Gold-Silver Rate : दिवाळीनिमित्त सोने-चांदी खरेदीचा विचार असेल, तर ही बातमी नक्की वाचा; जाणून घ्या आजचा भाव
Gold-Silver Rate : ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्या- चांदीच्या भावात या आठवड्याच्या सुरवातीपासूनच तेजी दिसून आली.
![Gold-Silver Rate : दिवाळीनिमित्त सोने-चांदी खरेदीचा विचार असेल, तर ही बातमी नक्की वाचा; जाणून घ्या आजचा भाव Gold Silver Rate Today gold silver price update 19 october 2022 marathi business news Gold-Silver Rate : दिवाळीनिमित्त सोने-चांदी खरेदीचा विचार असेल, तर ही बातमी नक्की वाचा; जाणून घ्या आजचा भाव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/b263ef6665c5179af13ebe695f80c2951666022062327557_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gold-Silver Rate : दिवाळी (Diwali 2022) काही दिवसांवर असताना सोने खरेदीसाठी (Gold and Silver Price) लोकं सराफा बाजाराकडे वळत आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर सोन्याचा भावात वाढ झालेली असल्याचे दिसत आहे. दरम्यान मागील आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावातही घसरण होताना दिसली, मात्र आता ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्या- चांदीच्या भावात या आठवड्याच्या सुरवातीपासूनच तेजी दिसून आली. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवार ते आजपर्यंत सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे.
जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,550 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,780 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 564 रुपये आहे.
प्रमुख महानगरांमधील भाव
मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,420 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत 50,640 प्रति 10 ग्रॅम आहे.
पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,450 रुपये
तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,670 रुपये
नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,450 रुपये
तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,670 रुपये
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 46,450 रुपये
तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 50,670 रुपये
चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 566 रुपये आहे.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. तर, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Petrol Diesel Price : कच्चं तेल पुन्हा घसरलं; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार? सध्याचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)