Gold Rate : सोने खरेदी करणाऱ्यांना गुड न्यूज सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दर 603 तर चांदीचे दर 1655 रुपयांनी घसरले...
Gold Rate : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.

Gold Silver Price 31 July: सोने आणि चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. सर्राफा बाजारात सोन्याचे दर 603 रुपयांनी घसरले तर चांदीच्या दरात 1655 रुपयांची घसरण झाली. सोन्याचे एका तोळ्याचे दर 98414 रुपयांवर पोहोचले तर चांदीचे दर 1655 रुपयांनी घसरुन 111745 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह सर्राफा बाजारात 24 कॅरेट एक तोळे सोन्याचा दर 101366 रुपये झाला आहे. तर चांदीचा दर 115097 रुपये किलो इतका आहे. बुधवारी सोन्याचे दर 99017 रुपये होते तर चांदीचा एक किलोचा दर 113400 रुपये इतका होता.
सोन्याचे दर 100533 रुपयांवरुन उच्चांकावरुन घसरुण 98414 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर या कालावधीत 2119 रुपयांनी कमी झाले आहेत. चांदीचे दर 4105 रुपयांनी कमी झाले आहेत. 23 जुलै रोजी चांदीचे दर 115850 रुपयांच्या उच्चांकावर होते.
आज 23 कॅरेट सोनं देखील 600 रुपये सस्त होत 98020 रुपयांवर आलं आहे. जीएसटीसह एक तोळा सोन्याची किंमत 100960 रुपये झाली आहे. हे दर मेकिंग चार्जेस शिवाय आहेत. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 553 रुपयांची घसरण झाली असून ते 90147 एक तोळा झाले आहेत. जीएसटीसह दर 92851 रुपये आहे. आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 452 रुपयांनी कमी होत 73811 रुपयांवर आली आहे. जीएसटीसह हा दर 76025 रुपये आहे. 14 कॅरेट सोने जीएसटीसह 59319 रुपयांवर पोहोचलं आहे.
सोन्याचे दर जुलै महिन्यात 2528 रुपये प्रति तोळा वाढले आहेत. तर, चांदीच्यादरात 7890 रुपयांची वाढ झाली आहे. आयबीजेएच्या रेटनुसार 30 जूनला सोन्याचे एका तोळ्याचे दर 95886 रुपये होते. तर, चांदीचे एक किलोचे दर 105510 रुपये होते. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून सोने आणि चांदीचे दर जाहीर केले जातात. एका दिवसात सोने आणि चांदीचे दर दोन वेळा जाहीर केले जातात.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून विविध देशांवर टॅरिफ लादलं जात आहे. ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांमुळं जागतिक बाजारात अस्थिरतचे वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळं गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणुकीवर भर दिला. सर्राफा बाजारात सोन्याचे दर 22674 रुपयांनी वाढले आहेत. तर, चांदीचे दर 25728 रुपयांची वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2024 ला सोन्याचे दर 75740 रुपये एक तोळा होता. तर, चांदीचे दर 86017 रुपये एक किलो होते. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणामुळं गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत.
























