दिलासादायक! तुर खातेय चांगलाच भाव, क्विंटलला मिळतोय 'एवढा' दर
सध्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना (Tur Farmers) चांगले दिवस आले आहेत. त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे तुरीच्या दरात चांगलीच सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Tur Price: काही शेतमालाच्या दरात चांगलीच सुधारणा होताना दिसत आहे. तर काही पिकांच्या दरात सातत्यानं घसरण होत आहे. सध्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना (Tur Farmers) चांगले दिवस आले आहेत. त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे तुरीच्या दरात चांगलीच सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीमध्ये (Karanja Bazar Committee) आज (25 जानेवारी) नवीन तुरीनं 10785 रुपयांचा टप्पा पार केला आहे. तुरीच्या दरात वाढ झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
तुरीच्या उत्पन्नात यावर्षी मोठी घट
वाशीम जिल्ह्यात तुरीच्या भावात चांगलीच सुधारणा झाली आहे. तूर पिकाच्या उत्पन्नात यावर्षी मोठी घट झाली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा तुरीच्या भावात सुधारणा होताना पाहायला मिळत आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीमध्ये नवीन तुरीने 10785 रुपयांचा टप्पा पार केला आहे. या बाजार समितीमध्ये तुरीची आवक ही 1500 क्विंटल झाली आहे. तर वाशीम बाजार समितीमध्ये तुरीला 10260 रुपये इतका दर मिळत आहे. वाशीम बाजार समितीत 4500 क्विंटल तुरीची आवक झाली आहे. त्यामुळं तुरीचे वाढते दर पाहून तूर उत्पादक शेतकरी आनंदी झाले आहेत. दरम्यान तुरीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
तुरीच्या दरात वाढ तर कांद्यासह भाजीपाल्याच्या दरात घसरण
एकीकडं तुरीच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडं कांद्यासह भाजीपाल्यांच्या दरात मोठी घसरण होतोना दित आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडी निराशा पाहायला मिळत आहे. राज्यातील शेतकऱ्यांकडे अद्याप मोठ्या प्रमाणावर कांदा आहे. मात्र, सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी केल्यानंतर सातत्यानं कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
कांद्याचे दर प्रति क्विंटर 200 रुपयांनी घसरले
सोलापूरच्या (Solapur) कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पुन्हा एकदा कांद्याची मोठी आवक झाली. सोलापूरच्या बाजारात आज जवळपास 1500 गाडी कांद्याची आवक झाली. बुधवारी बाजार समिती बंद राहिल्याने तसंच उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजाराला सुट्टी असल्याने आवक वाढल्याचं समजतं. दरम्यान आवक वाढल्याने कांद्याचे दर प्रति क्विंटर 200 रुपयांनी घसरले आहेत. तर दुसरीकडे कोथिंबीरीला भाव नसल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी कोथिंबीर रस्त्यावर फेकली आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हा प्रकार घडला आहे.
आवक वाढल्याने दर 200 रुपये प्रती क्विंटल ने घसरले, मंगळवारी कांद्याला 1200 ते 1400 रुपये प्रती किलो इतका होता भाव, आज मात्र कांद्याला 800 ते 1200 रुपये इतका आहे भाव काल कांद्याला 1200 ते 1400 रुपये प्रति क्विंटल इतका भाव होता. मात्र आज कांद्याला प्रति क्विंटल 800 ते 1200 रुपये इतका भाव आहे. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: