दहा वर्षांसाठी राज्य सरकार आणि अदानी ग्रुप यांच्यामध्ये करार झाला आहे. अदानी ग्रुपच्या या गुंतवणुकीमुळे राज्यात 20000 जणांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे.
अदानी ग्रुप महाराष्ट्रामध्ये 1GW hyperscale data infrastructure मध्ये 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. पुढील दहा वर्षांसाठी अदानी ग्रुप राज्यात गुंतवणूक करणार आहे. राज्य सरकार आणि अदानी ग्रुप यांच्यामध्ये बुधवारी सामंजस्य करार स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अदानी ग्रुपच्या गुंतवणुकीमुळे राज्यात शेकडो जणांना रोजगार मिळणार आहे.
अदानी ग्रुप पुणे, मुंबई अथवा नवी मुंबईमध्ये data center infrastructure उभारणार आहे. अदानी ग्रुप अपारंपारिक उर्जा (अक्षय उर्जा, renewable energy) निर्मिती करणार आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या शहरांची निवड केली आहे. राज्य सरकारसोबत पुढील बैठकीत या तीन शहरांपैकी एका शहराची निवड करण्यात येणार आहे. अदानी ग्रुपच्या या प्रजोक्टमुळे राज्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे 20 हजार रोजगार निर्मिती होणार आहे.
#दावोस | अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष @gautam_adani यांनी आज मुख्यमंत्री @mieknathshinde यांची #महाराष्ट्र दालनात भेट घेतली. यावेळी त्यांच्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा क्षेत्र, गुंतवणुकीच्या संधी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 17, 2024
Founder & Chairman of Adani Group… pic.twitter.com/s7Fz8KELSz
गुंतवणूक करार झालेल्या उद्योगांची माहिती व रोजगार पुढीलप्रमाणे :
16 जानेवारी – आयनॉक्स एअर प्रोडक्ट 25 हजार कोटी ( 5 हजार रोजगार ), बी सी जिंदाल 41हजार कोटी ( 5 हजार रोजगार), जेएसडब्ल्यू स्टील 25 हजार कोटी ( 15 हजार रोजगार), एबी इन बेव्ह 600 कोटी ( 150 रोजगार), गोदरेज एग्रोव्हेट 1000 कोटी ( 650 रोजगार) अमेरिका स्थित डेटा कंपनी 10 हजार कोटी ( 200 रोजगार)
17 जानेवारी – अदानी ग्रुप 50 हजार कोटी ( 500रोजगार), स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स 1158 कोटी ( 500 रोजगार), इंडियन ज्वेलरी पार्क 50 हजार कोटी ( 1 लाख रोजगार), वेब वर्क्स 5ह्जार कोटी ( 100 रोजगार), लॉजिस्टिकमधील इंडोस्पेस,इएसआर, केएसएच, प्रगती, यांची मिळून 3500 कोटी ( 15 हजार रोजगार), नसर्गिक संसाधानातील कॉन्गलोमिरेट कंपनी 20 हजार कोटी ( 4 हजार रोजगार)
महाप्रीत ने हरित उर्जा प्रकल्पांसाठी 56हजार कोटींचे करार केले. अमेरिकास्थित प्रेडीक्शन्स समवेत 4 हजार कोटी, युरोपमधील हिरो फ्युचर एनर्जी मध्ये 8 हजार कोटी, जर्मनीच्या ग्रीन एनर्जी 3000 मध्ये 40 हजार कोटी, व्हीएचएम ओमान समवेत 4 हजार कोटी